पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री केशवराज बाबासाहेब महारांजाच्या यात्रेनिमित्त लोकप्रिय चांडाळ चौकटीच्या करामती कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दिनांक 28 डिसेंबर शुक्रवार रोजी मा. आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव 2023 निमित्त चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार मेघना दीदी  साकोरे बोर्डीकर यांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी मंचावर मा. प्राध्यापक किरण पाटील सर, संतोषजी मुरकुटे (जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण), डॉक्टर पंडितराव दराडे (विधानसभा अध्यक्ष),दिनकरजी वाघ,रवींद्रजी डासाळकर,संजयजी लोया, संतोष कुलकर्णी सर, श्रीमती ललिता गिल्डा,करुणा कुलकर्णी मॅडम ,डॉ ऋतुराज साडेगावकर,माऊली ताटे,अशोक दादा अंभोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. सेलू हे सांस्कृतिक शहर असून तो वारसा जपण्याच्या हेतूने सेलू शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या हेतूने माननीय आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर यांनी हा उपक्रम राबविला. भारतीय जनता पार्टी च्या संयोजन समितीने व त्यांच्या टीमने केलेल्या व्यवस्थापनाची ...

गौसेवेने सर्व सांसारीक दुःख निवारण होतत - प.पू. गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : आज श्री गोविंदबाबा दादूपंथी मठ गौशाळाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे विमोचन रोकिडीया हनुमान मंदिर, मोंढा, सेलु येथे प.पू.गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुर्यकांत जाधव,जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, आनंद सोनी, मदनलालजी करवा,नंदलालजी परताणी,सुरेशजी राठी,रामप्रसाद साबु,विजयकुमारजी लोया, रामेश्वर सोमाणी,श्रीनिवास बाहेती, शिवप्रसादजी काबरा,मनोहर भराडीया, द्वारकादासजी करवा,वैद्य साहेब हे उपस्थित होते स्व.आसराबाई रामवल्लभजी डालिया यांच्या प्रथम पुण्य स्मृती व्हेदर  आयोजीत प.पू गोवर्ती श्री अशोक पारीक यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन डालिया परिवार सेलु यांनी केले असता त्या प्रसंगी गोसेवेचे महत्व महाराजनी गौशाळाच्या २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन करताना सांगितले.

राजे फाऊंडेशन कडून राधानगरी धनगरवाडा येथे कपडे वाटप

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी - .श्री.मालोजीराजे छत्रपती आणि मा.सौ.श्री.मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून आज राधानगरी येथील धनगरवाडा व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये जुने नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच धनगर वाडा येथील ग्रामपंचायत व शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच यावेळी त्या लोकांचे व तेथील असलेल्या शाळेची माहिती घेण्यात आली आणि राजे फाउंडेशन कडून त्या लोकांची माहिती घेऊन येथून पुढे त्यांना  राजे फाउंडेशन कडून नेहमी सहकार्य राहील असे सांगण्यात आले. यावेळी राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा.अंजुम देसाई,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.शितल चौगले,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा मा.उमा पाटील,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद,उत्तम शेलार, अल्ताफ शेख, कोल...

श्रीराम प्रतिष्ठाने सुरभी महोत्सवातून सेलू शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण केली- आमदार मेघनादिदी बोर्डीकर

इमेज
परभणी जिल्हा प्रतिनिधी - शिवाजी शिंदे. शिवपुत्र संभाजी महानाट्याने उपस्थितांच्या अंगावर आले शहारे. शिवपुत्र संभाजी महानाट्य :- १५० विद्यार्थी सहभाग. ज्ञानतिर्थ विद्यालयाचा 'रंग मराठी मातीचा' सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.   चि. वैद्यनाथ हारकळ व कु. श्रुती बोराडे विशेष पुरस्काराने सन्मानित. सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवानिमित्य ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा व शिवपुत्र संभाजी महानाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम (२८) वार गुरुवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, सुरभी महोत्सवाचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. प्रा. किरण पाटील, भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी मूरकटे, सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. पंडीतराव दराडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मा. प्रशा...

शैक्षणिक क्षेत्रात श्रीराम प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान - मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या "ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड" सांस्कृतिक कार्यक्रमाने सेलूकरांची मने जिंकली. सेलू : सेलू (ता. 27) डिसें. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सुरभी महोत्सव अंतर्गत एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी "ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड " या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या विद्याविहार संकुलात सादर करण्यात आला. मूल्यसंस्कार, भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गा बाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन  सेलू-जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार मा. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, उपशिक्षणा धिकारी परभणी मा. गजानन वाघमारे, मंठा तालुक्याचे पीआय म...

