कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहास पुरस्कार प्रदान .

हातकणंगले

 इंगळी ता . हातकणंगले येथील प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार इंगळी यांना त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहास डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला .
        अखिल भारतीय शब्द मंथन  समूहाच्या माध्यमातून वाळवे खुर्द  ता कागल  येथील रविवार दिनांक २४ डिसेंबर २३ रोजी संपन्न झालेल्या  साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते 
 कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहा ची निवड केली होती . निखारा हा पेटला ' कवि सरकारांच्या कविता ' नांगरणी व हिरवा माझा मळा इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत . तसेच फास हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे . त्याचप्रमाणे प्रातिनिधिक काव्यसंग्रह ' संमेलन विशेषांकांचे संपादन केले आहे .
  दरवर्षी विविध साहित्यकृतीला अखिल भारतीय शब्द मंथन समूहाचे डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येते. यासाठी त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहाची निवड केली होती यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील . राजन मुठाणे नसीम जमादार  संमेलनाचे मुख्य आयोजक तानाजी आसबे सर व मान्यवर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.