पोस्ट्स

YP स्पोर्ट्स अकॅडमी, यड्राव आयोजित व्यक्तिमत्व विकास व क्रीडा प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे संपन्न.

इमेज
यड्राव – YP स्पोर्ट्स अकॅडमी, यड्राव यांच्या वतीने रेणुका नगर, यड्राव येथे आयोजित ‘सप्तगुण सर्वांगीण व व्यक्तिमत्व विकास उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर - 2025’ हे शिबिर दिनांक 26 एप्रिल ते 6 मे दरम्यान उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध वयोगटातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खेळाच्या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये यड्राव ग्रामपंचायत, YP स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था व मंडळे, विविध अकॅडमी, मित्रमंडळ, तसेच सर्व पालकगण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो, असे आयोजकांनी सांगितले.

प्रा. महावीर जाधव "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने" सन्मानित

इमेज
कोल्हापूर : विद्यांकुर ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रा. श्री. महावीर वसंतराव जाधव यांना "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" नुकताच प्रदान करण्यात आला. इचलकरंजी येथील विशाल क्रांती समूह यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार समारंभाचे भव्य आयोजन रविवार, दि. १३ एप्रिल २०२५ रोजी जोगेश्वरी हाॅल, इचलकरंजी येथे पार पडले. या सोहळ्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. धैर्यशील दादा माने यांच्या हस्ते जाधव सरांना गौरविण्यात आले. गेल्या १९ वर्षांपासून प्रा. महावीर जाधव हे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटवला आहे. सुरुवातीला त्यांनी कोल्हापूर डाएट येथे तब्बल १० वर्षे तज्ञ प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे. सध्या ते महावीर एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यांकुर ज्ञान प्रसारक मंडळ अंतर्गत विद्यांकुर सेमी इंग्लिश स्कूल, स्वरांजली संगीत व नाट्यकला अकादमी, शब्दप्रभू जगदीश खेबूडकर प्रतिष्ठान कोल्हापूर

यड्राव परिसरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

इमेज
यड्राव ( प्रतिनिधी ) : यड्राव परिसरात विविध ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.                                    प्रारंभी सकाळी माणगांव येथून आणलेल्या भिमज्योतीचे यड्राव फाटा येथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन भिमज्योतीची मोटर सायकलरॅली काढण्यात आली . त्यानंतर स्टॅन्ड चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास शिरोळ पं. स .चे माजी उपसभापती श्रीमंत सत्येंद्रराजे नाईक - निबांळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .                                             यावेळी प्रकाश अकिवाटे , सुजीत गरड , शिवाजी दळवी , व ग्रामस्थ उपस्थित होते.       ...

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवास जाणाऱ्या भाविकांसाठी सुरेश कोकणे यांचेकडून घोसरवाड येथे थंडगार मठ्ठा वाटप - त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

इमेज
घोसरवाड ( वार्ताहर) घोसरवाड ता शिरोळ येथील सुरेश कोकणे यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी घोसरवाड येथे शनिवारी दि १२ एप्रिल रोजी थंडगार मठ्ठा वाटप केले दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त येथील सुरेश कोकणे यांनी चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगराला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रतिवर्षी घोसरवाड येथे थंडगार वाटप करतात यावेळी देखील त्यांनी चैत्र यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी शनिवार दि १२ एप्रिल रोजी घोसरवाड येथे थंडगार मठ्ठा मोठ्या प्रमाणात वाटप केले त्यांच्या या धार्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे  यावेळी सुरेश कोकणे व त्यांचे कुटुंबीय तसेच बाळकृष्ण कोकणे संजय कोकणे राजेंद्र कोकणे यांचेसह बाबुराव भोई . संजय कांबळे.  बाळकृष्ण नंदिकुरळे. सर्जेराव संकपाळ. यांचेसह इतर मान्यवर सामाजिक कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची  बाळकृष्ण कोकणे व कोकणे बंधू घोसरवाड यांची मानाची सासणकाठी क्र. १०६ आहे . चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर  जाणाऱ्या भाविकांसाठी घोसरवाड ...

अवैध्य व्यवसाय बंद करावे यासाठी भागातील नागरिकांच्या कडून निवेदन.

इमेज
कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या ऐतिहासिक बिंदू चौक ते मटण मार्केट या परिसरात चालू असणारे बेकयदेशीर लॉजिंग बांधकाम आणि बेकायदेशीर अवैध व्यवसाय मटका,गांजा विक्री करणाऱ्यावर तत्काळ कडक कारवाई व्हावी अशी मागणी बिंदू चौक,गंजी गल्ली परिसरातील नागरिकांतून होत आहे.हे अवैध धंदे जिथे सुरू आहेत त्या ठिकाणी धर्मस्थळ आहे.आणि येथे मटका,जुगार, आणि गांजा विकत घेण्यासाठी येणारे हे सतत दारू,गांजा पिऊन हुल्लडबाजी करतात त्यामुळे येथील लहान मुलांना व महिला वर्गालाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांच्या वतीने असे निवेदनही लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आले. महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आंबेगाव पोलीस स्टेशनची मोठी कारवाई श्री.शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली.

