वाळवे खुर्द येथे अखिल भारतीय साहित्य समूहाचे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले .
वाळवे खुर्द ता कागल अखिल भारतीय शब्द समूहाचे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
सकाळी ग्रथदिंडीने संमेलनास सुरवात झाली . संमेलनाच्या स्थळी दिंडी पोहचल्या नंतर संमेलनाच्या सुरवातीस तानाजी आसबे सरांनी मान्यवरांचे स्वागत केले .
संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांनी ग्रामीण भागातील साहित्य संमेलन हि आजच्या धावपळीच्या युगात माणसांना जगण्याचं बळ देत असतात असे सांगितले. तर उद्घाटक श्री राजन मुठणे कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात मौलिक मार्गदर्शन केले यावेळी. प्रमुख उपस्थीती डॉ. गणपती कमळकर गट शिक्षण अधिकारी कागल ' श्री बाळासाहेब निंबाळकर सचालक प्रा.शि बँक ' श्री आवेलीन देसाई चेअरमन सरपिजीराव पत संस्था ' श्री शामराव देसाई शि.वि. अधिकारी हे होते . तर सुत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.
दुसऱ्या सत्रात कथाकथन अध्यक्ष श्री परशराम आंबी यांचे अध्यतेखाली संपन्न झाले यात ' त्यांनी भाकरचोर हि कथा सादर केली तर दत्तात्रय परीट यांनी यू आर ग्रेट .' संयोगिता महाजन यांनी मैत्रिणी' वर आधारीत तर गीता घाटगे पाटील यांनी दुर्वा कथा सादर करून रसिकांची मने जिंकली . सुत्रसंचालन विश्वनाथ डफळे यांनी केले .तिसऱ्या सत्रात कवि संमेलन अध्यक्षा सौ नसिम जमादार यांनी कविता कशी जन्माला येते . कविता कशी स्फूती या विषची आपले विचार मांडले . यावेळी उपस्थीती श्री आर एस गावडे . शि वि .अधिकारी ' सौ सारिका कासोटे ' सुत्रसंचलन गीतांजली खोत यांनी केले कवि संमेलनात कवि सरकार इंगळी मनिषा वराळे धरणगुती कु प्रतिभा बामणे परिते सौ पुजा शेलार आवळी भाऊसो काबळे ममदापूर . वृषाली टाकळे पीस पाटील . शुमम तांबेकर पुनम पाटील संभाजी चौगुले आर पी वारके: डी एस. गुरव विद्या भोलले साबळे सर सुजाता कोळेकर गीतांजली कमळकर प्रकाश सोनाळकर . निना संकेश्वर यांनी आपल्या कविता सादर केल्या . तसेच पुरस्कार प्राप्त डॉ.गणपती कमळकर रमेश वारके . चंद्रकांत पाटील अशोक कोकाटे पी.एस. पाटील कवि सरकार इंगळी कल्लाप्पा पाटील वृषाली टाकळे डी. एस गुरव प्रकाश साखरे . संभाजी चौगुले संगीता पाटील मीना संकेश्वर अरविंद मानकर सुटेथ आडके जयश्री पाटील अजयकुमार वंगे नसीम जमादार संजय साबळे संजय चौगुले आदिना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संमेलन यशस्वी होण्यासाठी तानाजी आसबे सर ' जयसिंग पाटील ' तुकाराम जरग ' पी.आर फासके ' संजय परीट . एस के पाटील ' आर एस पाटील . उत्तम कांबळे ' श्रीकांत कुंभार वैशाली भोसले . मेघा भाले दतात्रय मर्दाने ' पी.बी चव्हाण विक्रम कुंभार अरुण गायकवाड ' राहुल कुंभार वसंत पालकर युवराज तेली यांनी संमेलन साठी पर्यत्न केले संमेलन विद्या मंदिर वाळवे खुर्द ता कागल जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले अशी माहिती तानाजी आसबे सर यांनी दिली .
टिप्पण्या