सेलू येथील साखळी उपोषणास तालूक्यातील निपाणी टाकळी सह करडगाव, डिग्रस जहांगीर,आंबेगाव आदी गावातील सकल मराठा समाजाने पदयात्रा काढून दिला पाठिंबा.

शिवाजी शिंदे 
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू :- तालुक्यासह गावागावात आरक्षणाची ढग कायम  करण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सेलू  तालुक्यातील निपाणी टाकळी, करडगाव, डिग्रस जहांगीर,आंबेगाव  येथील सकळ मराठा समाजाने सेलू  शहरातील साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान पदयात्रा काढली. ही पदयात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ते गोविंद बाबा चौक,जवाहर रोड, क्रांती चौक   करून ही पदयात्रा लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ येऊन साखळी उपोषणास पाठिंबा देऊन  साखळी उपोषण करणार आहे. या पदयात्रेमध्ये निपाणी टाकळी, डिग्रस जहांगीर, करडगाव, आंबेगाव सह सर्व सकल मराठा समाज सहभागी होऊन  एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच मिळाले पाहिजे, जय भवानी जय शिवराय, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले  हा लढा जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सुरू राहणार. सरकारने मराठ्याचा अंत पाहू नये. लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे. असा सल्ला  सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला या पदयात्रेत शाळेतील लहान बालक आणि बालिका सह, निपाणी टाकळी,करडगाव,
डिग्रस जहागिर,आंबेगाव    येथील सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने हजर राहून आपली उपस्थिती लावली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.