दिव्यांगासाठी पालिका प्रशासनाच्या विरोधात लढा उभारू : अशोक काकडे.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू : सेलूत मराठी पञकार संघाच्या वतीने 85  वर्धपान दिना निमित्त आरोग्य शिबीरात 31 पञकार आणि 350बांधवानी भाग घेतला व 350 दिव्यांग बाधंवाना पञकार संघाकडून दिवाळी भेट मनून किटचे वाटप करण्यात आले. मागील काही वर्षापासून मी वैयक्तिक, पक्ष संघटना, व सामाजिक दृष्ट्या दिव्यांगाच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असून ,त्यांचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत याच एकमेव हेतूने, सेलूत  3 डिसेंबर हा दिव्यांग दिन उत्साहात साजरा करत आहोत.  मात्र  दिव्यांगांच्या बाबतीत पालिका प्रशासन ,कायम उदासीन असून संपूर्ण दिवंगांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही .त्यामुळे यापुढे दिव्यांगाचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी ,नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्याचे आश्वासन, परभणी जिल्हा परिषद चे माजी सभापती अशोक काकडे यांनी दिले आहे. ते येथील हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित दिव्यांग दिनानिमित्त रविवार ०३ डिसेंबर रोजी बोलत होते. 
यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ऋतुराज साडेगावकर, पत्रकार संघाचे महंमद इलियास, कांचन कोरडे, लक्ष्मण बागल, किशोर कटारे अबरार बेग ,अशोक उफाडे, तसेच माजी न प सदस्या शोभाताई कोरडे ,एसटी महामंडळाचे चीलवंत, संघर्ष दिव्यांग संघटनेचे जावेद पठाण, अबरार शेख ,आदींची प्रमुख उपस्थिती होती.येथील हुतात्मा स्मारक परिसरात रविवार ०३ डिसेंबर रोजी सकाळी मराठी पञकार 85 वा वर्धपान दिना निमित्त.सेलू मराठी पञकार संघाच्या वतीने आणि जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सेलू, डॉक्टर असोसिएशन संघटना सेलू, व संघर्ष दिव्यांग संघटना सेलू  यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते  पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे महंमद इलीयास यांनी केले . यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. सुनील कुलकर्णी ,डॉ. राजेंद्र केवारे, डॉ. अरविंद बोराडे ,डॉ. अशोक नाईकनवरे ,डॉ. आशिष डक ,डॉ. अनुराग जोगदंड ,डॉ. कैलास आवटे ,डॉ. सतीश लिपणे ,डॉ. प्रवीण जोग, डॉ. कारके, डॉ.श्रीनिवास मोरे, डॉक्टर रायते ,डॉ. सुदर्शन मालानी ,डॉ. गजमल ,यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच परभणी येथील सरस्वती डेंटल कॉलेजचे डॉ. अपूर्वा सोनी, डॉ. किरण सोनटक्के, डॉ. सीमा राठोड, डॉ. पल्लवी दाशेडवाड याची उपस्थिती होती. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांगांना उपयोगी किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .तसेच सर्व उपस्थित दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे , किशोर साळवे यांनी केले आहे .तर पत्रकार निसार पठाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी डॉक्टर्स असोसिएशन, पत्रकार संघ ,सेलू तालुका डिजिटल मीडिया व दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह दिव्यांगांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मोहसीन  काचंन कोरडे,  संजय मूंढे,  सतोंष गरड, दिलीप मोरे, रामेश्र्वर बहीरट,निरज लोया, राधाकिशन कदम,  , संजय मुंढे, श्रीपाद कुलकर्णी, रेवणअप्पा साडेगावकर, अबरार बेग,डिजिटल मीडियाचे सतीश आकात, निळकंठ पवार, थथोथ   गणेश सवणे संदीप वरकड, विठ्ठल राऊत ,रोहित झोल या सर्व पञकारांनी  पुढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.