पोस्ट्स

बोरकिनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : आज बोरकिनी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी तालुक्याच्या लोकप्रिय  आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोरकिनी येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये बोरकिनी येथील सरपंच सौ.कल्पना हनुमान मुसळे, उपसरपंच कृष्णा नरोटे, तसेच पॅनल प्रमुख संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादराव मामा नाईक घुगे, कैलास ढाले सदस्य ,केशव पाटील मुसळे सदस्य ,गोविंद मुसळे सदस्य, शिल्पकार ढाले सदस्य, संभाजी मुसळे सदस्य, पाराजी हावळे सदस्य, रमेशराव आघाव माजी चेअरमन, केशवराव आघाव शालेय शिक्षण समिती माजी अध्यक्ष, विजू कुठे मामा, राजभाऊ ढाले, मधुकर घुगे, उद्धव दादा मुसळे,सुदाम घुगे,पंजाब ढाले, रामराव मुसळे, नामदेवराव मुसळे, देवदास मुसळे ,नामदेव आघाव ,माधव गीते, दत्ता मुसळे ,माझी मेंबर गजानन वाकडे ,विष्णू नरोटे ,मारुती ढाले ,रोहिदास जावळे ,गणेश मुसळे ,प्रकाश घुगे ,योगेश घुगे, प्रमोद शिंदे, नार्या शंकर गळगे,समाधान तरटे ,गोपाळ हा...

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यातआली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ.संजय रोडगे सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर मॅडम व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. राजमाता जिजाबाई यांची माहिती जिजाबाई या प्रचंड देशभक्त होत्या, त्यांच्या देशभक्तीचा शिडकावा फक्त रोम आणि रोममध्ये झाला. त्याशिवाय, त्यांना भारताची राजमाता म्हणून ओळखले जात असे. त्यांनी त्यांचे पराक्रमी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असे आदर्श रुजवल्यामुळे, त्यांच्यात देशभक्ती आणि नैतिक चारित्र्याची बीजे पेरल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज एक वीर, महान राजे, देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक बनले. तसेच स्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा शिक्षणाचा गाभा होय. धर्माची संकुचित व्याख्या नव्हे, तर एका व्यापक धर्माची व्याख्या प्रस्तुत केली आहे. धर्म म्हणजे अनंत बल, बल म्हणजेच पुण्य, दुर्बलता म्हणजेच पाप अशा सहजसोप्या अध्यात्म संकल्पनातून त्याचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले आहे...

एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे ‘मुख्यमंत्री-माझी शाळा-सुंदर शाळा’ अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियान

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनीधी परभणी.  सेलू.श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे‘ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आज आयोजन केले होते. श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम (ता.8) वार सोमवार  रोजी शाळेच्या ऑडिटोरिअम मध्ये पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू एचडीएफसी बँकेचे मॅनेजर भारत पाटील, असिस्टंट मॅनेजर रविराज जाधव, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, ममता सिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता या विषयाची माहित व्हावी व आर्थिक साक्षरता म्हणजे बजेट, इन्व्हेस्टिंग, क्रेडिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट इ. सारख्या फायनान्शियल संकल्पना समजून घेण्याची आणि अप्लाय करण्याची क्षमता. आ...

गायीच्या वासरास विहिरीतून बाहेर काढण्यात आले यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनीधी परभणी.   सेलू : सेलू येथील सप्तपदी मंगल कार्यालय, पारिजात कॉलनी, येथे ३०-३५ फुट खोल विहीरीत एका गाईचे दोन दिवसाचे वासरु पडल्याची घटना  गल्लीतील नागरिकांना समजताच त्यांनी जयसिंग शेळके यांना फोन वरून सांगितले,त्याच बरोबर नगर परिषद सेलू चे कर्मचारी दिलीप दौड यांना माहिती देऊन  नगर परिषद सेलू चे कर्मचारी विठ्ठल काळे, दिपक काळे घटनास्थळी आले.गल्लीतील नागरिकांच्या मदतीने एका लोखंडी बाजेला दोर बांधून एकजण विहीरीत उतरविला व वासराला उचलून घेतले व पुन्हा बाज लोकांच्या मदतीने विहीरीतून वर ओढण्यात आली. वासराचे प्राण वाचवले. यावेळी  जयसिंग शेळके, रवि आडे, माणिक शेळके, शिंदे काका, नायबळ व इतर नागरिक उपस्थित होते.

