जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांचा सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमात महिलांसाठी गॅसचा वापर न करता पदार्थ बनवणे (Without Fire Cooking), एक मिनिट खेळ (1 Minute Game), Passing Pass Game, संगीत खुर्ची (Musical Chair) आणि पूर्ण मॅचिंग (Perfect Matching) या मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीराम प्रतिष्ठान  सेलूचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठान सेलूच्या सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.  
या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या कलेला आणि उत्साहाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे उपस्थितांनी आनंद लुटला. यावेळी शाळेचे प्रिंसिपल कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर, मीरा मिरिंडा, महिला पालक अस्मिता सूर्यवंशी, रुचिका गुप्ता, वैष्णवी अंधारे, आरती जोगदंड व दास मॅडम तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दलशाळेचे व्यवस्थापन व महिला शिक्षकवृंदांचे विशेष कौतुक करण्यातआले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.