शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळायला हवा:ॲड. सुभाष हिंदूजा

कोल्हापूर : (सुरेश केसरकर)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचेवतीने गांधीनगर येथे दिनांक १९ डिसेंबर रोजी प्रशासकीय गतिमानता अंतर्गत गांधीनगर होलसेल व किरकोळ व्यापारी असोसिएशन यांचेकरीता आस्थापना नोंदणी, मंडळाच्या योजना, उपक्रम तसेच मंडळाच्यावतीने आयोजित करणेत येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहीती देणेत आली.
यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी व्यापारी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुभाष हिंदुजा यांनी, उपस्थित असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सभासद यांना कामगार कल्याण निधी का भरावा लागतो ? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्या दुकानात ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व दुकानदारांनी संबंधित वाहन चालक, सेल्समन तसेच सर्व कामगार बंधू भगिनींना शासनाच्या योजना व उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ नुसार म. का. क. मंडळाला निधी भरणे बंधनकारक असलेचे स्पष्ट प्रतिपादन केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्यावतीने "श्रमकल्याण युग" विशेषांक देऊन स्वागत केले. गांधीनगर व्यापारी असोसिएशनच्यावतीने उपस्थित सर्वांना सदरचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचा हेतु स्पष्ट करून, उपस्थित सर्व व्यापारी वर्गास मंडळाकडे सर्व आस्थापनांची नोंदणी करणेबाबत आवाहन केले. जेणेकरून शासनाच्या योजना व उपक्रमांपासून वंचित व उपेक्षित कामगारांना लाभ मिळेल. तसेच नविन आस्थापना नोंद करतेवेळी कांही अडचण निर्माण झाल्यास, योग्य ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्न व शंका यांना अनुसरून समर्पक उत्तरे देवून त्यांचे शंकानिरसन केले. याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले. केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी उपस्थितांना ज्या कामगारांचा संबंधित व्यापाऱ्यांकडून कामगार कल्याण निधी मंडळाला जमा केला जातो, त्यांना मिळणाऱ्या विविध आर्थिक लाभाच्या योजना, केंद्रांमार्फत चालणारे उपक्रम जसे आरोग्य, सामाजिक, क्रिडात्मक व सांस्कृतिक आदींची विस्तृत माहीती सांगितली. 
यावेळी उपस्थित सर्वांना मंडळाचे माहितीपत्रक वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तहलयानी, कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष बक्षाराम दर्डा, गांधीनगर किरकोळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलिप कुकरेजा, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, गांधीनगर किरकोळ व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज तंजानी, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अमित कटीयार, गांधीनगर किरकोळ व्यापारी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतिश काडा तसेच गांधीनगर होलसेल व किरकोळ व्यापारी असोसिएशन, येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील व कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या मार्गदशर्नाखाली केंद्र संचालक सचिन आवळेकर व सहाय्यक केंद्र संचालक चंद्रकांत घारगे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.