हिस्सी येथे संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी


सेलू : सेलू तालुक्या तील हिस्सी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी साखळी उपोषण चालू करण्यात आले असून हे बेमुदत साखळी उपोषण चालणार आहे. गेले तीन महिने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथून सुरुवात झालेली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केलेला आहे त्यांच्या आदेशानुसार गावागावात साखळी उपोषण चालू करावे असे सांगण्यात आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिर हिस्सी येथे दिनांक 4 /12/2023 सोमवार पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणासाठी हिस्सी येथील सकळ मराठा बांधवांनी साखळी उपोषणासाठी उपस्थिती लावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.