पोस्ट्स

महाशिवरात्री निमित्त सेलू येथील साईबाबा मंदिरात महाभिषेक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  माजी नगराध्यक्ष मा. विनोद हरिभाऊ काका बोराडे व मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.  सेलू : गेल्या वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त सेलू येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात दि. 26 फेब्रुवारी बुधवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंदिरात जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील् जलाश्याने शहरातील 301 जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री  महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महा आरती बुधवारी सकाळी 10:30 वाजता करण्यात येणार आहे. अभिषेकासाठी लागणारे साहित्य मंदिरा तर्फे देण्यात येणार आहे.सायंकाळी 7:30 वाजता स्वरांगण प्रस्तुत 'स्वरभक्ती संध्या' हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवलिंगाचा अभिषेक करून पुण्यार्जन करावे,व रात्री भक्तिगितांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ काका बोराडे, मंदिर समिती चे संचालक व मित्र मंडळानी केले आहे.

सफाई कामगारांना 52 लाख किमान वेतनाचा फरक देण्याचा जयसिंगपूर नगरपालिकेला व ठेकेदारला आदेश.

इमेज
इचलकरंजी -  जयसिंगपूर नगरपालिकेकडे कंत्राटी काम करणाऱ्या 48 कामगारांना किमान वेतन प्रमाणे पगार दिला नाही म्हणून किमान वेतन फरकाची केस सहायक कामगार आयुक्त कार्यालय तथा सक्षम प्राधिकारी अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे दाखल केली होती. या केसच्या अनुषंगाने तिन्ही बाजूंनी आपली बाजू मांडून केस चालली त्या केस चा निकाल माननीय जानकी भोईटे यांनी  सर्व कामगारांना किमान वेतनेचा फरक म्हणून 51, 87, 360/- देण्याचा आदेश केला.      .  जयसिंगपूर नगरपालिके मार्फत ठेकेदार यांचेकडे सफाई कामगार, कचरा उठाव करणारे कामगार व रस्ते साप करणारे कामगार असे 48 कामगारांनी कीमान वेतन प्रमाणे पगार मिळत नसलेची व सहा महीन्याच्या कीमान वेतन फरकाची तक्रार दाखल केली होती जयसिंगपुर नगरपालीका, कंत्राटदार मायक्रो इकोनॉमीकल एनव्हायमेंट सोल्युशन प्रा. ली. व कामगार प्रतिनिधी यांचे म्हणने व युक्तीवाद ऐकून घेऊन सक्षम प्राधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांनी निकाल दिला  या निकालातून महिला कामगारास प्रत्येकी 1,21,820 तर पुरुष कामगारास प्रत्येकी 82,338/- रुपये फरक मिळणार आहे. सर्...

शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

इमेज
यड्राव: विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक ध्येय निश्चित करायला त्या दृष्टीने केलेले वाटचाल निश्चितपणे आपले ध्येयपूर्ती होतें.यापूर्वीची शिक्षण पद्धती व आत्ताची शिक्षण पद्धती मध्ये अमोलाग्रह बदल झाला ते विद्यार्थ्यांनी समजून घेऊन ज्ञान आत्मसात करणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती  विश्वजीत कांबळे यांनी केले.             ते येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूल  मध्ये राष्ट्रसेवा फाउंडेशन इचलकरंजी त्यांच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.       विद्यार्थ्याना फाउंडेशन च्या वतीने शिक्षण साहित्य देण्यात आले . तसेच महानगरपालिका कर आयुक्त  सोमनाथ कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका  मनीषा पाटील यांनी केले . याप्रसंगी अमित कांबळे, अनिकेत कांबळे, साहिल शेवाळे, विनायक साळुंखे उपस्थित होते. . हेमांगी कांबळे यांनी सूत्रसंचलन  केले व भास्कर ढोले  यांन...

‘लॉयन्सच्या’ शिबीरात 380 रुग्णांची मोफत तपासणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  69 रुग्णांची परतूर येथे अत्यल्प दरात होणार नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सेलू : दि.24 येथील लॉयन्स क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र व दंतरोग तपासणी शिबीरात एकूण 380 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 69 रुग्णांची लॉयन्स नेत्रालय परतूर येथे अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सेलूतील हुतात्मा स्मारक येथे रविववार 23 फेबु्रवारी रोजी  मोफत नेत्र व दंतरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लबचे रिजनल चेअर पर्सन लॉ. दिलीप मोदी, लॉ.संजय गुप्ता, लॉ. राजेश लुनिया, लॉ. मनोहर खालापुरे, डॉ.चव्हाण तालुका ध्यक्ष सुयश पटवारी सचिव डॉ बाळासाहेब जाधव, डॉ. शैलेश मालाणी, संजीवनी खालापुरे यांची उपस्थिती होती. नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे तंत्रज्ञ अशोक पौळ,आकांक्षा केवारे, पुजा पाचारे, कवीता दुगाने तर दंत तपासणीसाठी डॉ. विजय सावंगीकर, डॉ. कुंदन राऊत, डॉ. सौ. भाबट, डॉ. परेश बिनायके, रुग...