श्री केशवराज बाबासाहेबांचा यात्रा महोत्सव. शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद. सेलूमध्ये दर्शनासाठी रीघ.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : शिर्डीचे संत साईबाबा चे सदगुरू व सेलू चे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या (व्यंकुशाह) २२४ व्या यात्रा महोत्सवाचा मंगळवारी २६ डिसेंबर रोजी (श्री दत्त जयंती) मुख्य दिवस होता. यानिमित्ताने महापूजा महाआरती झाली. व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित पारंपारिक भंडारा महाप्रसाद घेण्यासाठी सेलूसह परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी ही सकाळ पासूनच रीघ होती. दुपारी साडेबारा वाजता श्री च्या तीर्थप्रसाद शिंपनानंतर श्री साईबाबा मंदिर परिसरात महाप्रसादाला सुरूवात झाली. यावेळी मुकेश बोराडे अशोक मंत्री गंगवाल माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे सतीश दिग्रसकर राजू पटेल बाळु मंत्री आदीसह व्यापारी मंडळाची मोठी उपस्थिती होती. महीला पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सेलुतील व्यापारी मंडळ साईबाबा संस्थान श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान यात्रा कमिटी तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा शिस्तबद्ध वाटपासाठी परिश्रम घेतले . सोमावरी श्रीमद भागवत कथेची सांगता झाली. सभापती अशोक ...

कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहास पुरस्कार प्रदान .

इमेज
हातकणंगले  इंगळी ता . हातकणंगले येथील प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार इंगळी यांना त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहास डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला .         अखिल भारतीय शब्द मंथन  समूहाच्या माध्यमातून वाळवे खुर्द  ता कागल  येथील रविवार दिनांक २४ डिसेंबर २३ रोजी संपन्न झालेल्या  साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते   कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहा ची निवड केली होती . निखारा हा पेटला ' कवि सरकारांच्या कविता ' नांगरणी व हिरवा माझा मळा इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत . तसेच फास हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे . त्याचप्रमाणे प्रातिनिधिक काव्यसंग्रह ' संमेलन विशेषांकांचे संपादन केले आहे .   दरवर्षी विविध साहित्यकृतीला अखिल भारतीय शब्द मंथन समूहाचे डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येते. यासाठी त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहाची निवड केली होती यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील . राजन मुठाणे नसीम जमादार  संमेलनाचे मुख्य आयोजक ताना...

वाळवे खुर्द येथे अखिल भारतीय साहित्य समूहाचे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले .

इमेज
कवि सरकार इंगळी     वाळवे खुर्द ता कागल अखिल भारतीय शब्द समूहाचे  साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . सकाळी ग्रथदिंडीने संमेलनास सुरवात झाली . संमेलनाच्या स्थळी दिंडी पोहचल्या नंतर संमेलनाच्या सुरवातीस तानाजी आसबे सरांनी मान्यवरांचे स्वागत केले .  संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांनी ग्रामीण भागातील साहित्य संमेलन हि आजच्या धावपळीच्या युगात माणसांना जगण्याचं बळ देत असतात असे सांगितले. तर उद्घाटक श्री राजन मुठणे कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद  यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात मौलिक मार्गदर्शन केले यावेळी. प्रमुख उपस्थीती डॉ. गणपती कमळकर गट शिक्षण अधिकारी कागल ' श्री बाळासाहेब निंबाळकर सचालक प्रा.शि बँक ' श्री आवेलीन देसाई चेअरमन सरपिजीराव पत संस्था ' श्री शामराव देसाई शि.वि. अधिकारी हे होते . तर सुत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.  दुसऱ्या सत्रात कथाकथन अध्यक्ष श्री परशराम आंबी यांचे अध्यतेखाली संपन्न झाले यात  ' त्यांनी भाकरचोर  हि कथा सादर केली तर दत्तात्रय परीट यांनी यू आर ग्रेट .' संयोगिता महाज...

