पोस्ट्स

गटकळ करियर अकॅडमी चे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. कु. भावना कैलासचंद चौधरी यांची कर सहाय्यक पदी नियुक्ती. सेलू :सेलू येथील गटकळ अकॉडमीने आपल्या अल्पावधी च्या काळात मोठे नावलौकिक केले.प्रा.रामेश्वर गटकळ व प्रा. दीपक गटकळ यांनी यासाठी दिवसरात्र प्रचंड परिश्रम करीत आपल्या अकॉडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीना घडवून मोठ मोठ्या पदावर विराजमान करण्यांचे कार्य केले.यातच काल शुभांगी राऊत हिची पोलिस चालक म्हणून निवड झाली तर आज कु. भावना कैलासचंद चौधरी यांची एमपीएस परीक्षेद्वारे कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली.तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॉडमीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेलू शहरातील मठगल्ली  येथे राहणाऱ्या कु. भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकॉडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन  घेतले आणि दिलेल्या परीक्षेतील घवघवीत यश संपादन प्राप्त केले.तिला गटकळ अकॉडमी चे संचालक प्रा.रामेश्वर गटकळ, दीपक गटकळ व सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सेलूत सामान्य ज्ञान परीक्षेला 2000 विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  शिवजन्मोत्सव उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सहिष्णूतेचे प्रतिबिंब. सेलू : सेलू येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपतीशिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी राजांच्या जिवन चरित्रावर आधारीत रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी  आयोजित तालुका स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील व सर्व जाती धर्मातील 2000 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सहिष्णूतेचे प्रतिबिंब उमटले. येथील नूतन विद्यालय व केशवराज बाबासाहे ब विद्यालय अशा दोन केंद्रावर वर्ग 5वी ते 6वी, 7 वी ते 8वी व 9वी ते 12 वी अशा तीन गटात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात सध्यास्थितीत मोबाईल च्या आहारी गेलेल्या व वाचनापासून दुरावत चाललेल्या शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाच्या प्रवाहात आणून त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचार व कार्यावर आधारित...

वूई टुगेदर फाउंडेशन वतीने संजय गोरख होले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

इमेज
पुणे (हेंद्रज/बच्चेवाडी .)                             दि16फेब्रुवारी 2025   शाळा दुर्गम भागात,पट संख्या कमी,सुविधांची कायमच कमी,दळण वळण जिकरीचे, अश्या अनेक समस्यांना तोंड देत आदर्श,हुशार विध्यार्थी घडविणे हे शिक्षकांना एक आवाहनच असते. हे आवाहन स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी  हेंद्रुज,बच्चेवाडी शाळेचा पदभार स्वीकारला. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ,संगीत,क्रीडा,आदी बाबतीत अत्यन्त हुशार,बनून एक आदर्श निर्माण केला.त्यांनी स्वतः खर्च करून सुरवात केली व गावातील  लोकसहभागातून संगनक,लाऊड स्पीकर,लॅपटेब,स्टेशनरी,लोखंडी कपाट, स्टडी टेबल,वाल कंपाउंड,रंगकाम,ग्राऊंड दुरुस्थी, खेळाचे साहित्य,प्रिंटर ,झेराक्स,आदी साहित्य लोकसभागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला. या सर्व कार्याची दखल घेऊन व पुढेही त्यांनी असेच कार्य सुरु ठेवावे म्हणून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधु...

जीबीसी सिंड्रोम रोगाने निपाणी तालुक्यातील पहिला बळी , - ढोणेवाडीतील घटना,

इमेज
बोरगांव/प्रतिनिधी.  ढोणेवाडी तालुका निपाणी येथील  बाळगोंडा भाऊसो पाटील  वय वर्ष  ६४ व  यांना आठ दिवसांपूर्वी जीबीसी  सिंड्रोम रोगाची लागण झाली होती  त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे jरुग्णालयात   उपचार सुरू असतानाच शनिवार दि.१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला . निपाणी तालुक्यातील जीबीसी सिंड्रोमचा पहिली बळी गेल्याने तालुक्यासह पंचक्रोशीत  एकच खळबळ माजली आहे..       गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) विषाणू  हा आजार राष्ट्रीय पातळीवर असताना त्याचे  लोन ग्रामीण भागा पर्यंत  पसरलेले आहे. .  ढोणे वाडी येथील चौथी वर्गात शिकणाऱ्या एका  विद्यार्थ्याला   जीबीसीची लक्षणे   दिसल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करुन  उपचार सुरू असतानाच  ढोणेवाडी वार्ड नंबर तीन मधील एका ६४ वर्षे इसमाला जीबीसी रोगाची लक्षणे आढळल्याने दि.८  रोजी खाजगी  दवाखान्यातून कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर आठ दिवस उपचार सुरू असतानाच शन...

ट्रॅक्टर पळविणाऱ्या टोळीचा अवघ्या १२ तासांत छडा – बार्शी पोलिसांची विशेष कामगिरी.

इमेज
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ट्रॅक्टर चोरणाऱ्या एका टोळीचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपींना अटक केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव केला आहे. प्रकरणाचा तपशील: बार्शी तालुक्यात एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती. यानंतर बार्शी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे केवळ १२ तासांत आरोपींचा शोध घेण्यात आला. विशेष तपास पथक: या कारवाईत पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक, आणि स्थानिक पोलीस यांचा समावेश होता. संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षकांचा गौरव: या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले आणि त्यांचा गौरव केला. बार्शी पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा त...

