यड्राव ग्रामसभेत अध्यक्ष पदावरुन गोंधळ . सत्ताधारी व विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला , ग्रामसभा गोंधळात रद्द .

यड्राव (प्रतिनिधी - उत्तम जगताप )  यड्राव ( ता .शिरोळ) येथील ग्रामसभेचे सुरुवातीलाच ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरुन  जोरदार वादावादी सुरू झाली.ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असे सांगितले त्या ग्रामस्थातून सभेचे अध्यक्ष निवडावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.त्यामुळे सुरू असलेला वाद पाहून सरपंच असं सर्व सत्ताधीश सदस्यांनी सभा त्याग केला.परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवकस धारेवर धरले.यावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी घोषणा झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.परंतु ग्रामसेवकांनी सरपंचच ग्रामसभेचा अध्यक्ष असल्याचे यावर  मात्र ठाम राहिल्याने कोरम पूर्ण असतानाही  सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. 
आज ग्रामसभेमध्ये सभागृहात सन 2023 - 24 व 2024 -  25 च्या अंदाजपत्रकास मंजुरी करणे सह विविध  विषयावर , चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते.या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी ग्रामसभा सोशल मीडिया मधून आवाहन  करण्यात आल्याने आजची सभा वादळी  होणार यावर शिक्कामोर्तब   झाले होते.
     सकाळी दहा वाजता ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घ्यावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास धारेवर धरले.त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती येई  पर्यंत सुमारे एक तास ग्रामस्थांना ताटकळत बसावे लागले. 
   त्यानंतर सभेस  प्रारंभ करण्यात आला ग्रामसेवक उमेश रेळेकर यांनी सर्वांना  सोबत करून सभेचे अध्यक्ष पद सरपंच कुणालसिंह   नाईक-  निंबाळकर यांनी स्वीकारावे असे  सुचविले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेऊन ही  ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांतून सभा अध्यक्ष  म्हणून निवड करावी अशी मागणी जोरदार लावून धरली.त्यामुळे गोंधळास  प्रारंभ झाला.यावेळी सभेचा अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतो त्यामुळे तो निवडता येणार नाही असे सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले.त्यांनी  अध्यक्ष पदास विरोध केला.वादावादी वाढत असल्याने सरपंच उपसरपंच व सत्ताधारी सदस्यासह  समर्थकांनी सभेतून जाणे पसंत केले.यावेळी याची साम्राज्य केली आहे असे सांगितले तर ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने ही सभा झालीच पाहिजे यासाठी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना घेरावा  घातला .यावेळी माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने ग्रामस्थांनी त्यामध्ये समर्थन  दर्शविले.त्यामुळे ही  सभा रद्द झाल्याचे लेखी पत्र ग्रामसेवकाकडून दिल्याने ग्रामस्थांनी सभागृह सोडले .    यावेळी शहापूर पोलीसांचा चोख बंदोबस्त होता . सदर ग्रामसभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . 
      चौकट
सभा रद्द केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सरपंच केबिन समोर येऊन पाणी आमच्या हक्काचे ,  नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन पार्वती औद्योगिक वसाहतीस पाणी देण्यास विरोध दर्शविला.तर कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पार्वतीला  पाणी देणारच अशा घोषणा सत्ताधारी गटाकडून देण्यात आल्या त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले . 
       चौकट : बजेटच्या प्रश्नावरून विकासात्मक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर गावसभा बोलविण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष पदसिद्ध सरपंच असतात असे प्रशासन सांगत होते. बजेट बाबतची संपूर्ण माहिती व सूचना सरपंच व प्रशासनाला असतात. मात्र याला जलजीवनचे वळण लावायचा प्रयत्न झाला. काही लोकांनी गोंधळ घातला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सभा त्याग करून ग्रामपंचायत प्रवेशद्वारा जवळ आलो. बीडीओंचे मार्गदर्शन घेऊन  पुढील ग्रामसभेचे नियोजन करावे अशी मागणी केली. राजकारणासाठी विकासात काहीजण खेळ घालत आहेत. सत्ताधाऱ्यांना विकास कामांचा फायदा होऊ नये म्हणून विरोधकांनी आजच्या सभेत गोंधळ घातला. अशा प्रवृत्तींचा मी निषेध करतो असे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
                                                     चौकट --  ग्रामस्थातून ग्रामसभेचा अध्यक्ष निवडला जावा अशी आमची मागणी होती.गावच्या विकासाला आमचा विरोध नाही.परंतु सरपंचांनी मीच अध्यक्ष होणार या भूमिकेला आमचा विरोध आहे.सत्ताधारी गटाने सभेतून पळ काढला.या सभेला 168 ग्रामस्थांची उपस्थिती असताना त्यांचे म्हणणे ऐकण्याचे मानसिकता सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही.त्यामुळे सत्ताधारी गटाने ग्रामस्थांचा अपमान केला आहे.त्याचा मी निषेध करतो . 
   ग्रा.प .सदस्य हरीश नाईक .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.