इमेज
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. घरफोडी चोरी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद तीन गुन्हे उघडकीस २,२७,०००० रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत आंबेगाव पोलीस स्टेशनची कारवाई . दिनांक १७/०३/२०२५ रोजी दुपारी ३ ते ६.३० या सुमारास पहिला मजला ,कोंढरे बिल्डिंग शिलाईवर्ल्ड जवळ आंबेगाव बुद्रुक येथे घरफोडी करून चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि.  क्रमांक ४८ २०२५ बी. एन. एस ३०५(अ) ३३ १(३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे .सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न सी.सी.टीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यांतील  आरोपीत निष्पण करून सदर गुन्ह्यात आरोपीत नामे वेंकटेश रमेश वय २२वर्ष व्यवसाय-काहीनाही रा. पी.जी बिल्डिंग एमआयटी कॉलेज जवळ कोथरूड पुणे मुळ राहणार बेंगलोर राज्य कर्नाटक यास अटक केले आहे.  सदर आरोपीकडे तपास करून खालील प्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत . १)आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजिस्टर क्रमांक ४८/ २०२५ बी.एन.एस ३०५(अ),३३१(३) २)बावधन पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.रजि.१२९/२०२५ .बी.एन.एस.३०५ (अ),३३१(३) ३)लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९७/ २०२२५.बी...

श्रीराम संस्कार केंद्राच्या वर्गास प्रारंभ.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील श्रीराम संस्कार केंद्राच्या वतीने आपल्या देशाची भावी पिढी बलशाली व संस्कार क्षम घडविण्यासाठी विविध उपक्रमातून मागील दहा वर्षांपासून  किशोरवयीन वयोगटातील मुला मुलींसाठी सेलूच्या विविध भागात संस्कारवर्गाचे आयोजन करीत आहे. दि ३०एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून  सेलू शहराच्या विविध भागासह श्री विवेकानंद नगरातील गजानन महाराज मंदिरात संस्कार वर्गास प्रारंभ झाला. ६ एप्रिल पर्यंत सायंकाळी चालणाऱ्या या वर्गात ‌शारिरीक स्वास्थ्यासाठी अभ्यास पुरक उपक्रमात ॐकार,ध्यान, योग-प्राणायाम मनःशांती, एकाग्रता,आत्मबल,आत्मविश्वास वाढीसाठी सूर्य नमस्कार, राम रक्षा, मारोतीस्तोत्र, समर्थबोध, मूल्य संस्काराच्या प्रेरक कथा, प्रार्थना व विविध गुणदर्शना विषयी सौ.हेमलता जोशी, सौ.लोकुलवार,सौ. अपर्णा कुलकर्णी  ( पारीख कॅलनी) सौ.करूणा बागले,सौ.आशाताई सूर्यवंशी, सौ. माधवी पिंगळे ( विवेकानंद नगर) सौ.सुरेखा रामदासी सौ.सीमा आष्टीकर, सौ.वैष्णवी दलाल( विद्यानगर) सौ.वसुधा खारकर,सौ.किर्ती देऊळगावकर सौ.संगीता खारकर, ( आदर्श नगर ) सौ.प...

विनोद बोराडे मित्र मंडळ आयोजित सुंदर माझे गुढी स्पर्धा संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा व श्रीराम जन्माच्या पावन पर्वावर घेण्यात येणाऱ्या श्री साई महोत्सवा ची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते श्री साई महोत्सव 2025 च्या सुंदर माझी गुढी या स्पर्धेची सुरुवात दिनांक 30 मार्च 2025 रोजी झाली या स्पर्धेमध्ये सेलू शहरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. विविध प्रकारे सुंदर गुडी सजवून कला प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विनोद बोराडे मित्र मंडळ तर्फे सहभागी झालेल्या व येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्पर्धेबद्दल भरपूर कौतुक करून प्रशंसा करण्यात आली. स्पर्धेसाठी अतिशय सुंदर असे आयोजन करण्यात आले होते.

ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी यांच्या वतीने प्रा.जे डी कांबळे सर यांचा सत्कार.

इमेज
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते व समाज शास्त्राचे गाडे अभ्यासक  प्रा.जे.डी.कांबळे  सर यांना शिवाजी विद्यापीठ अंतर्गत देण्यात येणारा समाज शास्त्रातील समाज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबदल व निपाणीतील आंबेडकरी समाजातील  तनिष्क तानाजी कांबळे व श्रावण रामनाथ बामणे या दोन युवकांचा इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया पँथर सेना निपाणी यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित होता गेला  या कार्यक्रम प्रसंगी नगर पालिकेच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना करून  कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवचंद कॉलेजेच्या प्राचार्य इंगळे मॅडम या होत्या  या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना त्या म्हणल्या  आजच्या या स्पर्धात्मक जगात सरकारी नोकरी मिळणे ही गोष्ट अवघड झाली असून आपल्या अंगी जिद्ध व चिकाटी असेल तर कोणती ही परीक्षा पास होता येते व कोणत्या परिस्थिला  तोंड देणे हिच खरी परीक्षा असते  या कार्यक्रमाचा सत्कार स्वीकारत असताना सत्कार मूर्ती  प्रा. जे डी .कांबळे म्ह...