सेलूत शुक्रवारी प्रकाश कारत यांचे व्याख्यान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला. सेलू : दि.24 सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाले अंतर्गत शुक्रवार 28 फेबु्रवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘भारतीय संविधानाची 75 वर्षे - नवीन आव्हाने’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यानामालचे हे 49 वे पुष्प आहे. नूतन विद्यालय परिसरात आयोजित व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, चिटणीस प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर,व्याख्यानमाला संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सहसंयोजकप्रा.सुभाष बिरादार यांनी केले आहे.

महाकुंभमेळ्याच्या समाप्तीपूर्वी प्रयागराज मध्ये भाविकांची तोबा गर्दी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  प्रयाग राज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्या साठी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रयागराज शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर  आला आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येने ६० कोटींचा टप्पा ओलंडला आहे. कुंभमेळ्याला काही दिवस शिल्लक राहिले असल्याने महाशिव रात्रीच्या आधी मोठ्या प्रमाणावर भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार १३ जानेवारी रोजी सुरूवात झालेल्या कुंभमेळ्यात दररोज एक कोटींहून अधिक भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत. यामुळे प्रयागराज आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. प्रयागराज येथील वाहतूक कोंडीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्या मधून आलेल्या चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांकड...

नृरसिंह वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल लोंढे यांचा सत्कार

इमेज
 श्री दत्त महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नृसिंहवाडी येथे शिरोळचे  सामाजिक  कार्यकर्ते ज्यांनी गेली विस ते पंचवीस वर्षे समाजाची सेवा करीत कधिच व कसलीही कोणतीही अपेक्षा न करता प्रामाणिक पणे   गोरगरीबांचे प्रश्न सोडवत चांगल्या विचारांची देवाणघेवाण करीत तहसील कार्यालया पासून पोलिस स्टेशन पंचायत समिती पर्यंत तसेच कला. क्रीडा. सांस्कृतिक‌ क्षेत्रामध्ये देखील आपली भुमिका बजावणारे. अनिल लोंढे यांची राष्ट्रीय मांग गारूडी क्रांती सेना या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव पदी नागपूर येथे निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र नृरसिंह वाडी येथे श्री अभिजीत जगदाळे (सरकार) माजी सरपंच नृसिंहवाडी.तसेच श्री ऋषीराज शिंदे सोसायटी चेअरमन कवठे गुलंद यांनी अनिल लोंढे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यावेळी श्री वैभव घोरपडे सामाजिक कार्यकर्ते कुरुंदवाड. श्री किरण मुडशिंगे सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष. श्री पांडुरंग सुंकी सामाजिक कार्यकर्ते नृसिवाडी. श्री गवळी त्रिमूर्ती हॉटेलचे मालक. व इतर मान्यवर उपस्थित होते.

मलिकवाडला महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून विविध कार्यक्रम.

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड. मलिकवाड तालुका चिकोडी येथील श्री. मल्लिकार्जुन (महादेव) मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. बुधवारी (ता.२६) व गुरुवारी (ता.२७) या दोन दिवशी मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता सामूहिक दंडवत, सात वाजता महाभिषेक, श्री महादेवाची महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच तीन वाजता सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पाचवी ते सातवी (प्राथमिक गट), आठवी ते दहावी (माध्यमिक गट) आणि खुला गट तिन्ही विभागात गाव पातळीवर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासाठी विजेत्यांना रोख रक्कम बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राचे वितरण केले जाणार आहे. गुरुवारी २७ रोजी सकाळी ११ वाजता महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

खंडपीठ प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या दि.२४ रोजी भेट घेणार : श्री.राजेश क्षीरसागर. माणिक पाटील - चुयेकर यांच्या उपोषण स्थळी भेट

इमेज
कोल्हापूर दि.२३ : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता सहाही जिल्ह्यातील जनतेने, वकील, पक्षकार, आदींनी मागणी केली आहे. कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीकरिता मागील ३० वर्षापासून आंदोलन सुरु आहे. सुमारे १ कोटी ५८ हजार जनता, १७ हजार वकील आणि पक्षकारांची कोल्हापुरात खंडपीठ व्हावे हि रास्त मागणी आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी तातडीने उद्या दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली . पदवीधर मित्र संस्थेचे अध्यक्ष माणिक पाटील -चुयेकर यांचे खंडपीठाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटचे टोक मुंबई पासून सुम...