श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.-दिपस्तंभ प्रतिष्ठान चा उपक्रम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सुप्रसिद्ध विनोदी मराठी वेबसिरीज   चांडाळ चौकटीच्या करामतीचे कलाकार सेलूत. सेलू(प्रतिनिधी):साई बाबाचे गूरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त शहरात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतिने केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव  निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन  जिल्हा परिषद प्रशाला, नूतन रोड सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. सेलू हे सांस्कृतिक शहर असून हा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने हे प्रथम वर्षी उचललेले पाऊल असून इथून पुढेही अशाच प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव घेऊन शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचा प्रयत्न आहे. गूरूवार दि.२८ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेली सुप्रसिद्ध अशी विनोदी आणि अनेक चालू ग्रामीण  घडामोडीवर भाष्य करणारी,अनेक प्रश्नांना  वाचा फोडणारी, जवळपास दोनशे पन्नास एपिसोड पूर्ण करणारी अस्सल ग्रामीण मराठी मध्ये असलेली तुफान विनोदी वेबसिरीज  चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाची म...

शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळायला हवा:ॲड. सुभाष हिंदूजा

इमेज
कोल्हापूर : (सुरेश केसरकर) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचेवतीने गांधीनगर येथे दिनांक १९ डिसेंबर रोजी प्रशासकीय गतिमानता अंतर्गत गांधीनगर होलसेल व किरकोळ व्यापारी असोसिएशन यांचेकरीता आस्थापना नोंदणी, मंडळाच्या योजना, उपक्रम तसेच मंडळाच्यावतीने आयोजित करणेत येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहीती देणेत आली. यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी व्यापारी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुभाष हिंदुजा यांनी, उपस्थित असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सभासद यांना कामगार कल्याण निधी का भरावा लागतो ? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्या दुकानात ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व दुकानदारांनी संबंधित वाहन चालक, सेल्समन तसेच सर्व कामगार बंधू भगिनींना शासनाच्या योजना व उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ नुसार म. का. क. मंडळाला निधी भरणे बंधनकारक असलेचे स्पष्ट प्रतिपादन केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्यावतीने "श्रमकल्याण युग" विशेषांक देऊन स्वा...

श्रीराम प्रतिष्ठान येथे सुरभि महोत्सवाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सव २०२३ चे आयोजन उद्या ता.२४ ते २९ डिसेम्बर २०२३ दरम्यान विद्याविहार संकुल येथे करण्यात आले आहे सुरभि महोत्सावाच्या स्पोर्ट्स डे (ता.२४) सकाळी ९.०० वा. या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करतात. साई नाट्य मंदिर  येथे २४ डिसेम्बर सकाळी ९.००वा वैयक्तिक नृत्य स्पर्धा, तसेच  क्युरिअस कीड्स, फिनकीडस व पॉस्परस पब्लिक स्कूलचा  “ FOLK DANCE OF INDIA ” (ता.२९) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स  इंग्लिश स्कुल सांस्कृतिक कार्यक्रम “ TRANSITION A CHANGE IN WORLD ” या वर आधारीत कार्यक्रमाचे  (ता.२८) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. जिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ रंग मराठी मातीचा ” तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण (ता.२8) डिसे. वेळ सायं.०५.३० वा विद्यालयाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. प्रिन्स आदिवासी प...

शिरोळ शहरात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी  दर्शनाबरोबर घेतला महाप्रसाद लाभ

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी, समर्थांच्या  जयघोषात हजारो भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकाचे दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची   पालखीचे सोमवार १९ डिसेंबर  रोजी दुपारी २ वाजता स्वामीभक्त   बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी चव्हाण कुटुंब व शिरोळ शहरातील स्वामी भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने त्यांचे स्वागत केले यानंतर अनेक स्वामी भक्तांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाची पूजन केले. त्यानंतर बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी रात्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व पादुकास अभिषेक घालून पूजन करण्यात आले तसेच पालखी सोबत आलेल्या सर्व वारकरी बांधवांना येथील स्वामी समर्थ ग्रुपच्या सदस्यांनी अभंगस्नान घालून त्यांची सेवा केली यावेळी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय चव्हाण बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण स्वाम...

उज्वल यशासाठी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक.लेफ्टनंट संघमेश शिवानी कैलास मलवडे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :19 डिसेंबर विद्यार्थिनींनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत, जिद्द,चिकाटीने कसोशीने प्रयत्न करावयास हवे.आपण यशाच्या कितव्या शिखरावर आहोत यापेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत हे महत्वाचे आहे." असे प्रतिपादन लेफ्टनंट संघमेश शिवानी कैलास मलवडे यांनी केले.नूतन कन्या प्रशाला सेलू येथे आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट संघमेश मलवडे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे , लेफ्टनंट संगमेश मलवडे,कैलास मलवडे,शिवानी मलवडे,संगीता खराबे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळवलेल्या संघमेश मलवडे यांचा आणि पालक  कैलास मलवडे आणि शिवानी मलवडे यांचाही शाल, श्रीफळ,पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कैलास मलवडे यांनी NDA मध्ये मुलींनाही सुवर्णसंधी असून विद्यार्थिनींनीही तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. अ...

