सुरेश केसरकर यांचा मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मान
आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्याप्रती सातत्याने अभ्यासूवृत्ती व सकारात्मकता जोपासत भरीव कार्य करीत असल्यामुळे उचगाव, ता. करवीर येथील सुरेश केसरकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन पुणे च्या मुख्य सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी न्यायाधीश मा. सोनल पाटील, जीएसटी आयुक्त मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर, डॉ. कुमार सप्तर्षी, निवृत्ती न्यायाधीश मा. आर. व्ही. जताळे, पोलीस उप आयुक्त संदीप गिल्ल (भापोसे), संविधान अभ्यासक सुभाष वारे तसेच सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचबरोबर कार्यक्रमाचे निमंत्रक सन्मा. विकास कुचेकर, संचालक सन्मा. श्रीकांत (अण्णा) जोगदंड व सर्व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत - मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित, कार्यक्रमामध्ये "मानवाधिकार पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला.
सुरेश केसरकर हे सातत्याने उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर समाजातील सर्वच घटकांप्रती कृतज्ञता जोपासत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. स्वतः औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून स्वतःची नोकरी सांभाळून, शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजामध्ये उत्कृष्टपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत आहेत. अवयवदान व देहदान याविषयी जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अवैध धंदे, बोगस नोकर भरती अशा अनेक बाबीवरती पत्रकारीतेच्या माध्यमातून ते शासन स्तरावरती पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या एकंदरीत समाजाभिमुख कार्याची दखल घेत, जिल्हा प्रशासनाने सन २००४ पासून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तहयात नियुक्ती केलेली आहे. मार्च २०२३ मध्ये त्यांचा कोल्हापूर येथे जाहीर नागरी सत्कार देखील करण्यात आला होता. जून २०२३ मध्ये दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालक पदी सुद्धा महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोदयांच्या शिफारशीनुसार त्यांनी कार्य केलेले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 ची संपूर्ण राज्यांमध्ये कडक अंमलबजावणी व्हावी व शासनाच्या योजना तसेच उपक्रमांचा लाभ लाखो कामगारांना मिळावा यासाठी, राज्य सरकारकडे आग्रही मागणी करून त्यांना न्याय हक्क मिळणेकामी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
त्यांचे सामाजिक कार्यातील बहुमोल योगदान, सातत्य, जिद्द, चिकाटी, समाजाप्रती झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व महत्त्वाकांक्षी ध्येयामुळे तसेच सर्व क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांना जिल्हा, राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
उपरोक्त संस्थेच्यावतीने मानवाधिकार पुरस्कार मिळाल्याबद्दल यापुढील काळातही समाजाप्रती भरीव कामगिरी करण्यास ऊर्जा मिळाली आहे तसेच या पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आवर्जून सांगितले. त्यांना हा प्रतिष्ठेचा व नावलौकिक वाढविणारा पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्हा, राज्य व देश पातळीवरून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या