जलजीवन मिशन पाईपलाईनचे काम तत्काळ पूर्ण करा, शिंगणापूर ग्रामपंचायतला हणमंतवाडी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन

इमेज
शिंगणापूर, ता.२३ : हणमंतवाडी येथील शिंगणापूर कमानीपासून ते हणमंतवाडी कमानीपर्यंत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होवून एक वर्ष ओलांडले आहे. शिंगणापूर जलजीवन मिशन च्या पिण्याच्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागल्यामुळे हणमंतवाडी रस्त्याचे काम ३ महिने प्रलंबित आहे. पाईपलाईन चे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी 'ग्रामपंचायत हणमंतवाडी' च्या वतीने सरपंच व ग्रामस्थांनी शिंगणापूरच्या लोकनियुक्त सरपंच रसिका अमृत पाटील यांना निवेदन दिले.                               शिंगणापूर कमानीपासून हणमंतवाडी कमान रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे. शिंगणापूर जलजीवन मिशन पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे त्याचे काम ३ महिने सुरू आहे. पाईपलाईन बसविण्यासाठी केलेली खुदाई व पाईपलाईन ची गळती वेळेत न काढल्यामुळे रस्त्याच्या कंत्राटदाराने पाईपलाईन चे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ता होवू शकत नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हणमंतवाडी गावात केएमटी बस शिंगणापूर कमानीपर्यंतचं येते, रस्ता खराब असल्याने वडापही गावात य...

भाषिक नाट्य महोत्सवांची गरज - दिग्दर्शक वामन केंद्रे.१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ   झाल्याची  घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक  मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला. ‘मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरस...

राज्यस्तरीय आदर्श स्त्री पुरस्कारासाठी सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी यांची गौरवपूर्ण निवड!

इमेज
इचलकरंजी : पोलिस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श स्त्री पुरस्कार यंदा सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी (रा. शिंदे मळा, खोतवाडी) यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिलांना दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी "आदर्श राणी लक्ष्मीबाई पुरस्कार" सौ. तुकशेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. ९ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे.  सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाला अपघाती विमा योजना लागू करा.

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आग्रही मागणी. --------------------------- मुंबई : (वार्ताहर) शासकिय कर्मचारी व अधिकारी यांना अपघाती विमा योजनेचा लाभ मिळतो. त्याच धर्तीवर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना देखील सदर अपघाती विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, या करीता मंत्रालय मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने भेट घेऊन सदर आषयाची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय विकास कार्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्रमशक्तीचे आदरपूर्वक संवर्धन करणे हे राज्य सरकारचे संविधानिक कर्तव्य आहे.   पृथ्वी हि शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती, कष्ठकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, हे जर त्रिकालबाधीत सत्य असेल तर, त्या कष्टकरी / श्रमजीवी कामगार व त्यांच्या कुटूंबियांनी सर्वार्थाने काळजी घेणे ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि जर ती पाळली नाही तर, तो नितीमुल्ये व लोकशाहीशी केलेला द्रोह ठरतो. नियमाधीन हक्कांवर गदा येईल अशी कोणतीही बाब घडू नये, यासाठी भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क, अधिकार व...

टाकळीवाडी गुरूदत्त कारखाना येथे फळे वाटप.

इमेज
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली,  टाकळीवाडी येथे गुरूदत्त साखर कारखाना येथे शिव जयंती निमित्त कारखान्यावरील ऊस तोड कामगार व गरजुना फळे वाटत करण्यात आले त्यावेळी उपस्थित कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, या वेळी उपस्थित निशांत गोरे, ऋत्विक गोरे, निलेश गोरे, भारत पाटील, अवधूत कदम, प्रशांत उपस्थित होते.

मंतुरा मोररजी देसाई निवासी शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी समारंभ

इमेज
रायबाग (कर्नाटक) – कर्नाटक गव्हर्नमेंट सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अंतर्गत कार्यरत मोररजी देसाई निवासी शाळा, मंतुरा येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण व जीवनातील यशासाठी नेहमीच सक्रिय राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थान मोररजी देसाई यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक एम. कोटाबा जी होते. या वेळी एस. एस. अ. पी. बेंडावा डी, उदय बू रोजी, वडील साहेब मेघडी, पी. डी. ओ. के. आर. शिरागोंडा, सचिव केम्पाना कुलिगोडा, के. ए. पाटील, वाय. बी. कंबल, व्ही. बी. वांजेरी, पी. आर. करनजी, आर. एस. पूजेरी, एस. एस. हिरेमठ, एम. निपिल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन केले. एस. बी. पोल्ट्रीसह सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवर्गाने विशेष मेह...