मोठ्या उत्साहात साजरी होणारी रमजान ईद....!!!

इमेज
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी राजू सिकंदर नदाफ इचलकरंजी.        तब्बल ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमानात दिवसभर अन्नपाण्याचाही त्याग करून अल्लाहचरणी लिन होऊन रोजा करण्याची ताकद इबादत करणार्या मुस्लिम समाजातील मुलामुलींमध्ये स्त्री पुरूष प्रत्येक आबालवृद्धांमध्ये आहे हे खरोखरच अचंबित करणारे आहे...शेवटी शेवटी असर च्या (रोजा सोडण्याआधीची शेवटची) नमाजपूर्वी वुजू करताना पाणी गळ्यामध्ये घसा स्वच्छ करण्यासाठी तर घ्यायचे पण गळ्याखाली नाही उतरू द्यायचे तेही पहिटेपासून अन्नच नाही तर पाण्याचा थेंबही पोटात घेतला नसताना.. ह्या भक्ताचा(बंदा) हा त्याग पाहुन अल्लाहमियॉ आपल्या देवदूताला(फरिश्ते) मोठ्या अभिमानाने सांगत असेल,बघ माझ्या भक्ताच्या मनावर किती संयम आहे... जगाच्या पाठीवर आखाती देशांसह तब्बल दोन नंबरची लोकसंख्या असलेला प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या पवित्र विचारांवर चालणारा हा इस्लाम धर्म...आणि इस्लाम च्या विचारांना, आचरणाला अधोरेखित करणारा हा रमजान महिना.. तब्बल ३० दिवस असा कडक उपवास (रोजे) रणरणत्या उन्हातही करायचे आणि तेही स्वतः चा नोकरी ,व्यवसाय ,कष्टाचे काम सांभाळून....

हणमंतवाडीत भानामतीचा सुळसुळाट, गावात भीतीचे वातावरण

इमेज
प्रतिनिधी - विवेक पाटील :  शिंगणापूर, ता.२७ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भानामतीचे अनेक प्रकार अलीकडे उघडकीस येत असताना आज पहाटेच्या सुमारास करवीर तालुक्यातील हणमंतवाडी हद्दीत भानामतीचा एक प्रकार उघडकीस आला. गावालगतच्या हणमंतवाडी - शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे महिलाचे श्रुंगार असे महागडे साहित्य गावाच्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने आणून ठेवल्याचे निदर्शनास आले.                                                  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (ता.२७) पहाटे हणमंतवाडी गावच्या वेशीवर असणाऱ्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने महिलांचे सौंदर्य साहित्य ओढ्याच्या सुरक्षा कठड्याच्या बाजूला पांढऱ्या कापड्यात मांडून ठेवल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्याने गावात एकच थरकाप उडाला. मुलींना आकर्षित करण्यासाठी भोंदू बाबाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांच्यांत आहे.           ...

चंदूर - सैनिक टाकळी पूलाचे काम लवकर पुर्ण करण्याच्या प्रकाश हुक्केरींनी दिल्या अधिकार्‍यांना सुचना.

इमेज
चिक्कोडी तालुक्यातील चंदूर - सैनिक टाकळी  गावांच्या दरम्यान कृष्णा नदीवर 27 कोटी रूपये खर्चून बांधल्या जात असलेल्या पुलाच्या कामाची विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी श्री प्रकाश अण्णा हुक्केरी यांनी पाहणी केली. हा महत्त्वाचा पूल कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील संपर्क सुलभ करणार असून, शेती, व्यापार आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा निर्माण करेल. कामाच्या प्रगतीचा आढावा घेत श्री प्रकाश अण्णांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी स्थानिक नेते, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इनामदार यांचा रविवारी अमृतमहोत्सवी सत्कार.

इमेज
शिरोळ : सुनिल शंकर इनामदार हे ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त सुनिल इनामदार, सौ. सुरेखा इनामदार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार रविवारी १६ मार्च रोजी टारे क्लब हाऊस, अर्जुनवाड शिरोळ रोड, शिरोळ येथे सकाळी १०.३० वा. आयोजित केला आहे, अशी माहिती प्रा. डॉ. मोहन पाटील, संजय सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. पाटील आणि सुतार म्हणाले, इनामदार यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे संपादक पद भूषविले होते. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. साहित्य, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. गरीब, कष्टकरी, श्रमीकांसाठी चळवळीत त्यांनी काम केले आहे. सौ आणि श्री. इनामदार यांनी सार्वजनिक जीवनात लोकहितासाठी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या या सत्कार सोहळ्याला संपादक वसंतराव भोसले, आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. डॉ. अशोकराव माने, माजी आ. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, माधवराव घाटगे, गणपतराव पाटील, पीटर चौधरी, प्रसाद कुलकर्णी व अन्य उपस्थित राहणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.