ज्ञानतीर्थ विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत लठ्ठपणा व मधुमेह आजारावर मार्गदर्शन.,विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबरच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. कुलकर्णी

इमेज
सेलू :- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या “ लठ्ठपणा व मधुमेह ” यासारख्या आजाराची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान (ता.8) वार सोमवार रोजी शाळेच्या क्रीडांगणावर पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू येथील  लठ्ठपणा, मधुमेह तथा हृदयरोग तज्ञ डॉ.सुनील कुलकर्णी,  शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, इंद्रजीत मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजार असून काही लोकांचे आहार आणि व्यायाम करूनही वजन वाढू शकते. लठ्ठपणा हा मानवी शरीरात अनेक अनुवांशिक, एपिजेनेटिक आणि न्यूरो-हार्मोनल मार्गांनी प्रवेश करतो. जर एखादी व्यक्ती आधीच लठ्ठपणाने ग्रासलेली असेल तर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार करणे आवश्यक आहे.  शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्...

साईराज भैया बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2024 चा फायनल क्रिकेट सामना रोमहर्षक रित्या संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : मा.नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे यांच्या वाढदिवसा निमित्त साईराज भैय्या बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2024 चा अंतिम सामना  दि.06/01/2024 रोजी नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. चार दिवस चाललेल्या या लीग मध्ये एकूण आठ संघ खेळले त्या पैकी रसोई वॉरियर्स व गटकळ अकॅडेमी या संघाने फायनल पर्यंत मजल मारली.या वेळी अतिशय चुरशीचा सामना पहायला मिळाला.  ह्या मधे रामेश्वर गटकळ ह्यांच्या  गटकळ अकॅडेमी या संघाने रु. 41000 चे प्रथम पारितोषिक  व ट्रॉफी जिंकून शशांक टाके यांचा रसोई वॉरियर्स संघ उपविजेता राहिला त्यांना रुपये 21000 व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सेलू शहराचे मा. उपनगराध्यक्ष प्रभाकर तात्या सुरवसे,ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, कपिल पडूळ ,अमरभैया सुरवसे यांची उपस्थिती होती. लीग चे नियोजन अमरभैया सुरवसे यांनी पार पाडले. सर्व खेळाडूंनी या वेळी साईराज भैया बोराडे यांचे क्रिकेट प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध केल्या बद्दल अभाराची भावना व्यक्त केली.

सेलू येथे ढेंगळी पिंपळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : ढेंगली पिंपळगाव येथील इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत सेलू येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या संपर्क कार्यालयात छोटयाखानी कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. यामध्ये  महादेव सोळंके, माऊली सोळंके, राहुल सोळंके, आनंद सोळंके, गोविंद सोळंके, बालाजी सोळंके, प्रल्हाद सोळंके, हनुमान साखरे, कैलास कवटे, पांडूरंग कवटे, आनंद सोळंके, माणीक डोंगरे, शेख मन्सुर, सुंदर काळे, शेख, मुस्तफा, संतोष पंडागळे, ऊध्दव पंडागळे, भारत पंडागळे, राजेश पंडागळे, बाबा पंडागळे, सुरेश मकासरे, मुंजाभाऊ मगर, लालाभाऊ पंडागळे या सर्व कार्यकर्त्यांचे विजयरावजी भांबळे साहेबांनी  स्वागत करत त्यांना पक्षात आल्या बद्धल सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे,आप्पासाहेब डख, प्रकाश मुळे, चंद्रकांत गाडेकर, कल्यानराव जोगदंड, कैलासराव मोगल, नानासाहेब बोबडे, शिवराम कदम, प्रभाकर सोळंके, मारोती वामनराव सोळंके,मारोती नाथाराव सोळंके, महादेव कवटे,बबन तिडके,रमेश मगर अशोक पवार, आप्पासाहेब रोडगे, तुका...

मराठा कुणबी दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक थांबवणे बाबत सकल मराठा समाज सेलू तर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनीधी परभणी. सेलू : सेलू तालुक्यातील  सर्व मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक व त्याच बरोबर नवीन नोंदी सापडण्यास दिरंगाई करणे बाबत संपूर्ण तालुक्यात असंतोष निर्माण झाल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने  दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या असतांनाही मराठा कुणबी दाखले कोणाची ही अडवणूक  न करता तात्काळ देण्यात यावेत. पण सेलू तालुक्यात असे होताना दिसत नाही दाखल्यांसाठी एक महिन्याच्या वर वेळ लागत आहे. अगोदर एवढा वेळ लागत नव्हता तसेच लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक पण होत आहे. दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. वेगवेगळी कागदपत्रे व कारणे सांगून मराठा समाजाची आडवणूक होत आहे. आपल्या कार्यालयात मराठा कुणबी दाखल्यासाठी हेलपाटे मारून लोक मेटाकुटीला आले आहेत. तरी तात्काळ मराठा समाजाची आडवणून न करता कोणत्याही दवाबाला बळी न पडता कुणबी मराठा दाखले देण्यात यावे. तसेच सेलू तालुक्यातील काही मोजक्या गावाच्या मराठा कुणबी नोंदी सापडले आहेत. व नवीन नोंदी सापडण्यासाठी आपले प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे मराठा ...