नवे दानवाड च्या ग्रामपंचायत सदस्या सौ पूनम शिवाजी साळुंखे यांना नारी शक्ती शिव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित.

इमेज
दसरा चौक शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने नवे दानवाड गावच्या ग्रामपंचायत सदस्या सौ पूनम शिवाजी साळुंखे यांना नारी शक्ती शिव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मा,  हातकणंगले तालुक्याचे आमदार अशोकराव माने, सतोंष आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी, मा सचिन रमेश माने, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय महोत्सव समिती, मा आमोल कुरणे संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फौडीशन व मचिंद्र रूईकर, स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले त्यावेळी जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे मोठ्या उत्सवात वाघजाई नगर परिसरात शिवजयंती उत्सव साजरा.

इमेज
19/02/2025 रोजी स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आले आयोजक नवनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांनी मिळून  शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले.  वाघजाई मंदिर ते सच्यामाता  मंदिर पाणी टाकीपर्यंत वाजत गाजत  छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती रथामध्ये ठेऊन मिरवणूक काढण्यात आली.  .मिरवणुकीची सुरुवातीची आरती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शरद झिने साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश (भाऊ )वनशिव त्याचबरोबर त्यांचे सहकारी अमर चाकोरे, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव, डॉ.सुचेता भालेराव,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे,     झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, शहाजी मुसळे,पत्रकार कांताभाऊ राठोड, भास्कर शिंदे, प्रकाश कर्चे ,अक्षय पवार, विनायक घुले स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ शिंदे , सुरज पाटील ,करण रावल,यश दिघे, विशाल धेंडुळे, वैभव नाकाडे,ओम भाग्यवंत,वेदांत गोरे, श्रीनिवास कट्टा इतर कार्यकर्ते व माता-भगिनी व वाघजाई नगर परिसरातील नागरिक यांच्य...

बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :३९५ शिवजयंती चे औचित्य साधून सेलू येथील बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . शिवजयंतीच्या निमित्ताने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये  माता पालकां साठी जिजाऊ एक आदर्श माता व पुरुष पालकांसाठी जाणता राजा शिवछत्रपती या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली .माता पालकांसाठी राजमाता जिजाऊ व शिवबा फोटो स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले होते त्याचबरोबर विद्यार्थ्यां साठी घेतलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर इयत्ता ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,चौथी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य रूपात शिवचरित्र सादर केले.निबंध व  राजमाता जिजाऊ व शिवबा फोटो स्पर्धेत विजेते झालेल्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नूतन विद्याल य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्य नारायणजी लोया  उपाध्यक्ष डी. के देशपांडे...

देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने शिव संविधान जागर

इमेज
कुरुंदवाड/प्रतिनिधी:   शिवजयंती आणि संविधानbbb अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने विविध व्यक्ती व संघटनांना संविधानाबाबत जागृती पत्रके आणि संविधान परिचय पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले.      तेरवाड (ता. शिरोळ) येथे कै. गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत तेरवाड यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्यांना शिव संविधान पत्रके देण्यात आली. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकीचे वाचन करण्यात आले. जयसिंगपूर महावितरण कार्यालयामध्ये उमेश आवळे यांनी शिव संविधान पत्रकाचे वितरण करून रयतेचा राजा छ. शिवाजी महाराज व संविधानिक मूल्ये याबाबत प्रबोधन केले. जयपाल कांबळे यांनी जांभळी येथे संविधान प्रबोधन व शिव संविधान पत्रकाचे वाटप केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन देशभक्त मानवतावादी चळवळीचे कार्यकते निलेश खांडेकर, दीपक कडाळे, अमोल मधाळे, पंचामृत कडाळे, मिलिंद कुरणे, कुमार कांबळे  बसवराज कांबळे यांनी केले.  यापुढे शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये संविधान प्रबोधनाचे कार्य चळवळीच्या वतीने हाती घेण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सा...

दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ. सुरेश हिवाळे यांचा सहभाग.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक कवी डॉ. सुरेश हिवाळे यांचा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात सहभाग आहे. सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी रोजी होते आहे. या मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात डॉ. सुरेश हिवाळे यांच्या ' भारतीय ' कवितेची निवड झाली असून सदर कविता ते रविवार ( दि. २३ ) रोजी संमेलनातील महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात सादर करणार आहेत. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सहभागा बद्दल डॉ. सुरेश हिवाळे यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी , मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्या ध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, डॉ. अशोक पाठक, डॉ. शरद ठाकर, किशोर कटारे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, र...