करिअरकडे लक्ष देऊन उंच भरारी घ्या - ललिता गिल्डा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि. 11 मार्च  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नूतन अभ्यासिका सेलू येथे जागर स्त्री शक्तीचा, सन्मान कर्तुत्वाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या अंतर्गत सेलू शहरातील  राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. लता गिल्डा आणि महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांचा आणि या दोन्ही महिला मंडळाच्या कार्यकारणी तील सदस्यांचा तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख सौ. अस्मिता मोरे हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन सेलू, कु. भूमिका काकडे, या सर्वांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलत असताना श्रीमती ललिता गिल्डा म्हणाल्या की,आजच्या मुली या भावी माता असून त्यांनी चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून आपले कुटुंब आपले गाव आपला देश या सर्वांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच सौ लता गिल्डा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले तर मोबाईलकडे दुर्लक्ष करून आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शर्मिला मालानी यांनी केले. पोलीस दल विद्यार्...

रेणूका क्लिनीक तर्फे दोनसे पन्नास रुग्णांची बी.एम.डी.तपासणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  डॉ. दिगंबर तु.घोडके यांचा स्तुत्य उपक्रम. रुग्णांचा भरभरून प्रतिसाद.  सेलू : सेलू येथील रेणूका क्लीनिक तर्फे दि. 9 मार्च रविवार रोजी डॉ.दिगंबर घोडके यांनी रुग्णांची बीएमडी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.ज्या रुग्णाचे वय हे 15 वर्षा पेक्षा जास्त आहे व ज्यांना कंबर दुःखी, अंग दुखी व गुडघे दुखी, कमजोरी,थकवा येत असेल, सांधे दु:खी होत असेल,ज्यांच्या हाता पायला मुंग्या येतात, हात सुन्न होते, चक्कर येत असेल अश्या अनेक आजार असतील अश्या सर्व रुग्णाची तपासणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व आजारासाठी  लागणारा तपासणी खर्च दवाखान्यात रुपये 1500/- लागतो.जो सर्व सामान्य रूग्णांना परवडतं नाही किंवा गरजेपोटी तो करावाच लागतो.  परंतु डॉ.दिगंबर घोडके  ह्यांनी नेहमीच सामाजिक भान ठेऊन आपल्या रेणूका क्लिनीक च्या  मार्फत रुग्णांना कमीत कमी मोबदल्यात जास्तीत जास्त सेवा देण्याचे सामाजिक कार्य केले आहे. या अगोदर पण त्यांनी अनेक आजारा वर रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून मोठं मोठाल्या  शहरातील नामां...

दर्पण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  विनोद बोराडे व साईराज बोराडे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.  सेलू : दि.7 मार्च रोजी सेलू येथील लोकप्रिय माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे,साईराज बोराडे परिवाराकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही दर्पण दिनानिमित्त तालुक्या तील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी पण  तो सत्कार समारंभ काही कारणा स्तव थोड्या उशीरा का होईना तो घेण्यात आला.या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पत्रकारांनी विनोद बोराडे मित्रमंडळाचे निमंत्रण स्वीकारून सन्मान स्वीकारला, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांचा सर्व पत्रकार बांधवांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेेश नाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले होते.कार्य क्रम यशस्वी करण्या साठी त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल,जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे,महंमद इलीयास,डॉ. शिवाजी शिंदे,मोहसीन मामू आदी पत्रकार बांधवानी त्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी कार्य क्रमामध्ये काही अजून सत्कार करण्यात...

बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टीस्टेट) संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड.

इमेज
प्रतिनिधी - अमर माने एकसंबा. चिक्कोडी, तालुका येथील बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टीस्टेट) संस्थेच्या 2025-30 सालाकरिता नूतन संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली.  मल्टीस्टेट नोंदणी झालेल्या संस्थेत आता 21 संचालकांची निवड झाली. साहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले चिक्कोडीचे साहाय्यक उपनिबंधक मल्लाप्पा राहुतन्नावर यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे जाहीर केली. निवड झालेले संचालक असे ः अण्णासाहेब शंकर जोल्ले (एकसंबा), शशीकला अण्णासाहेब जोल्ले (एकसंबा), सिद्राम मिनाप्पा गडदे (केरूर), यासीन गुलाब तांबोळी (एकसंबा), आप्पासाहेब शिवराम जोल्ले (एकसंबा), विभाश्री दिलीप खांडके (निपाणी), आनंद देवगौडा पाटील (सदलगा), अण्णासाहेब शंकर चौगुला (इंगळी), रीषभ कैलासचंद जैन, (इचलकरंजी), वज्रकांत बाळाप्पा सदलगे (निपाणी), प्रकाश सिद्रायगौडा पाटील (विजापूर), निंगाप्पा बसलिंगाप्पा खोकले (बाळीगेरी), काशीनाथ सदाशिव कमते (खडकलाट), दत्तात्र आनंदा पाटील (कणेरी), बाळासो अण्णासो कदम (ममदापूर के.एल.) मल्लिकार्जून बन्नाप्पा तेली (हंदीगुंद), सदानंद भीमाप्पा हळींगळी (रायबाग)...

