आंबेगाव पोलीस स्टेशनची मोठी कारवाई श्री.शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली.
घरफोडी चोरी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद तीन गुन्हे उघडकीस २,२७,०००० रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत आंबेगाव पोलीस स्टेशनची कारवाई .
दिनांक १७/०३/२०२५ रोजी दुपारी ३ ते ६.३० या सुमारास पहिला मजला ,कोंढरे बिल्डिंग शिलाईवर्ल्ड जवळ आंबेगाव बुद्रुक येथे घरफोडी करून चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि. क्रमांक ४८ २०२५ बी. एन. एस ३०५(अ) ३३ १(३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे .सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न सी.सी.टीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यांतील आरोपीत निष्पण करून सदर गुन्ह्यात आरोपीत नामे वेंकटेश रमेश वय २२वर्ष व्यवसाय-काहीनाही रा. पी.जी बिल्डिंग एमआयटी कॉलेज जवळ कोथरूड पुणे मुळ राहणार बेंगलोर राज्य कर्नाटक यास अटक केले आहे.
सदर आरोपीकडे तपास करून खालील प्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत .
१)आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजिस्टर क्रमांक ४८/ २०२५ बी.एन.एस
३०५(अ),३३१(३)
२)बावधन पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.रजि.१२९/२०२५ .बी.एन.एस.३०५ (अ),३३१(३)
३)लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९७/ २०२२५.बी.एन.एस.३०५(अ),३३१(३)
सदर आरोपीकडून एकुण २,२७,०००रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळसकर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर ,मा. रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मा. प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे ,श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पुणे ,श्री राहुल आवारे सह पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहोळ कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे ,निलेश जमदाडे ,धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे ,योगेश जगदाळे, समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे.
टिप्पण्या