सेलूचा संगमेश मलवडे अवघ्या 22 व्या वर्षी लेफ्टनंटपदी दाखल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. संगमेशच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा.  सेलू : वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी सेलू येथील संगमेश शिवानी कैलास मलवडे भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी ) लेफ्टनंट पदी दाखल झाले आहेत. सेलू शहरातून एन डि ए मार्फत थेट लेफ्टनंट पदी दाखल होण्याचा मान  संगमेशला मिळाला आहे.संगमेशची आई शिवानी आणि वडिल  कैलास मलवडे दोघे पण शिक्षक आहेत.संगमेशचे शिक्षण सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठाण संचलित प्रिन्स इंग्लिश मध्ये  झाले. छत्रपती संभाजी नगरच्या सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्थेत राहून पुढील शिक्षण पूर्ण केले.खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील आयएमएम मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.9 डिसेंबर रोजी संगमेशची लेफ्टनंट पदी निवड झाली. सेलू तालुक्यासाठी ही अभिमानाची व भूषणाची बाब असल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सेलूकरांच्या वतीने रेल्वे स्टेशन पासून संगमेशची ढोल ताशाच्या निनादात आनंदोत्सवात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व पुष्पहाराने अनेक मान्यवरांनी उत्स्फुर्तप...

भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन.,पाच लाख प्रथम तर तीन लाख द्वितीय क्रमांकाचे बक्षीस

इमेज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव घरोघरी अभियाना अंतर्गत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आयोजित विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी विचारमुल्यांचा प्रसार, प्रचार आणि जागर करण्यासाठी... प्रथमच महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठी भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता हा भव्य महानिबंध महास्पर्धेचा विषय असून प्रथम क्रमांकाचे 5,00,000/- (एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके), द्वितीय क्रमांकाचे 3,00,000/- (पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके) तर तृतीय क्रमांकाचे 1,00,000/- (पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके) भव्य अशी महाबक्षीसे आहेत. सोबत उत्तेजनार्थ 50 बक्षीसे प्रत्येकी दहा हजार (एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके) बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास 2,000/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे. या निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त 500 स्पर्धकांनाच प्रवेश भे...

सेलूत मनोज जरांगे पाटील यांची 22 डिसेंबरला होणार अति विराट सभा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सभेचे  नियोजन  संपन्न.मनोज जरांगे पाटील एक दिवस अगोदरच मुक्कामी. मुस्लिम समाजाने घेतली पाणीपुरवठा करण्यांची जवाबदारी. सेलू : सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान परिसरात होणाऱ्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल यांची एक तरी सभा व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून सकल मराठा समाजाची इच्छा होती शेवटी अथक पर्यत्ना नंतर 22 डिसेंबर ही तारीख  सभेसाठी प्राप्त झाली.त्या अनुसंगाने  सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या भव्य अश्या मैदानात सभेची जोरदार तयारी चालू झाली आहे. सेलू तालूक्यातून सर्व समाज बांधवांनी जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक समाजातील बांधवानी सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांची जेवण्याची उत्तम अशी व्यवस्था जागोजागी नाव  न सांगण्याच्या अटीवर करण्यात आली आहे; नावापेक्षा समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे या भावनेतून त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी व्यक्त केल्या. मुस्लिम समाजातील बंधूनी सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व लोंकाच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर सभेसाठ...

महाराष्ट्र महिला केसरी पै अमृता पुजारीचा होणार शिरोळकरांच्या वतीने रविवारी नागरी सत्कार

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळची सुकन्या पै अमृता शशिकांत पुजारी हिने चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवून शिरोळ शहराचे नाव देशपातळीवर उज्वल केल्याबद्दल पै अमृता पुजारी हिचा शिरोळ नगरपालिका व समस्त नागरिक यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार रविवार२४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात करण्यात येणार आहे चांदीची गदा मानपत्र सन्मान चिन्ह एक वर्षाची विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे असा निर्णय नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला   महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिचा सत्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे होते     बैठकीच्या प्रारंभी युवानेते पृथ्वीराज यादव आणि सर्वांचे स्वागत करून महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारीच्या सत्कार समारंभा...