एकटी संस्थेमार्फत पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावात प्लास्टिक संकलन उप्रकम संपन्न.

इमेज
पन्हाळा - एकटी संस्था तसेच छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशन वतीने कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त व्हावे तसेच प्लास्टिकचे योग्य पद्धतीने निर्गतीकरण होण्यासाठी कचरा व्यवस्थापन व्हावे. याकरिता कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी "प्लास्टिक मुक्त कोल्हापूर अभियान" राबविण्याचे काम सुरु आहे. एकटी संस्थेमार्फत महानगरपालिकेच्या मदतीने शहरातील ओला व सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम सुरु आहे. शहरातील भाजीपालामार्केट मधील ओला कचरा तसेच व्यापारी आस्थापनाचा सुका कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण तसेच पुनर्वापर केला जातो. दोन प्रभागातील ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मितीचे काम संस्था करत आहे त्याचप्रमाणे शहरातील राजेंद्रनगर या ठिकाणी आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने "स्वच्छसुंदर राजेंद्र नगर" हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. या अनुभवातून व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असा प्लास्टिक कचरा वर्गीकरण करणे व त्याचा पुनर्वापर करणे यासाठी संस्था काम करत आहे हे सर्व काम कचरावेचक महिलांना सोबत घेवून त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी त्यांना रोजगार निर्मितीसाठी केले जात आहे. त्या...

सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या जिवन कार्यावर आपले मनोगत गिते, ओव्या सादर केल्या. वक्तृत्व स्पर्धेत दुर्गा मगर प्रथम, सचिन कसबे द्वितीय,पायल राऊत तृतीय तर अश्विनी रणखांबे स उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. ब-याच विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या पोषाखात उपस्थित होत्या.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य धनंजय भागवत तर प्रा. भाऊसाहेब निकम,  दिनकर नखाते, मंजुषा बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी प्रनयना तेलगोटे, धनंजय मोरे यांनी फुलेंच्या कार्याविषयी मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर यांनी केले.तर आभार प्रा. संतोष कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सेलू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू् : सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर साईराज भैय्या बोराडे मिञ मंडळ आयोजित तिसऱ्या सेलू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन आज दिनांक 3 जानेवारी बुधवारी रोजी झाले. वेळी मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगरध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, राजेंद्र पवार, प्रसाद महाराज काष्टे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जटाळ, गौतम धापसे, शेख दिलावर, व्यंकटेश चव्हाण, रमेश दौड, सचिन कोरडे, विठ्ठल काळबांडे, राजेंद्र केवारे, लक्ष्मण बुरेवार सह आदींची उपस्थिती होती.पाच दिवसीय स्पर्धेत आठ क्रिकेट संघ भाग घेणार असुन यात वॉरियर्स टीम प्रायोजकत्व न्यु.मॉर्डन सी.सी,किंग्स एलेव्हन , जिजाऊ वॉरियर्स, नूतन क्रिकेट क्लब, गटकळ करिअर ॲकडमी, प्रिन्स वॉरिर्यस, रसोई वॉरियर्स, माऊली सुपरकिंग्ज  या आठ संघाची लढत आहे.  गटकळ ॲकडमी वि.  प्रिन्स वारियर्स संघामध्ये पहिला सामना झाला. या धावते समालोचन इरफान पठाण, यासेर शेख करीत आहेत.‌ गुणलेखक अभिजित चव्हाण. ७ जानेवारीला अंतिम सामना आहे. विजेत्यांना रो...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६९ वा नाट्य महोत्सव दिमाखात सुरु

इमेज
कोल्हापूर : (सुरेश केसरकर) कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरु असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. कामगार कलावंतांना या निमित्ताने कलेची सेवा करता येते, असे उद्गगार आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. त्या केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.  कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी पुणे विभागाचे सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेपेक्षाही सात वर्ष जुनी असणारी ही स्पर्धा आहे याबाबत आनंद व्यक्त केला. कष्टकरी समूहाला आपल्या भावभावना व्यक्त करता येणे ही जमेची बाजू आहे. असे मत त्यांनी मनोगतात व्यक्त केले.  प्रमुख उपस्थितीत असणारे राज्य ग...

मुख्याध्यापक भरत पाटील यांच्यकडून नववर्षानिमीत्तमिठाईचे वाटप

इमेज
प्रतिनिधी - अलका रोडे मांजरी.       येडूरवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक भरत पाटील यांनी नववर्षानिमीत्त विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले . मुख्याध्यापक भरत पाटील यांनी गेली कित्येक वर्षे सरकारी शाळेमध्ये विवीध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी शैक्षणीक साहीत्य वाटप, याबरोबर विदयार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी विवीध उपक्रम राबवले आहेत. सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशिल असतात. सामाजीक कार्यातही त्यांचा उत्साही सहभाग असतो. नववर्षानिमीत्त त्यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना  मिठाई वाटप करून शुभेच्छा दिल्या. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची घटती स़ख्या पाहता पालकांनी मुलांना सरकारी शाळेत पाठवावे असे आवाहनही केले. यावेळी सिध्दापूरवाडी येथील कन्नड शाळेचे मुख्याध्यापक बी.डी कुंभार, एस बी  होळेनाईक, शंकर गायगोळ, राकेश माळकरी, सुधाकर कांबळे यांच्यासह कन्नड मराठी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी  सेविका, पालक, ग्रामस्थ उपस्थित  होते. 