सद्गुरू संत सेवालाल महाराज 286 वी जयंती कात्रज सच्यामाता मंदिर भागात मोठ्या उत्सवात साजरी

इमेज
सद्गुरू संत सेवालाल महाराज 286  वी जयंती कात्रज सच्यामाता मंदिर भागात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाचे आराध्य दैवत सदगुरु संत सेवालाल महाराजांची 286 वि जयंती सच्यामाता , मंदिर पाणी टाकी , वाघजाई नगर या भागातील गोर बंजारा बंधू व भगिनी समाज्याच्या वतीने मिळून सेवालाल महाराज की जयच्या घोषणा देत व पारंपरिक वेशभूषा परिधान करून कला नृत्य सादर करत भोसले गार्डन येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर अँड .रमेश खेमु राठोड,  युवा सामाजिक कार्यकर्ते भावी नगरसेवक स्वराज (भैय्या) नमेश बाबर, प्रशांत कांबळे आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष,सागर धमो राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर अध्यक्ष, लालू फुलसिंग झरपला राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर सचिव, कांताभाऊ राठोड पत्रकार, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,  संदीप भाऊ जाधव राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे शहर, रमेश जाधव, रमेश राठोड, शंकर चव्हाण, गोपाळ चव्हाण,किसन राठोड, शंकर पवार,भिमा भाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी गोरं बंजारा बांधव व भगिनी मोठ्या प्र...

बुलढाणा येथील प्रसिद्ध कलाकार धनंजय बोरकर

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावनभूमीत बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील प्रसिद्ध कलावंत धनंजय बोरकर हे आपला जॉब सांभाळून कलाक्षेत्रात खूप चांगलं काम करत असून उत्कृष्ट नेपथ्यकार आहे. तसेच वाय के टी एम (Y K T M) या वेब सिरीज मध्ये आपली कला सादर केली आहे.              धनंजय बोरकर यांनी अर्थातराण्यास (चंचल स्वामी), मी काहीही विसरलो नाही (डॉक्टर देशमुख ),तलाई कुत्तल (रिपोर्टर), नाटेवा नसंप्र (मित्र) अनपेक्षित अनपेक्षित या (सबनीस- लीड) या नाटकात प्रमुख भूमिका केल्या आहे. कलाक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राज्य नाट्य स्पर्धा (कौन्सिलेशन प्राईज), कामगार कल्याण प्राथमिक फेरी( द्वितीय क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी नाटक (प्रथम क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी (अभिनय द्वितीय क्रमांक). या पारितोषकांनी सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कलेबद्दल व पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून धनंजय बोरकर यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी कौतुक केले आहे.

जयश्री आदमाने यांचे निधन.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथील जयश्री लक्ष्मण आदमाने वय 47 वर्षे यांचे दुःखद निधन झाले. त्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.                                                  त्यांच्या पश्च्यात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे व नणंद असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. यड्राव येथील मुक्तीधाम येथे आहे.

मलिकवाड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी.भजनसेवेसह, महाप्रसादाचे वाटप

इमेज
मलिकवाड, तालुका चिकोडी येथील समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ माजी सैनिक सदाशिव वंजिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविले. चर्मकार समाजाचे अध्यक्ष निवृत्ती वंजिरे,उपाध्यक्ष दिपक वंजिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दोन तास भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी चर्मकार समाजाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात.  यावेळी तुकाराम वंजिरे विष्णू वंजिरे, रामा वंजिरे, श्याम वंजिरे, सुभाष वंजिरे, प्रकाश वंजिरे, पांडुरंग वंजिरे, राजू वंजिरे, सुनील पवार, मंगेश वंजिरे, रुद्र वंजिरे, विद्या वंजिरे, स्वाती वंजिरे,मंगल वंजिरे, लक्ष्मी वंजिरे, सुवर्णा वंजिरे, पुतळाबाई वंजिरे, रुक्मिणी वंजिरे, सरिता वंजिरे, उज्वला वंजिरे यांच्यासह, महिला, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते. विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.

शिवाजी ठोंबरे यांचे निधन.

इमेज
मलिकवाड, तालुका चिकोडी येथील रहिवासी शिवाजी वसंत ठोंबरे (वय ५२) यांचे बुधवारी (ता. १२) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहीण असा परिवार आहे. माती सावडणेचा विधी शुक्रवारी (ता. १४) आहे.

गुणवंत कामगारांच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेवू..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

इमेज
मुंबई : ( वार्ताहर ) शिवसेना पक्षप्रतोद आमदार सुनिल प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय मुंबई येथे राज्यातील गुणवंत कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेवून, असोसिएशनच्या वतीने सादर केलेल्या लेखी मागणीपत्रावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रिडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरतपणे कार्य करीत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना, शासनाच्या कामगार विभागामार्फत गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देवून गौरविले जाते. अशा महाराष्ट्रातील (३६ जिल्हे) प्रमुख गुणवंत कामगारांनी एकत्र येवून, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेची केली आहे, हि समाजभिमुख कार्यासाठी चांगली व कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्यावतीने ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य स्तरावरील पुरस्कार दिले जातात, त्यांना त्या विभागाच्यावतीने शासनाच्या विविध सोई सवलती मिळतात. त्याच धर्तीवर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्...

