दिव्यांग दिना दिवशी टाकवडे येथील दिव्यांगांना साहित्याचे वाटप.
टाकवडे - श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्था तर्फे टाकवडे .येथील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग दिना दिवशी गरजेच्या वस्तू वाटप.
तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असून. टाकवडे येथील श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था ही दिव्यांगासाठी अहोरात्र काम करत असते . संस्थेकडे वेळो वेळी त दिव्यांगांच्या मार्फत काही साहित्याची मागणी येत असते. त्यानुसार अध्यक्ष संजय पाटील यांनी संबंधित लोकांना भेटून त्यांच्या गरजा समजून घेऊन. ज्या ज्या दिव्यांना . ज्या वस्तूची गरज आहे .ती वस्तू समाजातील दानशूर व्यक्तीकडून उपलब्ध करून घेऊन. दिव्यांग लोकापर्यंत पोहोचवत असतात. आज ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ,व ग्रामविकास अधिकारी ,तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व श्री दत्त संस्थेचे सर्व संचालक हजर होते.
टिप्पण्या