प्रसिद्ध कलाकार रोहित अशोक गायकवाड (उर्फ भैय्या गायकवाड)

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन राहणारा:-  कान्हे गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे. वय:- 25 मावळ तालुक्यातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजेच आपला रोहित अशोक गायकवाड. उर्फ भैय्या गायकवाड. हा एक कलाकार आहे त्यांचे नुकतेच 29k follower असून तो reels Star ⭐ ही ठरला आहे त्याला त्याच्या भागातील लोकं ही खूप सपोर्ट करतात व त्याचे घरचे सुद्धा. त्याचं एक लव song सुद्धा आहे ( मन याड) आत्ता च त्याच्या दुसऱ्या सोंग ची ही शूटिंग कंप्लीट झाली आहे ते तुम्हाला सर्वांना लवकरच बघायला मिळणार आहे. ते असा खूप स्ट्रगल करून स्वतःच्या पैशांनी स्वतः प्रोजेट करतो त्याच्या ह्या कामगिरीला एक सलामी त्याच्या आयुष्यात खूप घडा मोडी आली तरी ही त्यांनी हार मानली नाही रोहित गायकवाड ह्याला अक्टिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे लवकरच त्याचे स्वप्नं पूर्ण होतील. त्याच्या ह्या कामगिरीला त्याचे चाहते त्याला सपोर्ट करता.  सध्या  त्याच्या घरी एक आई असते व त्याला तीन बहिणी आहेत त्यांचे लग्न झालेलं आहे रोहित गायकवाड हा एकटा आहे त्याच्या वर घरची जिम्मेदारी असून तो सध्या बाहेर राहून जॉब करतो.

जय श्री मंजुनाथ अभिवृद्धी संघा तर्फे 150000 लाख रुपये निधीचे वितरण.

इमेज
निपाणी तालुक्यातील सौन्दलगा क्षेत्रातील आडी गावातील मलिकाअर्जुन डोंगर मठाला  150000 लाख रुपयाचा डी डी श्री जापर आतार यांच्या हस्ते देवस्थान कमिटी कडे  देण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे sdmc अध्यक्ष सचिन पाटील तसेंच मलगोंड पाटील महालिंग मगदूम तालुका कृषी अधिकारी सुरेश सर्व अश्विनी मॅडम व सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते.

श्री सरस्वती शैक्षणिक संस्थेचे श्री सरस्वती कन्नड माध्यम, उच्च प्राथमिक शाळेचा वार्षिक मैत्री परिषद संपन्न.

इमेज
रायबाग: गावातील श्री सरस्वती शैक्षणिक संस्थेचे श्री सरस्वती कन्नड माध्यम.  उच्च प्राथमिक शाळेचा वार्षिक मैत्री परिषद आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.    या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदीकुर्ली येथील पंचलिंगेश्वर मठाचे परमपूज्य श्री वीरभद्र महास्वामी यांच्या हस्ते झाले.                 सी आर.पी.  अनिल सुतार म्हणाले की, पालकांनी चांगले नैतिकता आणि शिक्षण द्यावे, तसेच मुलांना मोबाईल फोन आणि टेलिव्हिजनपासून दूर ठेवावे.                            संस्थेचे अध्यक्ष भिमाप्पा बिदरी, शंकर कुरंगी, ग्रामीण ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी महादेवी दीपले, सचिव सुरेश बिदरी, गुरुमाते उमा बिदरी, एल.बी. कशेट्टी, बी.के. बालनवर, भरमू पुजारी यांनी स्वागत केले, कृतज्ञता व्यक्त केली आणि मुलांच्या शिक्षकांचे आभार मानले.