रंगभूमीवर येतंय 'मि. 420' नाटक...  

इमेज
धमाल, विनोदी असे 'मि. 420' हे नवीन मराठी नाटक आता रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे.  'मि. 420' या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.  डॉ. संदीप वंजारी, भूषण घाडी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, अक्षय पाटील, दक्षता जोईल हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.  महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे.  या नाटकाची निर्मिती  'श्री दत्त विजय प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेने केली आहे.  डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. 

मलिकवाड येथे वीर सेवा दल शाखा व चेस मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

इमेज
विशेष प्रतिनिधी अमर माने.- मलिकवाड, दि. 9 फेब्रुवारी 2025 – वीर सेवा दल शाखा मलिकवाड व चेस मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी 123 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, इचलकरंजी तसेच कर्नाटकातील बेळगाव, चिकोडी, निपाणी आणि आसपासच्या भागातील खेळाडू सहभागी झाले होते. * उद्घाटन व स्पर्धेचे आयोजन * सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन पुढारी चे वार्ताहर श्री. राजेंद्र केरूरे, लोकमत पत्रकार श्री. मिलिंद देशपांडे, सकाळ पत्रकार श्री. अजित सुतार, श्री. दर्शन उपाध्ये (सहप्रतिष्ठाचार्य), मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, सेक्रेटरी आणि मुख्य संयोजक श्री. रावसाहेब कुन्नुरे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचे प्रमुख पंच श्री. रोहित पोळ (National Chief Arbiter, Ken Academy, इचलकरंजी) आणि सहायक पंच सलगरे प्रशांत पावले यांनी खेळाडूंना नियमांची माहिती दिली. स्पर्धा 7 फेऱ्यांमध्ये पार पडली आणि संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर ...

रसिकांच्या भरगच्च प्रतिसादात रंगला 'आला रे राजा' चा नाट्यप्रयोग._प्रेक्षकांच्या निर्णायकतेचा ताबा घेणारे नाटक - दा.गो. काळे_

इमेज
बुलढाणा (  सारंग महाजन  ) येथील अक्षरदेह नाट्यकला संस्थेने आयोजित केलेल्या माणुसकी फाऊंडेशन निर्मित "आला रे राजा" या नाट्यप्रयोगाला रसिकांचा भरगच्च प्रतिसाद लाभला. प्रहसनातून फुललेली राजकीय शोकांतिका असलेले हे नाटक प्रेक्षकांच्या निर्णायकतेचा ताबा घेते व त्यांच्यात नव्याने सुरु होते, असे मत जेष्ठ समीक्षक दा. गो‌ काळे यांनी व्यक्त केले.             येथील गोवर्धन सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाचे उद्घाटन जेष्ठ समीक्षक दा. गो. काळे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करुन करण्यात आले. डॉ. सौ. निलिमा दुर्गासिंग जाधव, डॉ. निखिल नलावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मृणाल सावळे, संतोष पाटील, गणेश राणे, विजय सोनोने यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार  करण्यात आला. कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत अभिनय व प्रकाश योजनेसाठी पारीतोषिक मिळवणारे गणेश देशमुख व लक्ष्मीकांत गोंदकर यांचा यावेळी अक्षरदेहच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  त्यानंतर रसिकांच्या भरगच्च उपस्थि...

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :आज दि. 11 फेब्रू. रोजी पोलीस स्टेशन सेलू येथे  भारतीय जनता पार्टी च्या वतीने एक निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, सेलूतील अनेक  सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे. त्या मध्ये अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर, साईबाबा मंदिर महेश नगर, जायकवाडी परिसर व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील जाळे करणारे खुलेआम अश्लील चाळे करत आहेत त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हमरी तुमरीवर येत आहेत. या जोडप्यां मुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे त्यामुळे या जोडप्यांचे जास्तच पेव फुटत आहेत यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत.तरी ताबडतोब या अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा.नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन जयसिंग शेळके, नामदेव झिंबरे, नागेश ठाकूर, शिवहरी शेवाळे, अशोक शिंदे, शिवाजी रा...

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू शहरात विकासकामांचा धडाका मागील काही दिवसांपासून सुरू आहे.नवीनरस्ते,नाली,सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधे साठी करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ते मदरसा पर्यंत असलेला रस्ता हा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग गेल्यावर्षी तयार करण्यात आला होता.या राज्य महा मार्गावर दळण वळण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून नागरी वस्ती मुळे दरदिवशी अनेक अपघात होत आहेत.त्यातच भरीस भर म्हणून वालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणा त खोदकाम करण्यात आले आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झाले ल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसानकरण्यात आले आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे.या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैशाच...