अपघातानंतर दहा लाख दंड व दहा वर्षे शिक्षा देणारा काळा कायदा रद्द करा. - क्रांती रिक्षा युनियन

इमेज
इचलकरंजी वृत्तसेवा - अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख  रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा या मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयातील मा  विनोद वस्त्रे यांना आज क्रांती रिक्षा युनियन वतीने देण्यात आले          देशभरामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सह सर्व प्रकारचे २५ करोड चालक-मालक ड्रायव्हर आहेत. या घटकांना कोणती सामाजिक सुरक्षा नाही त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी याकरिता आंदोलने सुरू आहेत. ह्या ड्रायव्हरला सुरक्षा देण्यापेक्षा ड्रायव्हर वर दंडात्मक कारवाईचा तोंड  द्यावे लागते आणि आता तर अतिशय भयानक कायदा केला आहे. या कायद्याने आयुष्यचे उध्वस्थ होणार आहे. या व्यवसायात काहीही येणार नाही.  अशा कायद्याने या व्यवसायाकडे कोणीही फिरवून बघणार नाही परिणामी देशभर मालवाहतुकीचा गोंधळ होऊन बसेल. अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल          हा कायदा रद्द करा या करिता ऑटो टॅक्सी, ट्रक. बस. टेम्पो चालक आणि मालक यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑटो, टॅक्सी...

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या शिल्लक रक्कमेतून रुग्णवाहीका खरेदी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलूतील  मराठा बांधवांचा स्तुत्य उपक्रम; अंतरवालीत जरांगे पाटलांच्या हस्ते लोकार्पण.   सेलू : सेलू येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जमा केलेल्या लोक वर्गणीतून जमा झालेल्या रक्कमेतून त्यातील खर्च होवून जे पैसे उरले त्या पैशातून एक रुग्णवाहिका सर्व समाजातील गोर गरिंबासाठी खरेदी करण्यात आली. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण आज करण्यात आले. दि. 22 डिसेंबरला सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मनोज जरांगे यांची सभा लाखो लोंकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेसाठी संपूर्ण तालुक्यातील खेड्या पाड्यातील  सकल मराठा समाजातील लोंकानी जमेल तशी लोकवर्गणी जमा करून हातभार लावला होता.लोकसभेसाठी स्टेज,लाऊड स्पिकर,विद्धुत रोषणाई, बारीकेटिंग,प्रचार रथ आदी बाबी वर खर्च झाला होता.परंतु समाजातील लोंकानी सढळ हाताने मदत केल्यामुळे खर्च वजा जाता काही रक्कम शिल्लक राहिली होती. त्या रक्कमेचे काय करायचे? याचे नियोजन करण्यासाठी सकल समजाच्या वतिने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांस...

हुपरीत दोन गटांमध्ये जागेच्या वादातून हाणामारी.

इमेज
हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील                                  शहरांमध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाली याची फिर्याद मालन रावसाहेब घाटे वय-57रा.महावीर नगर हुपरी यांनी पोलीस ठाणे हुपरी  ठिकाणी नोंद दिली आहे.        पोलीसातुन मिळालेली माहिती अशी-मालन रावसाहेब घाडी ह्या अनेक वर्षे झाले महावीर नगर हुपरी या ठिकाणी आपल्या जागेवरती वास्तव्यास आहेत यांच्यासमोर काही कोरवी समाजाचे कुटुंब राहतात ही जागा कोरवी समाजाची आहे या कारणावरून आरोपी संपत कोरवी, लखन कोरवी, तुळशीदास कोरवी, भूषण कोरवी, यांनी फिर्यादीच्या विरुद्ध शिवीगाळ करून त्यांना फावड्याच्या साह्याने मारहाण केलेली असून त्यामध्ये फिर्यादी सह त्यांचा मुलगा लखन व मुलगी मंदाकिनी हे जखमी झालेले असून काल ते हुपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आले असता लखन व त्यांची मुलगी यांना त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व आज त्यांनी वरील सर्व आरोपी विरोध 323, 324, 504, 506, 34, प्रमाणेगुन्हा नोंद केल...

