सेलूत मनोज जरांगे पाटील यांची 22 डिसेंबरला होणार अति विराट सभा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

 सभेचे  नियोजन  संपन्न.मनोज जरांगे पाटील एक दिवस अगोदरच मुक्कामी.
मुस्लिम समाजाने घेतली पाणीपुरवठा करण्यांची जवाबदारी.

सेलू : सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान परिसरात होणाऱ्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल यांची एक तरी सभा व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून सकल मराठा समाजाची इच्छा होती शेवटी अथक पर्यत्ना नंतर 22 डिसेंबर ही तारीख  सभेसाठी प्राप्त झाली.त्या अनुसंगाने  सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या भव्य अश्या मैदानात सभेची जोरदार तयारी चालू झाली आहे. सेलू तालूक्यातून सर्व समाज बांधवांनी जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक समाजातील बांधवानी सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांची जेवण्याची उत्तम अशी व्यवस्था जागोजागी नाव  न सांगण्याच्या अटीवर करण्यात आली आहे; नावापेक्षा समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे या भावनेतून त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी व्यक्त केल्या. मुस्लिम समाजातील बंधूनी सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व लोंकाच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर सभेसाठी 300 तरुन स्वयंसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन सभा यशस्वी होण्यासाठी मदत केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुस्लिम बांधवानी पाठींबा दर्शवत आपले योगदान देण्याचे मान्य केले आहे. या सभेसाठी 21 जेसीबी च्या सह्ययाने गुलाब पुष्पवृष्टी करण्याचे ठरवले आहे.  सभेचे भव्य दिव्य असे स्टेज तयार झाले असून भव्य अशी रॅली, महिला व पुरुष यांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजवर फक्त मनोज जरांगे पाटील हेच असतील.त्यांच्या साठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.जिल्ह्यातून तसेच इतर तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या  वाहनांची पार्किंगची व्यवस्था  शहराच्या बाहेर वेग वेगळया ठिकाणी करण्यात आली आहे. दिवंगत हिंदुऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनंतर या मैदानावर कोणत्याच नेत्याने सभा घेण्याचे धाडस दाखविले नाही त्यानंतर आत्ता अनेक वर्षानंतर मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे म्हणून मा.मनोज जरांगे पाटलाची सभा होत आहे. यासभेसाठी योगायोग म्हणजे मा.बाळासाहेेब ठाकरे साहेब हे सुद्धा सभेच्या रात्री मुक्कामी आले होते तर मनोज जरांगे पाटील सुद्धा मुक्कामीच येत आहे हा केवळ योगायोग आहे. या सभेसाठी शहरातील अनेक सेवाभावी संस्थानी योगदान देण्याचे आश्वासन दिले आहे. यात डॉक्टर असोशियेशन,मेडिकल असोशीेशन असे अनेक छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.या सभेसाठी जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहावे म्हणून गावोगावी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःहून समाजातील बांधव प्रयत्न करत आहेत.या सभेसाठी लाखो समाज बांधव उपस्थित रहावे असे अवाहन    सकल मराठा समाजातील आयोजक समितीने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.