सेलू येथील गजानन महाराज मंदिर संस्थान च्या वतीने प्रगट दिनानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि.10 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद नगर येथील  श्री संत गजानन महाराज मंदिर कमिटीच्यावतीने तीन दिवसीय प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.18 फेब्रुवारी मंगळवार पासून या प्रगट दिन सोहळ्यास प्रारंभ होत असून दि.20 फेब्रुवारी रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. यामध्ये दररोज सकाळी 5 ते 8 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांचे अभिषेक होणार असून 8 ते 11 यावेळेत संत गजानन विजय या ग्रंथाचे समूहिक पारायण होणार आहेत. दुपारी 3 ते 4 या वेळेत महिला मंडळाचे भजन होणार आहे. दि. 20 फेब्रुवारी या मुख्य दिवशी सकाळी 5 ते 10 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांकडून अभिषेक होऊन 11 ते 1:30 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य ह.भ. प.बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाआरती होऊन दुपारी 2 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून श्रवणाचा,दर्शनाचा तसेंच महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या सर्व ...

न्यू हायस्कूल मध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.                             सेलू : दि.10 येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी  निरोप समारंभाचे 9 वी च्या विद्यार्थांनी आयोजन केले होते. कै विनायकराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्य क्रमाचे अध्यक्ष मुख्या ध्यापक के व्ही मोरे तसेच पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिन कर नखाते  शरद मगर, भाऊसाहेब निकम आदींची या कार्यक्रमा स प्रमुख उपस्थिती होती. करिष्मा ढेंबरे या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक रामेश्वर गाडेकर यांनी केले. याप्रसंगी रेणुका ताठे, ज्ञानेश्वरी गडदे, मयुरी हजारे, प्रतिक्षा खरात व त्रिरत्न सावंत या विद्यार्थ्यांनीआपले मनोगत भाषणातून मांडले. तसेच एस टी नागरे, ए एस सावंत, जि के तोटेवाड, डी सी सोळंके,डी एस मोरे, आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर के व्ही मोरे, धनंजय भागवत यांनी परीक्षेसंबंधी महत्वा च्या सूचना व परीक्षे साठी ...

नोंदीत कामगारांचे पेंडिग अर्ज ताबडतोब मंजूर करा. - बांधकाम कामगार संघटनेची मागणी.

इमेज
इचलकरंजी -  नोंदीत कामगारांचे पेंडिग अर्ज ताबडतोब मंजूर करा गृह उपयोगी वस्तू संच (भांडी ) अत्यावश्यक साहित्य (पेटी) शिरोळ,  इचलकरंजी हातकणंगले चे वाटप इचलकरंजी मध्येच करा या व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र  बांधकाम कामगार संघटना ( आयटक) वतिने आज  सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन देण्यात आले.        .    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये केवळ ठेकेदांरांना पोसनेसाठी वेगवेगळ्या योजना लागू केले आहेत. गेल्या दोन वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे व मंडळाचे हजारो कोटी म्हणजे 75 टक्के पैसे ठेकेदारांवर उधळून संपवलेले आहेत‌.  त्याचे ऑडिट होऊन ताबडतोब चौकशी व्हावी. कौटुंबिक नाव वाढवणे आधार कार्ड दुरुस्ती अधिकार जिल्हा केंद्राला मिळावेत , मृत्यू झालेल्या वारसांना ताबडतोब रक्कम मिळावी मॅरेज सर्टिफिकेटची अट काढून टाकावी. गेली वर्षभर इचलकरंजी कार्यालयात विविध लाभ व नवीन नूतनीकरण अर्ज पेंडिंग आहेत ते ताबडतोब निकाली लावावे‌ आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले  ...

सेलूत चोरट्यांद्वारे तीन लाखांची पिशवी लंपास.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि.07 भारतीय स्टेट बँकेतून तीन लाख रुपयांची रक्कमकाढून घरी परतणार्‍या सेवा निवृत्त कर्मचार्‍याच्या हातातील पिशवीच अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळविली. ही घटना सेलूतील स्वामी विवेकानंद नगर भागात गुरुवारी सायं काळी घडली. स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी तथा कृषि उत्पन्न बाजारसमितीचे सेवानिवृत्त सचिव देविदास जोगराम चव्हाण (वय 59) हे गुरुवारी दुपारी भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्याकरीता गेले होते. 500 रुपयांच्या 100 नोटा असणारी प्रत्येकी 50 हजार रुपयांची 6 बंडले पिशवीत घेवून चव्हाण हे ऑटोने घरी परतू लागले, त्यावेळी नगरातील गात यांच्या निवासस्थानासमोर ऑटोतून उतरून ते घरी निघाले असता पल्सर कंपनीच्या मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिकावून घेतली व ते दोघे सर्वोदय नगरच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, या प्रकरणात चव्हाण यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषिकेश शिंदे यांनी घटनास्थळी ध...

सौ. सा. ब. बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :येथील प्राथमिक शाळेत दि. 05 फेब्रु. 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. मकरंदजी दिग्रसकर,प्रमुख पाहुणे- मा.डॉ.एन.टी  कुंदनानी तसेच दत्तराव जी पावडे,राजेशजी गुप्ता, मा. संपतराव खरात उपस्थित होते.शालेय मुख्याध्यापक बेंडसुरे एस. डी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ज्येष्ठ शिक्षक सावरगावकर पि.के यांनी शालेय अहवालाचे वाचन केले. पाहुण्यांचा परिचय पांडे यु.जी. यांनी केला कार्यक्रमात बाल सभेतर्फे सांस्कृति क कार्यक्रम व नाट्य करण सादर करण्यात आले. कार्यक्रमात गुणवत्ता पारितोषिक, कृष्णरूप सज्जा व विषय स्पर्धा पारितो षिक, तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे  बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाल सभेचे चिमुकले विद्यार्थी कु. ढाकणे अनया व चि. इंगळे पृथ्वीराज यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळे तील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच पालकांचे सहकार्य लाभले.