रोहीना गावास ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता’ पुरस्कार प्रदान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :  दि.08 परभणी जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अर्तंगत  या वर्षाचा  ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2023-24’ पूरस्कार सेलू तालूक्या तील रोहीना (काजळे) या गावाने पटकावला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार 8 मार्च रोजी येथील जिल्हा परिषदे च्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांची उपस्थिती होती. मुख्याधिकारी रश्मी खांडेकर,ओम प्रकाश यादव,शिवराज केंद्रे, रेखा कळम, शिक्षणाधिकारी माध्य. आशा गरुड, आर.जी. स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांचीउपस्थिती होती. याप्रसंगी रोहिना गावच्या सरपंच अर्चना भारत इंद्रोके व ग्राम विकास अधिकारी राजीव वावळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रोहीना गावातील ग्रामस्थांनी सरपंचाना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  व्यापार्‍यांसहित सर्व प्रतिष्ठान कडकडीत बंद.  स्व. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी. सेलू : दि.08 बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्त्या प्रकरणात जलद गतीच्या न्यायालयात खटला चालवावा व मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल मानवतावादी नागरिकांच्यावतीने शुक्रवार 7 मार्च रोजी सेलू शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मानवतावादी नागरिकांच्यावतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यां चे निवेदन सादर करण्यात आले. त्याद्वारे,बीड जिल्ह्या तील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यसह सेलू तालुक्यामध्ये आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या प्रकरणाती ल दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सह आरोपी क...

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांचा सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमात महिलांसाठी गॅसचा वापर न करता पदार्थ बनवणे (Without Fire Cooking), एक मिनिट खेळ (1 Minute Game), Passing Pass Game, संगीत खुर्ची (Musical Chair) आणि पूर्ण मॅचिंग (Perfect Matching) या मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीराम प्रतिष्ठान  सेलूचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठान सेलूच्या सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.   या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या कलेला आणि उत्साहाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे उपस्थितांनी आनंद लुटला. यावेळी शाळेचे प्रिंसिपल कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर, मीरा मिरिंडा, महिला पालक अस्मिता सूर्य...

शिरोली एमआयडीसी येथे बीपीसीएल पेट्रोल पंपावर ई-व्ही चार्जिंग स्टेशन सुरू.

इमेज
शिरोली एमआयडीसी (पहिला फाटा) येथे असलेल्या बीपीसीएल पेट्रोल पंपावर आजपासून ई-व्ही चार्जिंग स्टेशनच्या मशीनची सुरुवात करण्यात आली आहे. ही सुविधा या भागातील पहिलीच असून, इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे. दुचाकी आणि चारचाकी ई-वाहनांसाठी ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असून, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल, तसेच ई-वाहनधारकांना सुलभ चार्जिंगची सोय होणार आहे. या चार्जिंग स्टेशनमुळे शिरोली एमआयडीसी परिसरातील वाहनधारकांना मोठा फायदा होईल, तसेच भविष्यात आणखी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  संसारोपयोगी साहित्य जळून खाक :  आहेर बोरगाव येथील घटना.  सेलू : दि.05 तालुक्या तील आहेर बोरगाव येथे राहत्या घरी शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीमुळे गॅसचा स्फोट झाला. या आगीत शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले.येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाणे यांच्या राहत्या घरी बुधवारी (दि.05) सकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत घरातील गॅस सिलेंडने पेट घेतला, त्यात सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग अधिकच वाढली. या आगीत घरातील कापूस, रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, ज्वारी, गहू, तूर व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून शेतकर्‍याचे 12 लाख 63 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. दरम्यान, महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व गॅस एजन्सीचे प्रतिधींनी या घटनेचा पंचनामा केला.

प्रा. श्री. रामेश्वर गटकळ सर यांना नवी दिल्ली येथे इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड देऊन सन्मामानित

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.01 फेब्रुवारी 2025 रोजी राजधानी दिल्ली येथे इंटीग्रेटेड ग्लोबल युनिवार्सिटी द्वारे भारतातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 30 व्यक्तींचा इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. श्री. रामेश्वर गटकळ सर यांचाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंटीग्रेटेड ग्लोबल यूनिवर्सिटी तर्फे इंद्रप्रस्थ  नॅशनल अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. हा सोहळा रेडिसन ब्लू, द्वारका, न्यू दिल्ली या पंचतारांकित होटेल मध्ये पार पडला. यावेळी डॉ. दिव्या तणवार ( प्रोफेसर, सोमय्या विद्याविहार, मुंबई), शाम स्वरूप भटनागर ( प्रोफेसर म्यूनिसपल कॉर्पोरेट दिल्ली), डॉ. राम बहाद्दर दुबे ( डीन लखनऊ सेंट्रल संस्कृत यूनिवर्सिटी), महंत नीरज स्वामी जी ( एक्झुटिव्ह मेंबर, राम मंदिर अयोध्या). श्री नीरज कुमार ( सीएमडी इन न्यूज़ 24),  श्री. तपन कृष्णन काकाटी (चेअरमन इंटीग्रेटेड ग्लोबल यूनिवर्सिटी, उत्तराखं...

बालकाकडून महागडी रॉयल एनफील्ड दुचाकी जप्त – भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

इमेज
प्रतिनिधी - गोपाल भालेराव पुणे:  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत, पोलीस तपास पथकाने गुन्हा रजि. नं. १०८५/२०२४ अंतर्गत चोरीस गेलेली रॉयल एनफील्ड थंडरबर्ड (MH12MU9890) दुचाकी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी पोलीस अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीची दुचाकी सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, गुरुदत्त हाइट्स येथे एका इसमाकडे आहे. पथकाने तत्काळ त्या ठिकाणी छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले असता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे आढळले. त्याच्याकडून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश ...

