आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023नाचणी : पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन

राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव (इलुसिन कोरोकाना) Eleusine coracana असे आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागातील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागात डोंगराळ भागात केली जाते. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी नाचणी हे प्रमुख तृणधान्य पिक आहे. राज्यात सन २०२२-२३ मध्ये या पिकाची ६८,६१२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती व त्यापासून ९५,७४५ टन उत्पादन मिळाले. २०२२-२३ मध्ये राज्याची नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.९६ क्विंटल/ हेक्टर एवढी होती.

राज्यातील सर्वाधिक नाचणी पिकाचे क्षेत्र कोल्हापूर (१६५५४ हेक्टर), नाशिक (१५३२६ हेक्टर), पालघर (११६८९  हेक्टर) आणि रत्नागिरी (९६६५ हेक्टर) या जिल्ह्यामध्ये आहे.

नाचणी व इतर पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्व : कमी  पक्वता कालावधी असणारी पिके. दुष्काळात  तग धरण्याचा गुणधर्म. सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रातिचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.

नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान:

जमिन व हवामान: नाचणी पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने उप-पर्वतीय विभाग व पश्चिम घाट विभागातील डोंगर उताराच्या वरकस जमिनीवर केली जाते.

पूर्वमशागत: जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचि धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.