बोरगांव नगर पंचायत ची दुसरी सामान्य सभा खेळीमेळीत संपन्न-सर्कल रुंदीकरण लवकर व्हावे यासाठी नगर सेवक शरद जंगठे सह सर्व नगर सेवकांची मागणी.

इमेज
बोरगाव/ प्रतिनीधी बोरगाव नगरपंचायतीची सन 2024 25 सालाच्या दुसरी मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी मुख्याधिकारी एस.बी.तोडकर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांची वाचन केले. बोरगाव शहरात 13  व्यापारी गाळे आहेत .पण या गाळ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून भाडेवाढ करण्यात आलेले नाही व त्यांचे थकबाकी ही आहे. यांचे थकबाकी वसुली करून गाळे भाडे वाढवण्याचा ठराव करावा असे मुख्याधिकारी तोडकर यांनी सभेसमोर विषय मांडले .यास नगरसेवक प्रदीप माळी,शरद जंगठे सह उपस्थीत नगर सेवक यांनी नकार देत पहिल्यांदा त्या गाळ्यांचे  रिपेअर करणे व डागडूज्जी  करणे गरजेचे आहे . आधी त्यांना सुविधा पुरवा मग गाळे भाडेवाढ्याचा विचार करा असे सांगितले.  नगरसेवक शरद जंगटे यांनी, बोरगाव शहरासाठी अमृत टू योजना चे काम चालू आहे. पण या योजनेतून किती लोकांना नळ कनेक्शन देण्यात येणार आहे,माहिती अजूनही काही नगरसेवकांना दिलेले नाही.वार्ड नंबर एक मधील कुंभार तळ्या वरील सार्वजनिक शौचालय मंजूर झाले असताना ते इतर ठिकाणी बांधण्यात आले आहे , झालेल्या या प्रकाराची सविस्तर...

निपाणी टाकळी उपजिल्हा रुग्णालय मार्ग सेलू रस्ता कधी पूर्ण होणार?

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. अनेक गावाशी जोडणारा महत्वपूर्ण रस्ता असल्याने दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. सेलू : निपाणी टाकळी ते सेलू ३ किमी निपाणी टाकळी ते सेलू ८ किमी या दोन्ही मार्गात ५ किमी चा फरक पडला आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून अतिशय खराब अवस्थेत असल्याने अनेक गावातील लोकांना नाहक  ३ किमी असलेला मार्ग अधिक सुकर असताना नाईलाजाने ८ किमी असलेल्या मार्गाने प्रवास करावा लागतो.महत्वाचं म्हणजे ३ किमी असलेल्या मार्गावर निपाणी टाकळी पासून अनेक गावे जोडली जातात करडगाव, गोगलगाव, आंबेगाव त्याच बरोबर शासकीय उपजिल्हा रुग्णालय,सेलू असून गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी सेलू शहराला वळसा घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत परभणी गाठायला विनाकारण ८ किमी असलेल्या मार्गाने जावे लागते यात अनेकदा रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.३ किमी असलेल्या मार्गाचे निम्मे काम पूर्ण झाले असून केवळ १.५ किमी मार्गाचे काम शिल्लक आहे.या रोडला अच्छे दिन कब आयेगें? अनेकदा निवेदन,उपोषण करण्यात आले असून आत्ता पर्यंत नुसते कोरडे आश्वासन दिले गेले आहेत. मा.ना. मेघना बोर्डीकर यांना मागच्य...

बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू आयटकच्या आंदोलनाला यश कॉ. आनंदा गुरव.

इचलकरंजी प्रतिनिधी -  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची ऑनलाइन प्रक्रिया वैयक्तिक ठेकेदाराला देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तो महाराष्ट्रातील प्रचंड आंदोलनामुळे मागे घ्यावा पाडला त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्वच आंदोलकांचे व सरकारचे सकारात्मक निर्णय घेतले बद्दल सरकारचे स्वागत  महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते कॉ. आनंदा गुरव यांनी मांडले       .   बांधकाम कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली आहे या मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजना लागू आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा केंद्र काढून कामगारांची प्रचंड गैरसोय केली होती या सुविधा केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या कामगारांचे प्रचंड नुकसान होत होते ही सर्व बाब मंत्री महोदय व प्रशासनाला आंदोलन करून लक्षात आणून दिली. या आंदोलनाची आयटकने दोन डिसेंबर रोजी पहीला  आवाज उठवून राज्यभर आंदोलन केले‌  आंदोलनाचा आयटक सह इतर संघटनांचा महाराष्ट्रभर प...

मिरज मधुन "महाकुंभ" साठी या महिन्यात तिन विशेष एक्सप्रेस धावणार.