श्री केशवराज बाबासाहेब महारांजाच्या यात्रेनिमित्त लोकप्रिय चांडाळ चौकटीच्या करामती कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दिनांक 28 डिसेंबर शुक्रवार रोजी मा. आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव 2023 निमित्त चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार मेघना दीदी  साकोरे बोर्डीकर यांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी मंचावर मा. प्राध्यापक किरण पाटील सर, संतोषजी मुरकुटे (जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण), डॉक्टर पंडितराव दराडे (विधानसभा अध्यक्ष),दिनकरजी वाघ,रवींद्रजी डासाळकर,संजयजी लोया, संतोष कुलकर्णी सर, श्रीमती ललिता गिल्डा,करुणा कुलकर्णी मॅडम ,डॉ ऋतुराज साडेगावकर,माऊली ताटे,अशोक दादा अंभोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. सेलू हे सांस्कृतिक शहर असून तो वारसा जपण्याच्या हेतूने सेलू शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या हेतूने माननीय आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर यांनी हा उपक्रम राबविला. भारतीय जनता पार्टी च्या संयोजन समितीने व त्यांच्या टीमने केलेल्या व्यवस्थापनाची ...

गौसेवेने सर्व सांसारीक दुःख निवारण होतत - प.पू. गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : आज श्री गोविंदबाबा दादूपंथी मठ गौशाळाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे विमोचन रोकिडीया हनुमान मंदिर, मोंढा, सेलु येथे प.पू.गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुर्यकांत जाधव,जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, आनंद सोनी, मदनलालजी करवा,नंदलालजी परताणी,सुरेशजी राठी,रामप्रसाद साबु,विजयकुमारजी लोया, रामेश्वर सोमाणी,श्रीनिवास बाहेती, शिवप्रसादजी काबरा,मनोहर भराडीया, द्वारकादासजी करवा,वैद्य साहेब हे उपस्थित होते स्व.आसराबाई रामवल्लभजी डालिया यांच्या प्रथम पुण्य स्मृती व्हेदर  आयोजीत प.पू गोवर्ती श्री अशोक पारीक यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन डालिया परिवार सेलु यांनी केले असता त्या प्रसंगी गोसेवेचे महत्व महाराजनी गौशाळाच्या २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन करताना सांगितले.

राजे फाऊंडेशन कडून राधानगरी धनगरवाडा येथे कपडे वाटप

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी - .श्री.मालोजीराजे छत्रपती आणि मा.सौ.श्री.मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून आज राधानगरी येथील धनगरवाडा व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये जुने नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच धनगर वाडा येथील ग्रामपंचायत व शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच यावेळी त्या लोकांचे व तेथील असलेल्या शाळेची माहिती घेण्यात आली आणि राजे फाउंडेशन कडून त्या लोकांची माहिती घेऊन येथून पुढे त्यांना  राजे फाउंडेशन कडून नेहमी सहकार्य राहील असे सांगण्यात आले. यावेळी राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा.अंजुम देसाई,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.शितल चौगले,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा मा.उमा पाटील,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद,उत्तम शेलार, अल्ताफ शेख, कोल...

श्रीराम प्रतिष्ठाने सुरभी महोत्सवातून सेलू शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण केली- आमदार मेघनादिदी बोर्डीकर

इमेज
परभणी जिल्हा प्रतिनिधी - शिवाजी शिंदे. शिवपुत्र संभाजी महानाट्याने उपस्थितांच्या अंगावर आले शहारे. शिवपुत्र संभाजी महानाट्य :- १५० विद्यार्थी सहभाग. ज्ञानतिर्थ विद्यालयाचा 'रंग मराठी मातीचा' सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.   चि. वैद्यनाथ हारकळ व कु. श्रुती बोराडे विशेष पुरस्काराने सन्मानित. सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवानिमित्य ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा व शिवपुत्र संभाजी महानाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम (२८) वार गुरुवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, सुरभी महोत्सवाचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. प्रा. किरण पाटील, भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी मूरकटे, सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. पंडीतराव दराडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मा. प्रशा...

शैक्षणिक क्षेत्रात श्रीराम प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान - मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या "ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड" सांस्कृतिक कार्यक्रमाने सेलूकरांची मने जिंकली. सेलू : सेलू (ता. 27) डिसें. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सुरभी महोत्सव अंतर्गत एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी "ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड " या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या विद्याविहार संकुलात सादर करण्यात आला. मूल्यसंस्कार, भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गा बाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन  सेलू-जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार मा. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, उपशिक्षणा धिकारी परभणी मा. गजानन वाघमारे, मंठा तालुक्याचे पीआय म...