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून सत्कार समारंभ

इमेज
कोल्हापुरातील पाचगाव येथील रायगड कॉलनीतील सामान्य कुटुंबातील व्यक्ती मा.रवींद्र घाटगे हे खरे मंगल कार्यालय या ठिकाणी वाचमन (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतात ते सकाळी 7 वाजता कामाला जातात आपण समाजाचे काही तरी देणे लागते या उद्देशाने त्यांनी कामाला जाण्याअगोदर सकाळी 6 वाजता रक्तदान करून आपल्या कामाला त्यांनी सुरवात केली तसेच पाचगाव मधील गृहणी भारती सावंत यांनी आपले घर सांभाळत गरीब  परिस्थितीतून एक पाचगाव मिसळ हे छोटेसे हॉटेल चालू केले त्यामुळे या दोघांचा आज राजे फौडेशन तर्फे राजे फौडेशन ची प्रतिमा आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी राजे फौडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. शुभम शिरहट्टी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजीव भालेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव मंजूर सय्यद, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.शितल चौगुले करवीर तालुका सचिव नंदकुमार पोवार कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा सौ.उमा पाटील आदी उपस्थित होते.

केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरीचे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश

इमेज
हुपरी - सागर पाटील. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेची लहान गट जनरल चॅम्पियनशिप केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरीला प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्षीय चषक क्रीडा 2023-2024 यजमानी हुपरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यासाठी क्रीडा  मार्गदर्शन हुपरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धनाजी शेवाळे सर, केंद्र मुख्याध्यापिका सौ मृणालिनी शिंदे , सौ संगीता माने मॅडम, श्री शिवाजी सुतार सर, श्री राजीव कोरे सर , श्री अमोल कोळी सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या वर्षाची लहान गट जनरल चॅम्पियनशिप केंद्रीय प्राथमिक शाळेला मिळाल्याबद्दल सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.  विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे- 50 मीटर धावणे (मुली) -आराधना उत्तम पाटील- प्रथम  100 मीटर धावणे (मुले) साईनाथ विनोद रायमाने- प्रथम  100 मीटर धावणे (मुली) आराधना उत्तम पाटील- प्रथम  लांब उडी (मुले) साईनाथ विनोद रायमाने- प्रथम  लांब उडी (मुली) आराधना उत्तम पाटील- प्रथम  35 किलो कुस्ती (मुली)- आराधना उत्तम पाटील- प्रथम  30 किलो कुस्ती (मुले) साईराम प्रकाश गुणगुडे- ...

यड्राव ग्रामसभेत अध्यक्ष पदावरुन गोंधळ . सत्ताधारी व विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला , ग्रामसभा गोंधळात रद्द .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी - उत्तम जगताप )  यड्राव ( ता .शिरोळ) येथील ग्रामसभेचे सुरुवातीलाच ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरुन  जोरदार वादावादी सुरू झाली.ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असे सांगितले त्या ग्रामस्थातून सभेचे अध्यक्ष निवडावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.त्यामुळे सुरू असलेला वाद पाहून सरपंच असं सर्व सत्ताधीश सदस्यांनी सभा त्याग केला.परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवकस धारेवर धरले.यावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी घोषणा झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.परंतु ग्रामसेवकांनी सरपंचच ग्रामसभेचा अध्यक्ष असल्याचे यावर  मात्र ठाम राहिल्याने कोरम पूर्ण असतानाही  सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली.  आज ग्रामसभेमध्ये सभागृहात सन 2023 - 24 व 2024 -  25 च्या अंदाजपत्रकास मंजुरी करणे सह विविध  विषयावर , चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते.या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी ग्रामसभा सोशल मीडिया मधून आवाहन  करण्यात आल्याने आजची सभा वादळी  होणार यावर शिक्कामोर्तब...

