शिरोळ शहरात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी  दर्शनाबरोबर घेतला महाप्रसाद लाभ

शिरोळ : प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी, समर्थांच्या  जयघोषात हजारो भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकाचे दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची   पालखीचे सोमवार १९ डिसेंबर  रोजी दुपारी २ वाजता स्वामीभक्त   बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी चव्हाण कुटुंब व शिरोळ शहरातील स्वामी भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने त्यांचे स्वागत केले यानंतर अनेक स्वामी भक्तांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाची पूजन केले. त्यानंतर बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी रात्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
पहाटे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व पादुकास अभिषेक घालून पूजन करण्यात आले तसेच पालखी सोबत आलेल्या सर्व वारकरी बांधवांना येथील स्वामी समर्थ ग्रुपच्या सदस्यांनी अभंगस्नान घालून त्यांची सेवा केली यावेळी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय चव्हाण बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण स्वामीभक्त सत्यजित काशीद चंद्रकांत भाट सुशांत चव्हाण शंतनू चव्हाण मोहन माने कृष्णराव मोरे अंकुश पाटोळे दीपक मोहिते यासीन शेख शामराव काशीद स्वप्निल मोरे प्रकाश कोळी उत्तम आरगे सुरेश माळी तानाजी माने उल्हास पाटील देवेंद्र काशीद पारस भाट आदित्य जाधव यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
बुधवार २० रोजी सकाळी ९ वाजता  बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पालखीचे जल्लोष स्वागत करण्यात आले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी जि प सदस्य दलितमित्र अशोकराव माने , भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग काळे, दत्तचे संचालक दरगु गावडे माजी  नगरसेवक पंडित काळे, धनाजी पाटील नरदेकर, दिलीपराव माने, चंद्रकांत महात्मे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संचालक व स्वामी समर्थ परिक्रमाचे प्रमुख संतोष भोसले यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखीचे आगमन झाल्यानंतर या ठिकाणी संत पूजा, दिंडी पूजन, नामस्मरण, भजन सेवा ,अन्नपूर्णा पूजन ,श्रींची महाआरती झाल्यानंतर दुपारी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला   
 राजीव भैया यांचे ,,जगूया जीवन रोगमुक्त तणावमुक्त,, या विषयावर  प्रबोधनपर  व्याख्यान  दुपारी चार वाजता प्रसायदान  झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची पालखी मौजेआगरकडे रवाना झाली श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यासाठी चंद्रकांत महात्मे, रवींद्र महात्मे , दिलीपराव माने, धनाजी आरगे, संतोष बन्ने, , उत्तम पाटील, वसंत चुडमुगे,  मोहन पुजारी, सुरज काळे यांच्यासह शिरोळ शहर सत्संग वारकरी सांप्रदाय व स्वामी समर्थ भक्तानी परिश्रम घेतले ,, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.