यड्राव परिसरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

यड्राव ( प्रतिनिधी ) : यड्राव परिसरात विविध ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.                                    प्रारंभी सकाळी माणगांव येथून आणलेल्या भिमज्योतीचे यड्राव फाटा येथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन भिमज्योतीची मोटर सायकलरॅली काढण्यात आली . त्यानंतर स्टॅन्ड चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास शिरोळ पं. स .चे माजी उपसभापती श्रीमंत सत्येंद्रराजे नाईक - निबांळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .                                             यावेळी प्रकाश अकिवाटे , सुजीत गरड , शिवाजी दळवी , व ग्रामस्थ उपस्थित होते.                           त्यानंतर बुद्धविहार येथे सरपंच कुणालासिंह नाईक - निबांळकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेऊन पेढे वाटप करण्यात आले .   
                                        यावेळी आरपीआय ( आठवले ) गटाचे यड्राव शाखा अध्यक्ष प्रमोद कांबळे , शाखा सचिव अक्षय भोसले ( मेजर ) ,  पोलीस पाटील जगदिश सपकाळ , आर्चीत कांबळे , प्रसाद पोवार , माजी ग्रा.प. सदस्या सो. सारीका भोसले , रेखाताई ढोबळे , सौ. जयश्री चाफेकर , सौ. अरुणा कांबळे , समस्त समाज बांधव व भगिणी उपस्थित होते.                               यानंतर ग्रामपंचायत सभागृहात  माजी सरपंच सरदार सुतार यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                                                  यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर , ग्रा. प. सदस्य रंगराव कांबळे , मंगल कांबळे , पत्रकार संतोष साने, ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , ग्रा.प. सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.                        तसेच इंदिरानगर ( बेघर वसाहत ) येथे ग्रा. प. सदस्या मंगल कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                                           यावेळी रावसाहेब भोसले , नितीन बिरांजे , तानाजी सोनुले , हंबीर कांबळे , सोनल कांबळे , बाजीराव कांबळे , सुनिल कुरणे , शेखर पोवार , चंद्रकांत कांबळे , समस्त समाज बांधव व भगिणी , ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.