रयत क्रांतीचे हातकणंगले तालुकाप्रमुख श्री गुंडराव मोरे युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश.

इमेज
पट्टण कोडोली - वार्ताहर, माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा सन्मान करून, माननीय श्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन रयत क्रांतीचे हातकणंगले तालुकाप्रमुख श्री गुंडराव बबनराव मोरे यांनी आज मा जिल्हाप्रमुख व गोकुळचे संचालक श्री मुरलीधर जाधव तसेच युवा सेना राज्यकारणी सदस्य श्री शिवाजीराव जाधव व उपजिल्हाप्रमुख मा. श्री विजयकुमार स्वामी तसेच युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकत्यांच्या उपस्थितीत युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश केला एका कर्तुत्ववान व धाडसी युवकाला युवासेनेमध्ये स्थान देऊ युवासेना अधिक बळकट करण्यासाठी व त्याच्या कार्याचा युवा सेनेला अधिक बळकटी देण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ( आठवले ) पक्षाच्या सल्लागार पदी रंगराव कांबळे तर उल्हास भोसले यांची उपाध्यक्ष पदी निवड.

इमेज
यड्राव ( प्रतिनिधी ) ः येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सद्स्य रंगराव गणपती कांबळे यांची शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले ) पक्षाच्या सल्लागार पदी  तर माजी सरपंच उल्हास विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले ) पक्षाचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते  व शिरोळ तालुका कार्याध्यक्ष मारुती मोहिते, कोल्हापूर जिल्हा संघटक गौतम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.                                               सदर निवड नाम. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक न्यायाचा लढा पक्षाच्या माध्यमातून यशस्वीपणे व अविरतपणे लढत आहात. या आपल्या आंबेडकरी चळवळीतील सहभागाची व आजपर्यंत नाम. रामदास आठवले यांच्यावर दृढ विश्वास ठेवून केलेल्या अन्याय आत्याचाराच्या विरोधात आंदोलनाची व पक्ष बांधणीच्या कामातील सहभागाची दखल घेऊन तसेच सर्वसामान्य...

'टर्निंग पॉईंट' मानवी जगणं समृद्ध करणारा कथासंग्रह : स्मिता तांबे

इमेज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या गतिमान मानवी जीवन प्रवासात माणसाचं जगणं विस्थापित होत आहे. माणूस माणसापासून दुरावला जात आहे. नातेसंबंध विस्कटत आहेत. माणूस माणसापासून दुरावला जात आहे. अशा काळात माणूस पण जपणार साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात अस्सल वास्तववादी कथा निर्माण होणे गरजेचे आहे.  'टर्निंग पॉईंट' हा मानवी जगणं समृद्ध करणारा व वाचकांना प्रेरणादायी ठरणारा कथासंग्रह आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेत्री स्मिता तांबे यांनी केले. त्या ज्येष्ठ कथाकार व साहित्यिक डॉ. रमेश विवेकी यांच्या 'टर्निंग पॉईंट' या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, डॉ. रमेश विवेकी लिखित 'टर्निंग पॉईंट' हा परिवर्तनवादी व प्रागतिक विचारांचा कथासंग्रह असून या कथासंग्रहामध्ये मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी समूहाला प्रेरणा ठराव्या असा अनेक कथांचा यात समावेश आहे. मानवतावाद आणि सामाजिक जाणीव या संदर्भातील अनेक मूलभूत विषय या कथासंग्रहामध्ये लेखकाने हाताळल...

हिंदू धर्म रक्षक दानशूर भागोजी कीर यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त त्यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला..!

इमेज
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या खामगांव, बुलढाणा येथील मुक्तेश्वर आश्रमात मार्गशीर्ष महिन्यात, डिसेंबर १९७१ मध्ये भी आठ दिवस अनुष्ठान केले. निर्गुण पादुका महोत्सव परमपुज्य पाचलेगावकर महाराजांच्या उपस्थितीत संपूर्ण भारतातून आलेल्या हजारो भक्तांच्या सानिध्यात उत्साहात साजरा झाला. दुसऱ्या दिवशी गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परमपुज्य पाचलेगावकर महाराजांचे आठ दिवस आणि सानिध्य मला लाभले होते. परमपुज्य पाचलेगावकर महाराजांना मी श्रीफळ दिले व नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी मला स्वतः गुरु मंत्र दिला व त्यांनी मला आज्ञा केली की यापुढे तू अनुष्ठान करावयाचे नाही. तुझ्या धडा वरील नारळ मला हवा आहे. तू तानाजी मालुसरे होशील. तो काळ पाकिस्तानच्या बरोबर सुरू असलेल्या लढाईचा होता. त्या क्षणापासून परमपुज्य पाचलेगावकर महाराजांनी सर्व राजकीय पक्षांच्या, पदाधिकाऱ्यांच्या नेतेमंडळींना भेटीगाठी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सभापती वि. स. पागे. सभापती रा. सु. गवई, मंत्री प्र...