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलना ने झाली. यानंतर डॉ. संजय रोडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळात असलेली आवश्यकता स्पष्ट केली. तसेच शाळेमध्ये पुतळा उभारण्या मागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे आणि डी.एड. कॉलेजच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी रत्नपारखी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ...

रमेश ठोंबरे यांचे निधन.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) ः पिंपळे गुरव (ता. हवेली ) जि. पूणे येथील रमेश शामराव ठोंबरे वय (44 वर्षे ) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते.                                                    त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय व बहीण असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी येथे आहे. त्यांच्या अच्यानक झालेल्या निधनाने परिसरात हळहळ होत आहे.

जिद्दीने ध्येयाचा पाठलाग केल्यास सुयश: कुणालसिंह नाईक निंबाळकर., एस पी वाय हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना निरोप व सेवापूर्ती समारंभ.

इमेज
यड्राव: दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. या परीक्षे त मिळालेल्या गुणांवरच पुढील शिक्षण अवलंबून आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक भवितव्य भवितव्याचे ध्येय समोर ठेवून जिद्दीने त्याचा पाठलाग केल्यास निश्चित आपल्या जीवनात स्थैर्य निर्माण होते असे प्रतिपादन सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केले        ते येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये आयोजित दहावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व तात्यासाहेब भतगे यांच्या सेवापूर्ती या संयुक्त कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.       विद्यालयामध्ये 32 वर्षे सेवा केलेल्या तात्यासाहेब भतगे यांचा सेवापुर्ती निमित्त  सपत्नीक सत्कार  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.      या प्रसंगी घनश्याम कुंभार , भरत माणगावे  ,श्रावणी कांबळे , बी . डी . ढोले . एस . के . मालगावे,व्ही . बी . दुर्गार्डे, अनघा क्वाणे, बळवंत  कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त...

प्रल्हाद साळुंखे यांना शिव प्रेरणा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

इमेज
दसरा चौक शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने  पत्रकार प्रल्हाद साळुंखे यांना शिव प्रेरणा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मा,  हातकणंगले तालुक्याचे आमदार अशोकराव माने, सतोंष आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी, मा सचिन रमेश माने, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय महोत्सव समिती, मा आमोल कुरणे संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फौडीशन व मचिंद्र रूईकर, स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले त्यावेळी जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री बीरा कल्लाप्पा पुजारी यांचे आकस्मिक निधन.

इमेज
चिकोडी तालुक्यातील ननदी येथील धनगर समाजाचे प्रमुख व ननदी ग्रामपंचायत माजी सदस्य तसेच लिबरल को-ऑपरेटिव्ह सोसायटी नंनदी शाखेचे संचालक तसेच बसवेश्वर विविध उद्देशगळ ग्रामीण अभिवृद्धी संघ ननदी चे संचालक श्री बीरा कल्लाप्पा पुजारी वय वर्षे 60 यांचे मंगळवार दिनांक 18 रोजी सायंकाळी आकस्मित निधन झाले त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली नातवंडे असा परिवार आहे माती सवडण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी नंनदी येथे सकाळी नऊ वाजता आहे

केंद्राच्या नक्षा डिजिटल सर्वेला नागरिकांनी सहकार्य करावे. - बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे मत.

इमेज
बोरगांव/प्रतिनिधी.            मोबाईलच्या जमान्यात बदलत्या परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहे, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या  विकसित क्षेत्राला ऊर्जेता अवस्था देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील शहरी व ग्रामीण भागातील गावठाण शेती व बॉर्डर एरियाचे ड्रोन द्वारा सिटीसर्वे करण्याचे कार्य हाती घेतले आहे,  बेळगाव जिल्ह्यातील नक्षा या सिटीसर्वेसाठी बोरगाव व गोकाक या दोन पट्टणपंचायतचे सिलेक्शन करण्यात आले आहे, त्या कारण बोरगाव शहरातील नागरिकांनी या मोहिमेस उत्स्फूर्त  प्रतिसाद देऊन  यशस्वी करावे असे आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मण राव चींगळे यांनी व्यक्त केले. ते बोरगाव येथील श्री वाशीखान  मंदिरात आयोजित शासकीय कार्यक्रमात  बोलत होते.              बोरगांव येथील वासिखान मंदिर येथे कर्नाटक सरकार महसूल विभाग, व भूमापन महसूल व्यवस्था आणि भू दाखला नगर प्राधीकार डिपार्टमेंट आणि बोरगांव पट्टन पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ...

खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
हातकणंगले - शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर,संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा,पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.यानंतर  विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली व छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्या विषयी माहिती सांगितली. तसेच मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास,त्यांनी जिंकलेले किल्ले,या विषयी माहिती थोडक्यात आपल्या मनोगतातुन सांगितली.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्त शिवरायांचा जय घोष करत ढोल ताश्यांच्या गजरात शालेय विद्यार्थी-विद्यार्थींची खोतवाडी परिसरातून रैली काढण्यात आली.        या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीन...

कुरुंदवाड येथे युवकांकडून व्हॅलेंटाईन ला फाटा देत "रोटी डे" साजरा

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे नवतरुणांची महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकीची संस्कृती जपण्यासाठी, सेवेसाठीची प्रामाणिक धडपड. पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असणारा "व्हॅलेंटाईन" हा शब्द अलीकडे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुजत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी चा दुसरा आठवडा जगभर * "व्हॅलेंटाईन वीक" * म्हणून साजरा होतो. त्या अनुषंगाने सात ते चौदा तारखेपर्यंत रोज डे प्रपोस डे असे नानाविध दिवस साजरे केले जातात. या दरम्यान तरुणाईकडून प्रेम प्रदर्शित करण्यापायी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केला जातो. तर काही तरुण याच दरम्यान याला विकृतीचा रंग देत असतात. त्यामुळेच समाजात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, हाणामारीचे प्रसंग ही मोठ्या प्रमाणात या कालावधीत पाहायला मिळतात.नवतरुण उत्साहाच्या भरात कधी अपराधी बनतात व आपल्या आयुष्याला वेगळं वळण देऊन बसतात हे त्यांना देखील कळत नाही.एकीकडे अश्या विकृतीकडे मोठा वर्ग वाहत जात असताना समाजातील काही सुज्ञ तरुण मात्र याला अपवाद ठरतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची सेवेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची संस्कृती...

महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्काराने तुकाराम साळुंखे पाटील सन्मानित.

इमेज
16/02/2025 रोजी बाबू जमजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश 9 वी जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर चंद्रकांत कवळेकर गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री , झाकिर खान सिने अभिनेता, डॉ.एस एन पठाण माजी नागपूर विद्यापीठ कुलगुरू, एन एस खोब,डॉ. संदीप खोचर डॉ. बी एन खरात संस्थापक आय आय आर असोसिएशन, डॉ. अशोक कुमार पगाडिया अध्यक्ष महावीर एज्युकेशन सोसायटी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी  जय हिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी बहुउद्देशी संघटना संस्थापक अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील भाऊसाहेब यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार लातूर जिल्हाचे माजी खासदार सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तुकाराम साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश व संस्थापक अध्यक्ष घडशी समाज संघटना महाराष्ट्र राज्य या पदावर का...

सहारा फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

इमेज
कबनूर: सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी सहारा फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. समाजातील विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना भावी कार्याची ऊर्जा मिळावी, हा पुरस्कार वितरणामागील उद्देश आहे, असे प्रतिपादन पी. एम. पाटील यांनी केले. ते सहारा फाउंडेशन तसेच सहारा ग्रुप ऑफ बिझनेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 2025 च्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी सहारा फाउंडेशन केवळ पुरस्कार देणारी संस्था नसून श्रमजीवी, कष्टकरी, 12 बलुतेदार तसेच इतर घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराद्वारे शाबासकी देणे ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास महेश कांबळे, सचिन सुतार, प्रमोद पाटील, अनिकेत कांबळे, पुण्याच्या पत्रकार प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी सागर जाधव, रेश्मा सनदी...

विटा येथील पत्रकार मारहाण विषयी हातकणगले तहसिलदार यांना निवेदन

इमेज
हातकणंगले - विटा जि सांगली येथील पत्रकार प्रसाद यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली आहे त्याच्या वर कठोर कारवाई होवून पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांना शासनाने न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन हातकणगले येथील पत्रकारा नी नायब तहसीलदार संजय चव्हाण यांना दिले नायब तहसीलदार चव्हाण यानी निवेदन स्विकारून वरिष्ठांना पाठवून दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन दिले यावेळी न्याय न मिळाल्यास तीव्र अंदोलन केले जाईल असेही पत्रकारा नी सांगीतले आहे यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये तालुकाध्यक्ष पापालाल सनदी विनयकुमार पाटील विनोद शिंगे रोहन साजणे गौतम दिवाण सागर जमगे राहूल रत्नपालखे राहूल डोणे गिरीष मधाळे विनोद पाटील सुकमार अब्दागिरे बाबूराव जाधव यासह अनेक पत्रकार उपस्थित होते

शिंगणापूरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला

इमेज
शिंगणापूर, ता.१७ : (ता.करवीर) येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधाऱ्या जवळ आढळला. सुरज शिवाजी पाटील (वय ३५) रा.हरिप्रिया कॉलनी,शिंगणापूर असे  या तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.    पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सुरज पाटील हा शाहूपुरी तीसरी गल्ली येथील एचडीबी या फायनान्स कंपनीमध्ये कामावर होता. शनिवार दि.१५ रोजी तो रात्री ८.३० वाजता आपल्या मोटरसायकलने घरी येण्यासाठी निघाला.कुटुंबियांना मी उशिरा घरी येणार असून तुम्ही जेवण करा असा फोनही केला होता. पण त्यानंतर सुरजचा फोन बंद लागत होता. यामुळे संपर्क होत नव्हता.सोमवारी  दुपारी शिंगणापूर येथील बंधाऱ्याजवळ नदीपात्रात सुरजचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला.पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. सुरजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील, दोन विवाहित बहिणी आहेत. चौकट सुरज हा आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्याबरोबर ताराबाई पार्क येथे आयोजित क्रिकेटचा सामना खेळला होता. घरी निघताना तो गंगावेश मार्गाने शिंगणाप...

गटकळ करियर अकॅडमी चे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. कु. भावना कैलासचंद चौधरी यांची कर सहाय्यक पदी नियुक्ती. सेलू :सेलू येथील गटकळ अकॉडमीने आपल्या अल्पावधी च्या काळात मोठे नावलौकिक केले.प्रा.रामेश्वर गटकळ व प्रा. दीपक गटकळ यांनी यासाठी दिवसरात्र प्रचंड परिश्रम करीत आपल्या अकॉडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीना घडवून मोठ मोठ्या पदावर विराजमान करण्यांचे कार्य केले.यातच काल शुभांगी राऊत हिची पोलिस चालक म्हणून निवड झाली तर आज कु. भावना कैलासचंद चौधरी यांची एमपीएस परीक्षेद्वारे कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली.तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॉडमीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेलू शहरातील मठगल्ली  येथे राहणाऱ्या कु. भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकॉडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन  घेतले आणि दिलेल्या परीक्षेतील घवघवीत यश संपादन प्राप्त केले.तिला गटकळ अकॉडमी चे संचालक प्रा.रामेश्वर गटकळ, दीपक गटकळ व सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सेलूत सामान्य ज्ञान परीक्षेला 2000 विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  शिवजन्मोत्सव उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सहिष्णूतेचे प्रतिबिंब. सेलू : सेलू येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपतीशिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी राजांच्या जिवन चरित्रावर आधारीत रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी  आयोजित तालुका स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील व सर्व जाती धर्मातील 2000 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सहिष्णूतेचे प्रतिबिंब उमटले. येथील नूतन विद्यालय व केशवराज बाबासाहे ब विद्यालय अशा दोन केंद्रावर वर्ग 5वी ते 6वी, 7 वी ते 8वी व 9वी ते 12 वी अशा तीन गटात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात सध्यास्थितीत मोबाईल च्या आहारी गेलेल्या व वाचनापासून दुरावत चाललेल्या शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाच्या प्रवाहात आणून त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचार व कार्यावर आधारित...

वूई टुगेदर फाउंडेशन वतीने संजय गोरख होले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

इमेज
पुणे (हेंद्रज/बच्चेवाडी .)                             दि16फेब्रुवारी 2025   शाळा दुर्गम भागात,पट संख्या कमी,सुविधांची कायमच कमी,दळण वळण जिकरीचे, अश्या अनेक समस्यांना तोंड देत आदर्श,हुशार विध्यार्थी घडविणे हे शिक्षकांना एक आवाहनच असते. हे आवाहन स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी  हेंद्रुज,बच्चेवाडी शाळेचा पदभार स्वीकारला. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ,संगीत,क्रीडा,आदी बाबतीत अत्यन्त हुशार,बनून एक आदर्श निर्माण केला.त्यांनी स्वतः खर्च करून सुरवात केली व गावातील  लोकसहभागातून संगनक,लाऊड स्पीकर,लॅपटेब,स्टेशनरी,लोखंडी कपाट, स्टडी टेबल,वाल कंपाउंड,रंगकाम,ग्राऊंड दुरुस्थी, खेळाचे साहित्य,प्रिंटर ,झेराक्स,आदी साहित्य लोकसभागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला. या सर्व कार्याची दखल घेऊन व पुढेही त्यांनी असेच कार्य सुरु ठेवावे म्हणून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधु...