इमेज
कोल्हापूर - प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडुन हुबळी - बनारस - हुबळी अशी विशेष गाडी सुरु करण्यात आली आहे.       हि गाडी मिरज मधुन १४ फेब्रुवारी २०२५, २१ फेब्रुवारी २०२५  व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१:३५ वाजता गाडी क्र.०७३८३  हुबळी - बनारस - हुबळी अशी विशेष एक्सप्रेस धावेल. किर्लोस्करवाडी येथुन दुपारी ०२:३०,कराड येथुन दुपारी ३ वाजता व सातारा येथुन दुपारी ०४:०५ वाजता निघेल व प्रयागराज येथे अनुक्रमे १५  फेब्रुवारी २०२५, २२ फेब्रुवारी २०२५ व ०१ मार्च २०२५ रोजी रात्री ०८:३० वाजता पोहचेल.            परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज येथुन १७ फेब्रुवारी २०२५,  २४ फेब्रुवारी २०२५ व ०३ मार्च २०२५ रोजी गाडी क्र.०७३८४ सकाळी ०८:५५ वाजता निघेल व मिरज जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०७:४० वाजता पोहचेल.        या गाडीस सांगली,किर्लोस्करवाडी, कराड व सातारा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे यासाठी मध्य  रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सद...

अपूर्वा पॉलीटेक्निक,सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि.31 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अपूर्वा पॉलिटे क्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.गणगे गोकर्णा 87%, ओम कावळे 82% तर अश्विनी चाळक 80% गुण मिळवून महाविद्या लयातून अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच मुळे सार्थक 79.21%, महेश पारधे78%,डांगरे अभिनव 77%,पहाडी समिरूह 76%,कापरे पूनम 76%,गंधाला पुष्पांजली 76%,राऊत संध्या 75%,भोसले ओंकार 75%,रोडगे सुदर्शन 74%,साखरे कीर्ती 74%,रक्ते पीयूष 74%,कवटे मधुरा 74%,कावळे शिवानी 73%,राजकुमार सपाटे 72%,पठाडे अमृता 70%,गुळवे शिल्पा 70%,शेख तौफिक 70%,कसबे कार्तिक 70% इत्यादि विद्यार्थी विशेष प्राविण्यासाह उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभाग प्रमुख प्रा. श्याम वाघ, प्रा.सुरेश गिनगिने ...

महादेव कोरवी यांचे निधन .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  येथील प्रतिष्ठित नागरीक कौशल्यादेवी आ . नाईक - निंबाळकर ग्रामीण नागरी पत संस्थेचे संचालक महादेव किसन कोरवी वय 51 वर्षे  यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले . ते प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते .                                त्यांच्या पश्च्यात  पत्नी , मुलगा , सून , नातवंडे , भाऊ व भावजय  असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवार  दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठिक 9 वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .

अबंप . ता . हातकणंगले येथील २२ व्या छ . शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलना साठी मान्यवरांच्या निवडी . १६ फ्रेबुवारी २५ रोजी होणार संमेलन .

इमेज
हातकणंगले प्रतिनिधी रविवार दिनांक १६ फ्रेबुवारी २५ रोजी सकाळी ८  वाजता  अ अबंप ता हातकणंगले जि कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अबंप आणि  कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित  राज्यस्तरीय २२ वे छ. शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .संमेलन अध्यक्ष म्हणून  साहित्यिक  मा तानाजी आसबे सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक मा प्रा सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कांदबरीकार लेखक दि .बा .पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कु आशू .मेश्राम सिने अभिनेत्री  गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत . सकाळी ८.३० ग्रंथ दिंडी असून त्यांचे उद्घाटन सौ दिप्ती विभासराव माने सरपंच अबंप यांचे हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पुजन मा बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक यांचे हस्ते होणार असून मा काकासो पाटील मा डॉ बी के पाटील 'मा विजयसिंह माने मा राजवर्धन पाटील बी के माने सर मा राजेंद्र माने सर यांची उपस्थिती अरुणार  . स्वागताध्यक्ष मा महादेव बापू डोंगरे  तर प्रास्ताविक मा तुकाराम  भाऊसो निलजे करणार आहेत . उद्घाटन सत्रात पत्रक...

यशवंत प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन साजरे झाले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू येथील यशवंत प्राथमिक शाळे मध्ये आज दि. 30 जाने.रोजी वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले.या स्नेहसंमे लनाच्या अध्यक्षस्थानी  यशवंत शिक्षण प्रसा रक मंडळाचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊ काका बोराडे, संचालक साईराजभैय्या, तर प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे सर होते.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मध्ये व्यंकटराव चव्हाण, राजेश झोडगावकर व डॉ.शिवाजी शिंदे, यशवंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  गोरे सर व यशवंत विद्यालयाचे मुख्या ध्यापक  थटवले सर आदींची उपस्थिती  होते.कार्यक्रमची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन  करून करण्यात आली.या नंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्य क्रमाचे प्रास्ताविक गोरे सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय थटवले सर यांनी दिला. माधव गव्हाणे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विविध क्रीडा स्पर्धा  सांस्कृतिक ...

