भारतीय जनता पार्टीला तिन राज्यात घवघवीत यश मिळाल्या बद्दल सेलू येथे जल्लोष.

शिवाजी शिंदे 
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये तसेच क्रांती चौक सेलू येथे आणि शिवाजी महाराज पुतळा परिसर या ठिकाणी ढोल ताशा आणि फटाके वाजवून आणि एकमेकांना लड्डू आणि पेढे भरवून  छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टी तालुका सेलू यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ऍडवोकेट दत्ता नारायणराव कदम, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश काटकर, तसेच अशोक खताळ मामा,भगवानसिंगजी राठोड, जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा भागवत दळवे, अशोक दादा अंभोरे,कपिल फुलारी, बाळासाहेब काजळे,संदीप बोकन,चाफेकर वनिता, रूपालीताई ठाकूर, बबीता ठाकूर,अनिल पवार,भास्कर पडघन, पंजाबराव पौळ, प्रकाश शेरे, लहानाप्पा हरकळ,नावाडे आप्पा, राजू सोलंके,आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. उत्साही वातावरणात सर्वांनी एकमेकांना लड्डू आणि पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो. मेघना दीदी आप आगे बढो, हम आपके साथ है. अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहरात उत्सव साजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.