दानम्मा देवी यात्रा व कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

इमेज
खोतवाडी: सालाबाद प्रमाणे याही वर्षी खोतवाडी गौरीशंकर नगर येथे  दानम्मा देवी ची यात्रा व दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  पहाटे 5.30 वाजता महा अभिषेक सौ.व श्री. उमाकांत कोळकी,  सौ.व श्री. चंद्रकांत चौगुले,  सौ. व श्री. दत्तात्रय स्वामी,  सौ.व श्री. ईश्वर कराडकर  सौ.व श्री. संजय मुरतले या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महा अभिषेक संपन्न झाला.  यानंतर 11.30 वाजता दानेश्वरी महिला मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व दोन ते अडीच हजार महिला सुवासिनींना त्यांची ओटी भरून सुवासिनी पूजन करून महाआरती करण्यात आली याप्रसंगी माझी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती सौ व श्री संजय तेलनाडे महाआरतीसाठी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता  प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.व श्री. संजय तेलनाडे तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय श्री डॉक्टर राहुल आवाडे व वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सेक्रेटरी किशोर पाटील यांच्या शुभहस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या वेळेला सहा ते सात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ...

सेलू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : आज दिनांक 14/12/2023 रोजी नागपूर येथे भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच जिंतूर सेलू विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ.मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तसेच सरपंच मालेटाकळी माऊली ताठे आणि केशवराव सोळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सेलू तथा सरपंच ढेंगळी पिंपळगाव  यांनी ग्रामपंचायत  सदस्य,सोसायटी सदस्य आणि कार्यकर्त्या समवेत आज नागपूर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत  1) मालेटाकळी ज्ञानेश्वर कचरु ताठे (तालुकाध्यक्ष रा.काॅ.पा.सेलू,संचालक कृ.उ.बा.स.सेलू , सरपंच,ग्रामपंचायत, माले टाकळी, चेअरमन वि.वि.का.से.सह.सो.मालेटाकळी) 1) माले टाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते खालील प्रमाणे.. १) विठ्ठल अंजीराम ताठे (उपसरपंच) २) अंबादास रामभाऊ ताठे (मा.उपसरपंच तथा सदस्य ग्रामपं...

एचडीएफसी बँक मॅनेजर ला हिंदुत्ववादी संघटनेने विचारला जाब.

इमेज
हुपरी -प्रतिनिधी            हुपरी येथील एचडीएफसी बँक यांच्याकडून बँकेच्या ग्राहकांना नोटीस व स्टेटमेंट देण्यात येते या स्टेटमेंट वरती शहाजान यांचा फोटो आहे असे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी बँकेला नोटीस दिली होती.  आठ दिवसांमध्ये याचा खुलासा व्हावा अन्यथा बँकेला टाळे ठोक करण्यात येईल असे सांगितले होते. आज परत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बँकेमध्ये जाऊन बँकेच्या बँक मॅनेजरना  याविषयी विचारले असता बँक मॅनेजर यांनी याविषयी हेड ऑफिस ला ईमेल केलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया मिळतात आम्ही तुम्हाला याविषयी योग्य ते उत्तर देऊ असे सांगितले. संतप्त कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत कडक शब्दात होत्या. कार्यकर्त्यांनी सांगितले जर तुम्हाला फोटो टाकायचाच असेल तर राष्ट्रीय पुरुषांचा फोटो त्या वरती टाका व शहाजान यांचा फोटो हटवा. अशी त्यांनी मागणी केली यावेळी ओमकार आढावकर, अभिजीत माणकापूरे ,ओमकार जां...

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न

इमेज
कोल्हापूर - राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची आज पहिली बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले समाजातील वंचित लोकांचे जे काहीही प्रश्न असतील ते सोडवण्याची भूमिका राजे  फौंडेशन कडून जाहीर करण्यात आली तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे या बैठकीत जाहीर करण्यात आले.तसेच राजे फौंडेशन ची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षपदी मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शुभम शिरहट्टी, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी अंजुम देसाई,पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव पदी मंजूर सय्यद, उत्तम शेलार,कोल्हापूर जिल्हा सहसचिव पदी इम्रान मुजावर, अल्ताफ शेख,रहीम पिंजारी, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी शितल चौगुले, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षपदी स्वरूपा खुरंदळे, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षपदी उमा पाट...

सुरेश केसरकर यांचा मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मान

इमेज
पुणे : वार्ताहर आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटक यांच्याप्रती सातत्याने अभ्यासूवृत्ती व सकारात्मकता जोपासत भरीव कार्य करीत असल्यामुळे उचगाव, ता. करवीर येथील सुरेश केसरकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन पुणे च्या मुख्य सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी न्यायाधीश मा. सोनल पाटील, जीएसटी आयुक्त मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर, डॉ. कुमार सप्तर्षी, निवृत्ती न्यायाधीश मा. आर. व्ही. जताळे, पोलीस उप आयुक्त संदीप गिल्ल (भापोसे), संविधान अभ्यासक सुभाष वारे तसेच सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचबरोबर कार्यक्रमाचे निमंत्रक सन्मा. विकास कुचेकर, संचालक सन्मा. श्रीकांत (अण्णा) जोगदंड व सर्व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत - मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित, कार्यक्रमामध्ये "मानवा...