जीबीसी सिंड्रोम रोगाने निपाणी तालुक्यातील पहिला बळी , - ढोणेवाडीतील घटना,

इमेज
बोरगांव/प्रतिनिधी.  ढोणेवाडी तालुका निपाणी येथील  बाळगोंडा भाऊसो पाटील  वय वर्ष  ६४ व  यांना आठ दिवसांपूर्वी जीबीसी  सिंड्रोम रोगाची लागण झाली होती  त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे jरुग्णालयात   उपचार सुरू असतानाच शनिवार दि.१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला . निपाणी तालुक्यातील जीबीसी सिंड्रोमचा पहिली बळी गेल्याने तालुक्यासह पंचक्रोशीत  एकच खळबळ माजली आहे..       गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) विषाणू  हा आजार राष्ट्रीय पातळीवर असताना त्याचे  लोन ग्रामीण भागा पर्यंत  पसरलेले आहे. .  ढोणे वाडी येथील चौथी वर्गात शिकणाऱ्या एका  विद्यार्थ्याला   जीबीसीची लक्षणे   दिसल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करुन  उपचार सुरू असतानाच  ढोणेवाडी वार्ड नंबर तीन मधील एका ६४ वर्षे इसमाला जीबीसी रोगाची लक्षणे आढळल्याने दि.८  रोजी खाजगी  दवाखान्यातून कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर आठ दिवस उपचार सुरू असतानाच शन...

ट्रॅक्टर पळविणाऱ्या टोळीचा अवघ्या १२ तासांत छडा – बार्शी पोलिसांची विशेष कामगिरी.

इमेज
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ट्रॅक्टर चोरणाऱ्या एका टोळीचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपींना अटक केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव केला आहे. प्रकरणाचा तपशील: बार्शी तालुक्यात एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती. यानंतर बार्शी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे केवळ १२ तासांत आरोपींचा शोध घेण्यात आला. विशेष तपास पथक: या कारवाईत पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक, आणि स्थानिक पोलीस यांचा समावेश होता. संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षकांचा गौरव: या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले आणि त्यांचा गौरव केला. बार्शी पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा त...

सद्गुरू संत सेवालाल महाराज 286 वी जयंती कात्रज सच्यामाता मंदिर भागात मोठ्या उत्सवात साजरी

इमेज
सद्गुरू संत सेवालाल महाराज 286  वी जयंती कात्रज सच्यामाता मंदिर भागात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाचे आराध्य दैवत सदगुरु संत सेवालाल महाराजांची 286 वि जयंती सच्यामाता , मंदिर पाणी टाकी , वाघजाई नगर या भागातील गोर बंजारा बंधू व भगिनी समाज्याच्या वतीने मिळून सेवालाल महाराज की जयच्या घोषणा देत व पारंपरिक वेशभूषा परिधान करून कला नृत्य सादर करत भोसले गार्डन येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर अँड .रमेश खेमु राठोड,  युवा सामाजिक कार्यकर्ते भावी नगरसेवक स्वराज (भैय्या) नमेश बाबर, प्रशांत कांबळे आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष,सागर धमो राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर अध्यक्ष, लालू फुलसिंग झरपला राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर सचिव, कांताभाऊ राठोड पत्रकार, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,  संदीप भाऊ जाधव राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर, रमेश जाधव, रमेश राठोड, शंकर चव्हाण, गोपाळ चव्हाण,किसन राठोड, शंकर पवार,भिमा भाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी गोरं बंजारा बांधव व भगिनी मोठ्या प्र...

बुलढाणा येथील प्रसिद्ध कलाकार धनंजय बोरकर

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावनभूमीत बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील प्रसिद्ध कलावंत धनंजय बोरकर हे आपला जॉब सांभाळून कलाक्षेत्रात खूप चांगलं काम करत असून उत्कृष्ट नेपथ्यकार आहे. तसेच वाय के टी एम (Y K T M) या वेब सिरीज मध्ये आपली कला सादर केली आहे.              धनंजय बोरकर यांनी अर्थातराण्यास (चंचल स्वामी), मी काहीही विसरलो नाही (डॉक्टर देशमुख ),तलाई कुत्तल (रिपोर्टर), नाटेवा नसंप्र (मित्र) अनपेक्षित अनपेक्षित या (सबनीस- लीड) या नाटकात प्रमुख भूमिका केल्या आहे. कलाक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राज्य नाट्य स्पर्धा (कौन्सिलेशन प्राईज), कामगार कल्याण प्राथमिक फेरी( द्वितीय क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी नाटक (प्रथम क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी (अभिनय द्वितीय क्रमांक). या पारितोषकांनी सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कलेबद्दल व पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून धनंजय बोरकर यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी कौतुक केले आहे.