श्री केशवराज बाबासाहेबांचा यात्रा महोत्सव. शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद. सेलूमध्ये दर्शनासाठी रीघ.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : शिर्डीचे संत साईबाबा चे सदगुरू व सेलू चे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या (व्यंकुशाह) २२४ व्या यात्रा महोत्सवाचा मंगळवारी २६ डिसेंबर रोजी (श्री दत्त जयंती) मुख्य दिवस होता. यानिमित्ताने महापूजा महाआरती झाली. व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित पारंपारिक भंडारा महाप्रसाद घेण्यासाठी सेलूसह परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी ही सकाळ पासूनच रीघ होती. दुपारी साडेबारा वाजता श्री च्या तीर्थप्रसाद शिंपनानंतर श्री साईबाबा मंदिर परिसरात महाप्रसादाला सुरूवात झाली. यावेळी मुकेश बोराडे अशोक मंत्री गंगवाल माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे सतीश दिग्रसकर राजू पटेल बाळु मंत्री आदीसह व्यापारी मंडळाची मोठी उपस्थिती होती. महीला पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सेलुतील व्यापारी मंडळ साईबाबा संस्थान श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान यात्रा कमिटी तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा शिस्तबद्ध वाटपासाठी परिश्रम घेतले . सोमावरी श्रीमद भागवत कथेची सांगता झाली. सभापती अशोक ...

कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहास पुरस्कार प्रदान .

इमेज
हातकणंगले  इंगळी ता . हातकणंगले येथील प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार इंगळी यांना त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहास डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला .         अखिल भारतीय शब्द मंथन  समूहाच्या माध्यमातून वाळवे खुर्द  ता कागल  येथील रविवार दिनांक २४ डिसेंबर २३ रोजी संपन्न झालेल्या  साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते   कवि सरकार इंगळी यांच्या हिरवा माझा मळा या काव्यसंग्रहा ची निवड केली होती . निखारा हा पेटला ' कवि सरकारांच्या कविता ' नांगरणी व हिरवा माझा मळा इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत . तसेच फास हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे . त्याचप्रमाणे प्रातिनिधिक काव्यसंग्रह ' संमेलन विशेषांकांचे संपादन केले आहे .   दरवर्षी विविध साहित्यकृतीला अखिल भारतीय शब्द मंथन समूहाचे डॉ. रविराज आसबे स्मृती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येते. यासाठी त्यांच्या हिरवा माझा मळा या काव्य संग्रहाची निवड केली होती यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील . राजन मुठाणे नसीम जमादार  संमेलनाचे मुख्य आयोजक ताना...

वाळवे खुर्द येथे अखिल भारतीय साहित्य समूहाचे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले .

इमेज
कवि सरकार इंगळी     वाळवे खुर्द ता कागल अखिल भारतीय शब्द समूहाचे  साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . सकाळी ग्रथदिंडीने संमेलनास सुरवात झाली . संमेलनाच्या स्थळी दिंडी पोहचल्या नंतर संमेलनाच्या सुरवातीस तानाजी आसबे सरांनी मान्यवरांचे स्वागत केले .  संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांनी ग्रामीण भागातील साहित्य संमेलन हि आजच्या धावपळीच्या युगात माणसांना जगण्याचं बळ देत असतात असे सांगितले. तर उद्घाटक श्री राजन मुठणे कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद  यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात मौलिक मार्गदर्शन केले यावेळी. प्रमुख उपस्थीती डॉ. गणपती कमळकर गट शिक्षण अधिकारी कागल ' श्री बाळासाहेब निंबाळकर सचालक प्रा.शि बँक ' श्री आवेलीन देसाई चेअरमन सरपिजीराव पत संस्था ' श्री शामराव देसाई शि.वि. अधिकारी हे होते . तर सुत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.  दुसऱ्या सत्रात कथाकथन अध्यक्ष श्री परशराम आंबी यांचे अध्यतेखाली संपन्न झाले यात  ' त्यांनी भाकरचोर  हि कथा सादर केली तर दत्तात्रय परीट यांनी यू आर ग्रेट .' संयोगिता महाज...

श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.-दिपस्तंभ प्रतिष्ठान चा उपक्रम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सुप्रसिद्ध विनोदी मराठी वेबसिरीज   चांडाळ चौकटीच्या करामतीचे कलाकार सेलूत. सेलू(प्रतिनिधी):साई बाबाचे गूरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त शहरात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतिने केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव  निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन  जिल्हा परिषद प्रशाला, नूतन रोड सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. सेलू हे सांस्कृतिक शहर असून हा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने हे प्रथम वर्षी उचललेले पाऊल असून इथून पुढेही अशाच प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव घेऊन शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचा प्रयत्न आहे. गूरूवार दि.२८ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेली सुप्रसिद्ध अशी विनोदी आणि अनेक चालू ग्रामीण  घडामोडीवर भाष्य करणारी,अनेक प्रश्नांना  वाचा फोडणारी, जवळपास दोनशे पन्नास एपिसोड पूर्ण करणारी अस्सल ग्रामीण मराठी मध्ये असलेली तुफान विनोदी वेबसिरीज  चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाची म...

शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळायला हवा:ॲड. सुभाष हिंदूजा

इमेज
कोल्हापूर : (सुरेश केसरकर) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचेवतीने गांधीनगर येथे दिनांक १९ डिसेंबर रोजी प्रशासकीय गतिमानता अंतर्गत गांधीनगर होलसेल व किरकोळ व्यापारी असोसिएशन यांचेकरीता आस्थापना नोंदणी, मंडळाच्या योजना, उपक्रम तसेच मंडळाच्यावतीने आयोजित करणेत येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहीती देणेत आली. यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी व्यापारी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुभाष हिंदुजा यांनी, उपस्थित असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सभासद यांना कामगार कल्याण निधी का भरावा लागतो ? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्या दुकानात ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व दुकानदारांनी संबंधित वाहन चालक, सेल्समन तसेच सर्व कामगार बंधू भगिनींना शासनाच्या योजना व उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ नुसार म. का. क. मंडळाला निधी भरणे बंधनकारक असलेचे स्पष्ट प्रतिपादन केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्यावतीने "श्रमकल्याण युग" विशेषांक देऊन स्वा...

श्रीराम प्रतिष्ठान येथे सुरभि महोत्सवाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सव २०२३ चे आयोजन उद्या ता.२४ ते २९ डिसेम्बर २०२३ दरम्यान विद्याविहार संकुल येथे करण्यात आले आहे सुरभि महोत्सावाच्या स्पोर्ट्स डे (ता.२४) सकाळी ९.०० वा. या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करतात. साई नाट्य मंदिर  येथे २४ डिसेम्बर सकाळी ९.००वा वैयक्तिक नृत्य स्पर्धा, तसेच  क्युरिअस कीड्स, फिनकीडस व पॉस्परस पब्लिक स्कूलचा  “ FOLK DANCE OF INDIA ” (ता.२९) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स  इंग्लिश स्कुल सांस्कृतिक कार्यक्रम “ TRANSITION A CHANGE IN WORLD ” या वर आधारीत कार्यक्रमाचे  (ता.२८) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. जिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ रंग मराठी मातीचा ” तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण (ता.२8) डिसे. वेळ सायं.०५.३० वा विद्यालयाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. प्रिन्स आदिवासी प...

शिरोळ शहरात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी  दर्शनाबरोबर घेतला महाप्रसाद लाभ

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी, समर्थांच्या  जयघोषात हजारो भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकाचे दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची   पालखीचे सोमवार १९ डिसेंबर  रोजी दुपारी २ वाजता स्वामीभक्त   बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी चव्हाण कुटुंब व शिरोळ शहरातील स्वामी भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने त्यांचे स्वागत केले यानंतर अनेक स्वामी भक्तांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाची पूजन केले. त्यानंतर बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी रात्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती व पादुकास अभिषेक घालून पूजन करण्यात आले तसेच पालखी सोबत आलेल्या सर्व वारकरी बांधवांना येथील स्वामी समर्थ ग्रुपच्या सदस्यांनी अभंगस्नान घालून त्यांची सेवा केली यावेळी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष संजय चव्हाण बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण स्वाम...

उज्वल यशासाठी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक.लेफ्टनंट संघमेश शिवानी कैलास मलवडे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :19 डिसेंबर विद्यार्थिनींनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत, जिद्द,चिकाटीने कसोशीने प्रयत्न करावयास हवे.आपण यशाच्या कितव्या शिखरावर आहोत यापेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत हे महत्वाचे आहे." असे प्रतिपादन लेफ्टनंट संघमेश शिवानी कैलास मलवडे यांनी केले.नूतन कन्या प्रशाला सेलू येथे आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट संघमेश मलवडे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे , लेफ्टनंट संगमेश मलवडे,कैलास मलवडे,शिवानी मलवडे,संगीता खराबे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळवलेल्या संघमेश मलवडे यांचा आणि पालक  कैलास मलवडे आणि शिवानी मलवडे यांचाही शाल, श्रीफळ,पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कैलास मलवडे यांनी NDA मध्ये मुलींनाही सुवर्णसंधी असून विद्यार्थिनींनीही तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. अ...