समृद्ध महामार्ग व इतर मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर १३ डिसेंबर रोजी मोर्चा.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी. शेतकऱ्यांनी मोठ्या सहभागी व्हावे. -अशोक काकडे. सेलू : महाराष्ट्रातील जालना-नांदेड या समृद्धी महामार्गसह , सुरत-चेन्नई महामार्ग, पुणे रिंग रोड, पुणे-बंगळूरू महामार्ग यासाठी कवडीमोल भावाने जमिनी देणार नाही या व्यावसायिक प्रकल्पासाठी बिगरशेती दराने किमान 2 कोटी प्रति एकर मोबदला द्यावा. या मागणीसाठी महामार्ग व प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र, च्या वतीने दि 13 डिसेंबर 2023 बुधवार रोजी नागपूर येथे भरलेल्या विधिमंडळ अधिवेशनावर प्रचंड मोर्चा व सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक महामार्गाचे (बिझनेस कॉरीडॉर) अनेक प्रकल्प राज्य व केंद्र शासनाच्या पुढाकाराने हाती घेतले जात आहे. 1.जालना-नांदेड समृद्धी महामार्ग, 2.सुरत-चेन्नई महामार्ग, 3.पुणे रिंग रोड, 4.पुणे-बंगळूरू महामार्ग याचबरोबर नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग ई. या व्यावसायिक प्रकल्पात प्रामुख्याने कार्पोरेट, खाजगी विकासक आणि देशी विदेशी वित्तसंस्था यामध्ये मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. व्यावसायिक महामार्ग असे (बिझनेस कॉरीडॉर) स्वरूप असलेल्या प...

सेलू येथील साखळी उपोषणास तालूक्यातील निपाणी टाकळी सह करडगाव, डिग्रस जहांगीर,आंबेगाव आदी गावातील सकल मराठा समाजाने पदयात्रा काढून दिला पाठिंबा.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :- तालुक्यासह गावागावात आरक्षणाची ढग कायम  करण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सेलू  तालुक्यातील निपाणी टाकळी, करडगाव, डिग्रस जहांगीर,आंबेगाव  येथील सकळ मराठा समाजाने सेलू  शहरातील साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान पदयात्रा काढली. ही पदयात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ते गोविंद बाबा चौक,जवाहर रोड, क्रांती चौक   करून ही पदयात्रा लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ येऊन साखळी उपोषणास पाठिंबा देऊन  साखळी उपोषण करणार आहे. या पदयात्रेमध्ये निपाणी टाकळी, डिग्रस जहांगीर, करडगाव, आंबेगाव सह सर्व सकल मराठा समाज सहभागी होऊन  एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच मिळाले पाहिजे, जय भवानी जय शिवराय, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले  हा लढा जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत ना...

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023नाचणी : पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन

इमेज
राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव (इलुसिन कोरोकाना) Eleusine coracana असे आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागातील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागात डोंगराळ भागात केली जाते. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी नाचणी हे प्रमुख तृणधान्य पिक आहे. राज्यात सन २०२२-२३ मध्ये या पिकाची ६८,६१२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती व त्यापासून ९५,७४५ टन उत्पादन मिळाले. २०२२-२३ मध्ये राज्याची नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.९६ क्विंटल/ हेक्टर एवढी होती. राज्यातील सर्वाधिक नाचणी पिकाचे क्षेत्र कोल्हापूर (१६५५४ हेक्टर), नाशिक (१५३२६ हेक्टर), पालघर (११६८९  हेक्टर) आणि रत्नागिरी (९६६५ हेक्टर) या जिल्ह्यामध्ये आहे. नाचणी व इतर पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्व : कमी  पक्वता कालावधी असणारी पिके. दुष्काळात  तग धरण्याचा गु...

A taluka level conference and seminar for women was organized at Chikkodi by division under Sri Kshetra Dharmasthala Village Development Yojana.

