श्री केशवराज बाबासाहेब महारांजाच्या यात्रेनिमित्त लोकप्रिय चांडाळ चौकटीच्या करामती कार्यक्रम संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू : दिनांक 28 डिसेंबर शुक्रवार रोजी मा. आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव 2023 निमित्त चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार मेघना दीदी  साकोरे बोर्डीकर यांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी मंचावर मा. प्राध्यापक किरण पाटील सर, संतोषजी मुरकुटे (जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण), डॉक्टर पंडितराव दराडे (विधानसभा अध्यक्ष),दिनकरजी वाघ,रवींद्रजी डासाळकर,संजयजी लोया, संतोष कुलकर्णी सर, श्रीमती ललिता गिल्डा,करुणा कुलकर्णी मॅडम ,डॉ ऋतुराज साडेगावकर,माऊली ताटे,अशोक दादा अंभोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. सेलू हे सांस्कृतिक शहर असून तो वारसा जपण्याच्या हेतूने सेलू शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या हेतूने माननीय आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर यांनी हा उपक्रम राबविला. भारतीय जनता पार्टी च्या संयोजन समितीने व त्यांच्या टीमने केलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहता आमदार महोदय व चांडाल चौकटीच्या करामती वेब सिरीज मधील कलाकार यांनी संयोजन समितीच्या सदस्यांचे भरभरून कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भारतीय जनता पार्टी पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.