एचडीएफसी बँक मॅनेजर ला हिंदुत्ववादी संघटनेने विचारला जाब.
हुपरी येथील एचडीएफसी बँक यांच्याकडून बँकेच्या ग्राहकांना नोटीस व स्टेटमेंट देण्यात येते या स्टेटमेंट वरती शहाजान यांचा फोटो आहे असे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी बँकेला नोटीस दिली होती. आठ दिवसांमध्ये याचा खुलासा व्हावा अन्यथा बँकेला टाळे ठोक करण्यात येईल असे सांगितले होते. आज परत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बँकेमध्ये जाऊन बँकेच्या बँक मॅनेजरना याविषयी विचारले असता बँक मॅनेजर यांनी याविषयी हेड ऑफिस ला ईमेल केलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया मिळतात आम्ही तुम्हाला याविषयी योग्य ते उत्तर देऊ असे सांगितले. संतप्त कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत कडक शब्दात होत्या. कार्यकर्त्यांनी सांगितले जर तुम्हाला फोटो टाकायचाच असेल तर राष्ट्रीय पुरुषांचा फोटो त्या वरती टाका व शहाजान यांचा फोटो हटवा. अशी त्यांनी मागणी केली यावेळी ओमकार आढावकर, अभिजीत माणकापूरे ,ओमकार जांभळे, रोहित देसाई, शिवदास माने, कपिल सुतार, कृष्णात सुतार, प्रताप भोसले, प्रशांत साळुंखे, रवींद्र गायकवाड ,अभिजीत काजवे, राहुल शिराळे ,सचिन पाटील, रोहन काजवे,आधी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
टिप्पण्या