सेलूचा संगमेश मलवडे अवघ्या 22 व्या वर्षी लेफ्टनंटपदी दाखल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. संगमेशच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा.  सेलू : वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी सेलू येथील संगमेश शिवानी कैलास मलवडे भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी ) लेफ्टनंट पदी दाखल झाले आहेत. सेलू शहरातून एन डि ए मार्फत थेट लेफ्टनंट पदी दाखल होण्याचा मान  संगमेशला मिळाला आहे.संगमेशची आई शिवानी आणि वडिल  कैलास मलवडे दोघे पण शिक्षक आहेत.संगमेशचे शिक्षण सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठाण संचलित प्रिन्स इंग्लिश मध्ये  झाले. छत्रपती संभाजी नगरच्या सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्थेत राहून पुढील शिक्षण पूर्ण केले.खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील आयएमएम मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.9 डिसेंबर रोजी संगमेशची लेफ्टनंट पदी निवड झाली. सेलू तालुक्यासाठी ही अभिमानाची व भूषणाची बाब असल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सेलूकरांच्या वतीने रेल्वे स्टेशन पासून संगमेशची ढोल ताशाच्या निनादात आनंदोत्सवात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व पुष्पहाराने अनेक मान्यवरांनी उत्स्फुर्तप...

भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन.,पाच लाख प्रथम तर तीन लाख द्वितीय क्रमांकाचे बक्षीस

इमेज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव घरोघरी अभियाना अंतर्गत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आयोजित विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी विचारमुल्यांचा प्रसार, प्रचार आणि जागर करण्यासाठी... प्रथमच महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठी भव्य महानिबंध महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता हा भव्य महानिबंध महास्पर्धेचा विषय असून प्रथम क्रमांकाचे 5,00,000/- (एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके), द्वितीय क्रमांकाचे 3,00,000/- (पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके) तर तृतीय क्रमांकाचे 1,00,000/- (पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके) भव्य अशी महाबक्षीसे आहेत. सोबत उत्तेजनार्थ 50 बक्षीसे प्रत्येकी दहा हजार (एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके) बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास 2,000/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे. या निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त 500 स्पर्धकांनाच प्रवेश भे...

सेलूत मनोज जरांगे पाटील यांची 22 डिसेंबरला होणार अति विराट सभा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सभेचे  नियोजन  संपन्न.मनोज जरांगे पाटील एक दिवस अगोदरच मुक्कामी. मुस्लिम समाजाने घेतली पाणीपुरवठा करण्यांची जवाबदारी. सेलू : सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान परिसरात होणाऱ्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल यांची एक तरी सभा व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून सकल मराठा समाजाची इच्छा होती शेवटी अथक पर्यत्ना नंतर 22 डिसेंबर ही तारीख  सभेसाठी प्राप्त झाली.त्या अनुसंगाने  सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या भव्य अश्या मैदानात सभेची जोरदार तयारी चालू झाली आहे. सेलू तालूक्यातून सर्व समाज बांधवांनी जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक समाजातील बांधवानी सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांची जेवण्याची उत्तम अशी व्यवस्था जागोजागी नाव  न सांगण्याच्या अटीवर करण्यात आली आहे; नावापेक्षा समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे या भावनेतून त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी व्यक्त केल्या. मुस्लिम समाजातील बंधूनी सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व लोंकाच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर सभेसाठ...

महाराष्ट्र महिला केसरी पै अमृता पुजारीचा होणार शिरोळकरांच्या वतीने रविवारी नागरी सत्कार

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळची सुकन्या पै अमृता शशिकांत पुजारी हिने चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवून शिरोळ शहराचे नाव देशपातळीवर उज्वल केल्याबद्दल पै अमृता पुजारी हिचा शिरोळ नगरपालिका व समस्त नागरिक यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार रविवार२४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात करण्यात येणार आहे चांदीची गदा मानपत्र सन्मान चिन्ह एक वर्षाची विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे असा निर्णय नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला   महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिचा सत्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या दलितमित्र दिनकररावजी यादव सभागृहात आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे होते     बैठकीच्या प्रारंभी युवानेते पृथ्वीराज यादव आणि सर्वांचे स्वागत करून महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारीच्या सत्कार समारंभा...

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून सत्कार समारंभ

इमेज
कोल्हापुरातील पाचगाव येथील रायगड कॉलनीतील सामान्य कुटुंबातील व्यक्ती मा.रवींद्र घाटगे हे खरे मंगल कार्यालय या ठिकाणी वाचमन (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतात ते सकाळी 7 वाजता कामाला जातात आपण समाजाचे काही तरी देणे लागते या उद्देशाने त्यांनी कामाला जाण्याअगोदर सकाळी 6 वाजता रक्तदान करून आपल्या कामाला त्यांनी सुरवात केली तसेच पाचगाव मधील गृहणी भारती सावंत यांनी आपले घर सांभाळत गरीब  परिस्थितीतून एक पाचगाव मिसळ हे छोटेसे हॉटेल चालू केले त्यामुळे या दोघांचा आज राजे फौडेशन तर्फे राजे फौडेशन ची प्रतिमा आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी राजे फौडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. शुभम शिरहट्टी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजीव भालेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव मंजूर सय्यद, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.शितल चौगुले करवीर तालुका सचिव नंदकुमार पोवार कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा सौ.उमा पाटील आदी उपस्थित होते.