हुपरीत प्रथमच २ फेब्रुवारीला"यादोंकी बारात" संगीत रजनी महंमद रफी यांच्या गाण्यांची सुरेल मैफिल

इमेज
हुपरी:  संगीतप्रेमी संघटना हुपरीच्या वतीने ज्येष्ठ गायक स्व. महंमद रफी यांच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन केले असून महंमद रफी फेम गायक इब्राहिम कोझी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. हुपरी शहरांमध्ये प्रथमच होत असलेल्या स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या सुरेल गीतांची मैफल  श्री अंबाबाई मंदिर खुले नाट्यगृह प्रांगण येथे रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९ वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले असून  जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे संगीतप्रेमी संघटना हुपरीचे अध्यक्ष उमेश दैने यांनी सांगितले आहे.  कोल्हापूरच्या सुतार बंधू यांच्या प्रसिद्ध "झंकार ऑर्केस्ट्रा" यांचेकडे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे.  या कार्यक्रमात इब्राहिम कोझी यांचेबरोबरच पुणे, मुंबई येथील नामवंत गायक गायिका कलाकार  आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रवेशिकांसाठी खालीलप्रमाणे संयोजक उमेश दैने, प्रकाश वाळवेकर, बाळासोा ऐनापूरे, जावेद कलावंत, प्रकाश ककडे, धैर्यशिल पाटील, उमेश पडवळ, जमिर कलावंत, राजेंद्र पाटील (RJP), धनंजय खाडे, ...

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी

इमेज
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यांचं दिवशी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले  भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि याच दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय लोकांना त्यांचे मूलभूत हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळाले पण याच दिवशी अमरितसर पंजाब मध्ये एका व्यक्तिकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि भारतीय संविधान असलेल्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना‌ पायातील बूट न काढता त्यांचे पुजन केले या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना या निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तिवर कठोरातील कठोर शासन व्हावे या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी सेनेकडून जिल्हाअधिकारी कार्यालयात देण्यात आले. तसेच कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी वर गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना जाहिर ...

७ फेब्रुवारी रोजी आयटकचा कामगार कार्यालयात घेरावा व ठिय्या आंदोलन - कॉ. आनंदा गुरव

इचलकरंजी    मंडळाची वेबसाईट व पोर्टल केवळ तालुका सुविधा केंद्रावर सुरू ठेवल्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण व लाभापासून बहुसंख्येने वंचित राहत पहाटे पासुन टाककळत उभा रहावे लागत असल्याने पोर्टल पुर्वी प्रमाणे सुरु करावे  व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र  बांधकाम कामगार संघटना ( आयटक) वतिने 7 फेब्रुवारी  रोजी कामगार कार्यालयाला घेराव व ठीय्या  आंदोलन        .    केवळ ठेकेदारांना पोसनेसाठी  विधानसभा निवडणुकीच्या आचारसहितेपासून मंडळाचे नोंदणी नूतनीकरण व लाभा संदर्भातील सर्व कामकाज तालुका सुविधा केंद्रावर केंद्रात केल्याने बांधकाम कामगारांची सुविधा होण्याऐवजी प्रचंड गैरसोय व समस्या निर्माण झालेल्या आहेत. हे केवळ कंपन्यांचे भले करण्याचा डाव आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये गेल्या दोन वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे व मंडळाचे हजारो कोटी म्हणजे 75 टक्के पैसे ठेकेदारांवर उधळून संपवलेले आहेत‌.  त्याचे ऑडिट होऊन ताबडतोब चौकशी व्हावी.    .      ...

छत्रपती ग्रुप यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना भटक्या कुत्र्याबाबत निवेदन

इमेज
हुपरी प्रतिनिधी-सागर पाटील. छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने आज दि. 27 जानेवारी 2025 रोजी हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासकीय अधिकारी हुपरी नगरपरिषद हुपरी यांना निवेदन देण्यात आले. हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना अधिक धोका आहे.    आणि आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतलेल्या माहिती नुसार मागील काही महिन्यात गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतलेले पेशंट खूप वाढले आहेत.त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात त्याची सर्व गांभीर्य आम्ही निवेदनाच्या द्वारे नगरपरिषदेला दिली आहे. * [गावातील आरोग्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असुन भटकी कुत्री गाडीच्या आडवी येऊन अपघात घडणे लहान मुले खेळत असताना त्याचा चावा घेणे असले काहीसे प्रकार होत असुन नगरपरिषद यानी तात्काळ उपाययोजना करावी.] *    यावेळी उपस्थित छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत,शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, शुभम चोपडे,उमाजी लाड,संग्र...

मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

इमेज
वार्ताहर - रियाज जैनापुरे     वडणगे येथे कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सन्मानीय सत्कार करण्यात आला.यामध्ये कुस्ती, निबंध स्पर्धा, लाठीकाठी,कराटे, शिष्यवृत्ती अशा विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.तसेच वर्षभर शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जेवू घालणारे शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचा निलेश बन्ने विचारमंच वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.यावेळी कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर मुख्याध्यापक चोपडे सर,शिक्षिका योगिता गायकवाड, पोतदार मॅडम,काटकर मॅडम, आणि सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.विचारमंच अध्यक्ष निलेश बन्ने,प्रथमेश तेलवेकर,सलीम मोमीन, अरविंद ...