इमेज
Chikodi - He said that women should enter all fields to become self-reliant.  On this occasion, he said that the efforts made by Tirthodbhava Dharmasthala for the development of women are commendable.   Mrs. Revathi spoke from the chairperson position and said that due to the grace of Dr. Virendra Heggade, Dr. Virendra Heggade, Matoshree Dr. Hemavathi, special efforts are being made for women's empowerment and women's development.  The Heggade.Dharmasthal village development project has done a great job in strengthening the economic, social, educational and mental health of women in rural areas.  He said that women should take advantage of this.       On this occasion, dignitaries expressed their views.  Dignitaries were felicitated in the program.    In the seminar organized on the occasion, Prof. Maitreni Gowder gave a lecture on the topic of Parents' Role in Moral Education of Children.  At this time, they themselves ...

ನೇಜದಲ್ಲಿ ವಿಶ್ವರತ್ನ ಡಾ.ಬಾಬಾಸಾಹೇಬ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 67ನೇ ಮಹಾಪರಿನಿರ್ವಾಣ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು

इमेज
ವಿಶ್ವರತ್ನ ಡಾ.ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 67ನೇ ಮಹಾಪರಿನಿರ್ವಾಣ ದಿನದ ಅಂಗವಾಗಿ ನೇಜ್ ತಾಲೂಕಾ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ಸಾಂಬಾ ಪ್ರತಿನಿಧಿ (ಅಮರ್ ಮನೆ) ಶುಭಹಾರೈಸಿದರು.  ನೇಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಬೌದ್ಧ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಜೈ ಭೀಮಾ ಮಂಡಲದ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು.  ಸಾಮೂಹಿಕ ತ್ರಿಶರಣ ಮತ್ತು ಪಂಚೀಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಕಾಂಬಳೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು.  .  ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಡಾ.ಜೈಸಿಂಗ್ ದುರ್ಗಣ್ಣವರ.ಕುಂದಣ್ಣ ಕಾಂಬಳೆ ಗ್ರಾ.ಪಂ.ಸದಸ್ಯ.  ಸಚಿನ್ ಘೋಂಗ್ಡಿ.  ಮಹಾವೀರ ನಡುಮನಿ.  ಗೌತಮ್ ಕಾಂಬಳೆ.  ಗೌತಮ್ ನಾಯ್ಕ್.  ರಾಘು ಕಾಂಬಳೆ, ಅನೀಲ ಮಧಾಳೆ.  ಯುವರಾಜ್ ಕಾಂಬಳೆ, ಅಭಿಷೇಕ ಕಾಂಬಳೆ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ಬೌದ್ಧ ಬಾಂಧವರು ಹಾಗೂ ಜೈ ಭೀಮ್ ಯುವಕ ಮಂಡಲದ ಯುವಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.

पट्टण कोडोली येथे १५वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन .

इमेज
कवि सरकार इंगळी प.कोडोली. ता.हातकणंगले. येथे १५ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे रविवार दिनांक १० डिसेंबर २३ रोजी आयोजन केले आहे . सदर साहित्य संमेलन अध्यक्षा. सौ.शैलजा मोहन परमणे. कोल्हापूर. (कवियत्री व लेखिका.) असून उदघाटक मा किशोर शिंदे पोलिस निरीक्षक हुपरी हे करणार आहेत तर फोटो पुजन मा दलितमित्र अशोकराव माने  जि.प. सदस्य कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात येणार आहे .कविसंमेलन अध्यक्षा  ,शिलाताई वसंतराव चिवरकर    (कवियत्री ,किर्तनकार.व पर्यावरण प्रमी. कारंजा. जिल्हा वासिम आणि प्रमुख पाहुणे  श्रीकांत पाटील.(घुणकी,कोल्हापूर)  (प्रसिद्द कांदबरीकार) हे आहेत व अभिनेत्री ऋतूजा पाटील  छ संभाजीनगर अथिती म्हणून असणार आहे . संमेलनात परिसंवाद.मोबाईल शाप की वरदान या विषयाकर कवि भाऊसो कांबळे ममदापूर व कवि गोविंद श्रीमंगल लातूर ,माया बडवे हुपरी. हे मार्गदर्शन करणार आहेत  कथाकथन सादरकर्ते .प्रा.पी . एस . पाटील.तारळे खुर्द ता .राधानगरी . आणि लेखक बालाजी मन्नाडे पालघर यांचे आहे  संमेलनात पहिल्या सत्रात सकाळी कविसंमेलन असून त्यात सौ,आरत...