गुगळेश्र्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. श्री प्रल्हादराव कान्हेकर यांच्या कडून 51 हजारांची देणगी. सेलू : सेलू तालुक्या तील गुगळी धामणगाव येथील  गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. रविवार दिनांक 24 फेबुवारी रोजी संपन्न झालेल्या  कार्यक्रमाचे उद्घाटन गो. बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रल्हादराव कान्हेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी  कार्य क्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष विठ्ठलराव डख तर  प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्याक चंद्रशेखर नावडे ,कस्ट्राईब शिक्षक संघटनेचे माराठवाडा कार्याध्यक्ष धम्मपाल उघडे,सरपंच अतुल डख,संस्था सदस्य सुरेशराव डख,सुभाष बोबडे गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुनीलबापू डख,संस्था सचिव रमेश डख, सिमुर गव्हाणचे सरपंच विष्णू उगले,डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष सतीश आकात, मुख्याध्यापक अमोल पवार, मुख्याध्यापक युवराज ब्रम्हराक्षे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गो.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री प्रल्हादराव देशमुख कान्हेकर यांनी गुगळेश्वर विद्यालयास विद्यार्थ्यां च...

विद्यार्थ्यांनो, न्यूनगंड दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा सराव करा. एम. बी. केरूरे यांचे प्रतिपादन. मलिकवाडला महाशिवरात्रीनिमित्त परीक्षा

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड. मलिकवाड, तालुका चिकोडी येथील शहरी भागापुरती मर्यादित राहिलेली स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागात रूजविण्याचे काम अतिशय उपयुक्त आहे. विद्याथ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन न्यूनगंड दूर करावा. स्पर्धेत सहभागी होणे हेही विजयासारखेच आहे, असे मत सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक एम. बी. केरूरे यांनी व्यक्त केले. येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेचे उ‌द्घाटन करून ते बोलत होते. श्री. केरूरे पुढे म्हणाले, मलिकवाडसारख्या ग्रामीण भागात मंदिर समितीने अशा स्पर्धा परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे. या परीक्षांना गावपातळीवर स्थान देऊन येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन करावे, यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. महाशिवरात्री म्हणजे केवळ यात्रा न करता त्यातून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचे काम या समितीने केले आहे. मलिकवाड येथील महाशिवरात्री म्हणजे स्पर्धा परीक्षा हे समीकरण झाले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, कागवाड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम. जी. संकपा...

महाशिवरात्री निमित्त साईबाबा मंदिरात३५१ जोडप्यांसह महा अभिषेक संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  प्रचंड ऊर्जा,भक्ती आणि प्रसन्न वातावरणात ३५१ जोडप्यांनी सहभाग नोंदवला.  सेलू : गेल्या वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त सेलू येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात दि. 26 फेब्रुवारी बुधवार रोजी साईबाबा  मंदिरात महाभिषेकाची जय्यत तयारी पूर्ण करून  देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील् जलाश्याने शहरातील 351 जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री  महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महा आरती बुधवारी सकाळी 10:30 वाजता सुरु करण्यात आला. अभिषेकासाठी लागणारे साहित्य सेलू नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष मा. विनोद हरिभाऊ काका बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळ आणि    मंदिर समिती तर्फे देण्यात आले.अतिशय नयनरम्य सोहळा श्री साईबाबा मंदिर मध्ये पार पडला.या वेळी ३५१ यजमानांचा डोळ्यातील आनंद पाहण्यासारखा होता. विनोद बोराडे,साईराज बोराडे मित्र मंडळातर्फे  महाशिवरात्रीला महाअभिषेकची संधी उपलब्ध करून दिली. अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व यजमानांनी महाभिषेकाचा लाभ घेतला. सर्व भक्तांना महाभिषेक संपन...

महाशिवरात्री निमित्त सेलू येथील साईबाबा मंदिरात महाभिषेक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  माजी नगराध्यक्ष मा. विनोद हरिभाऊ काका बोराडे व मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.  सेलू : गेल्या वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त सेलू येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात दि. 26 फेब्रुवारी बुधवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंदिरात जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील् जलाश्याने शहरातील 301 जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री  महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महा आरती बुधवारी सकाळी 10:30 वाजता करण्यात येणार आहे. अभिषेकासाठी लागणारे साहित्य मंदिरा तर्फे देण्यात येणार आहे.सायंकाळी 7:30 वाजता स्वरांगण प्रस्तुत 'स्वरभक्ती संध्या' हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवलिंगाचा अभिषेक करून पुण्यार्जन करावे,व रात्री भक्तिगितांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ काका बोराडे, मंदिर समिती चे संचालक व मित्र मंडळानी केले आहे.