प्रबोधन पदयात्रेचे विनोद बोराडे मित्र मंडळाकडून भव्य स्वागत.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू येथे सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारा आयोजित चतुर्विध साधन वंदन व समाज प्रबोधन पदयात्रेचे आगमन झाले होते. त्यावेळी विनोद बोराडे मित्र मंडळा तर्फे या पदयात्रेचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले.दिंडीतील सुमारे एक हजार महिला व पुरुष भक्तांचे विनोद बोराडे मित्र मंडळा तर्फे श्री साई बाबा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी सेलू नगरीचे माजी नगराध्यक्ष मा. विनोदरावजी बोराडे,उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे,साईराज बोराडे ,अमरभैया सुरवसे, राजेंद्र पवार आदिनी पदयात्रेचे संयोजक हंसराज दादाजी खामणीकर,सादिराज दादाजी कविश्वर, नांदेडकर बाबाजी,बोजराज दादाजी अमृते यांचे स्वागत केले.पदयात्रेत हजारो महिला पुरुष सामिल होते. त्यांच्या भोजनांची व्यवस्था साई मंगल कार्यालय सेलू येथे करण्यात आली होती.
यावेळी मा.नगराध्यक्ष विनोद बोराडे व समस्त मित्र मंडळ सेलू निवासी सद्-भक्त आदी उपस्थित होते.
टिप्पण्या