यड्राव येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .

यड्राव (प्रतिनिधी ) ः येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .                येथील बुध्द विहार येथे विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रा . प . सद्स्य महेश कुंभार व बाबासो राजमाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .                           यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर , महावीर पाटील , माजी सरपंच उल्हास भोसले , सरदार सुतार , दत्तात्रय साळोखे ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , मंगल कांबळे , प्रमोद कांबळे , यशवंत सुतार , सौ . सारीका भोसले , सतीश भोसले , शहापूर पोलीस ठाणेचे कर्मचारी राजीव पाटील , पोलीस पाटील जगदिश सपकाळ , व समाज बांधव उपस्थित होते .                              तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस ग्रा . प . सद्स्या मंगल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .                                             यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर , ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , महेश कुंभार , बाबासो राजमाने , सौ . वैशाली काळगे , ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , राजू पाटील , दतात्रय साळोखे , शहापूर पोलीस ठाणेचे कर्मचारी , पोलीस पाटील व ग्रा . प . कर्मचारी उपस्थित होते .                                             येथील तलाठी कार्यालय येथे महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी सरपंच उल्हास भोसले व पत्रकार उत्तम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .                          यावेळी ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , कर्मचारी विजय कोळी , प्रमोद कांबळे , व रोहन कांबळे उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.