यड्राव येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथे विविध ठिकाणी 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .                                  * कुमार व कन्या विद्या मंदिर --   येथे ध्वजाचे पुजन ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे व सारंग काकडे यांनी केले . तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ . चिमाताई आदमाने व उपाध्यक्षा  सौ . सुप्रिया मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले .                                      यावेळी पत्रकार संतोष साने , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चवगोंडा पाटील , अध्यक्षा रिया?  प्रभाळकर , अभिजीत उपाध्ये , मुख्याध्यापक डी . के . पाटील , मुख्याध्यापक आंबी सर , सर्व शिक्षक स्टाफ , ग्रामस्थ व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते .                                      ...

साईराज बोराडे मित्र मंडळ आयोजित एस पी एल 2025 चे उद्घाटन संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  विजेत्यांना आजपर्यंत च्या सर्वात मोठ्या ट्रॉफी चे आकर्षण. सेलू :आज दि.26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थिती त एस पी एल चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोदबोराडे,प्रभाकरजी सुरवसे,मारोती चव्हाण,मिलिंद सावंत, लोकुलवार अण्णा, वहिद अन्सारी,रमेश दौड,शेख कासिम, सचिन कोरडे,सुरेश काळे,व्यंकट चव्हाण राजेंद्र पवार,प्रकाश पवार,वल्लभ  राठी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, पत्रकार शिवाजी शिंदे, लक्ष्मण बोराडे,लक्ष्मण बुरेवार,बबनगायकवाड,बालाजी सरकाळे,जनाआबा सोळंके,सुभाषचव्हाण,आप्पू सोळंके,मनोज दीक्षित संतोष बेंडे,राजू रोडगे आदींची उपस्थि ती होती.पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे  पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला,उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते यामधे डॉक्टर असोसि एशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात सामना खेळवण्यात आला.यावेळी डॉ. असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष एड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसि एशनचे श्री संदीप टा...

26 जानेवारी 2025 रोजी बोरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन. बोरगांव नगरीत एकाच दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन हे नवलच.

इमेज
बोरगाव/ प्रतिनिधी बोरगाव येथे 26 जानेवारी  2025 रोजी  प्रजासत्ताक दिना निमित्त विविध संघटनेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये बोरगाव येथील एल बी  बॉयिज यांच्या वतीने भव्य अन दिव्य हाप स्पीच क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस 21001, नगर सेवक शरद जंगठे यांच्या कडून, द्वितीय बक्षीस  15001, श्री दादासाहेब भादोले यांच्याकडून, तृतीय बक्षीस 10001 श्री पिंटू दुर्गमरगे, शिवाय वैयक्तिक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही बोरगाव येथील आर के नगर मध्ये 26 जानेवारी पासून सुरू होत आहे.     बोरगावचे ग्रामदैवत श्री हजरत पीर बावां ढंग वली दर्ग्याच्या भव्य पटांगणामध्ये 26 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता हिंदू मुस्लिम करबल कमिटी व जीपी स्पोर्ट्स यांच्या वतीने भव्य करबल दंगली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामधील प्रथम क्रमांक बक्षीस 11001, द्वितीय 9001, तृतीय 7001,चतुर्थी 5001 व पाचवं बक्षीस 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत, व बाबासाहेब भिकू यांच्याकडून सर्व बक्षीस विजेत्यांना स्...

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण गगगजजाजडाजडधोधौञञञञञञञ् करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराची सुरवात राजारामपुरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मा.श्री इंगळे साहेब याच्या कडून करण्यात आली त्यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पडले तसेच अनेक रुग्णांनी आरोग्य शिबिरामध्ये आपली तपासणी करून घेतली या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.अर्जुन बुचडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील युवक व महिला मंडळ मध्ये उपस्थित होते

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.    कार्यक्रमाची सुरवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन संपन्न झाले.   यानंतर विद्यालयातील इयत्ता 5वी तील विद्यार्थीनी कु.अंजली बिरंगे हिने आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहीती सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या देशकार्या विषयी माहिती सांगितली.       या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.       या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार सौ.मगदुम एस.जी.यांनी मानले.

सोनू दरेगावकर यांच्या "जगणं दुनियादारीचं"मराठी पुस्तकाचे दुबईत प्रकाशन.

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन. नांदेड: येथील युवा साहित्यिक सोनू दरेगावकर लिखित, "जगणं दुनियादारीचं" या मराठी पुस्तकाचे २१ जानेवारी रोजी दुबईमध्ये प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन यशदा पुणेचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांच्या विद्यमाने करण्यात आले. स्वयंदीप फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने दरवर्षी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम दुबईमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दुबईमधील प्रसिद्ध उद्योजक डॉ. शेख जाशीम गेलान चेअरमन ऑईल अँड गॅस ग्रुप ऑफ गेलान यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात "जगणं दुनियादारीचं" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. बबन जोगदंड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव मोरे, उद्योजक दीपक ढोले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. जाशीम यांनी या कवितासंग्रहातील कविता या निसर्ग आणि मानव यांना जोडणाऱ्या  कविता असून मानवी उत्थानाचा विचार या पुस्तकात मांडला आहे, असे प्रतिपादन केले. या पुस्तकाबद्दल डॉ. बबन जोगदंड...