करिअरकडे लक्ष देऊन उंच भरारी घ्या - ललिता गिल्डा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : दि. 11 मार्च  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नूतन अभ्यासिका सेलू येथे जागर स्त्री शक्तीचा, सन्मान कर्तुत्वाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या अंतर्गत सेलू शहरातील  राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. लता गिल्डा आणि महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांचा आणि या दोन्ही महिला मंडळाच्या कार्यकारणी तील सदस्यांचा तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख सौ. अस्मिता मोरे हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन सेलू, कु. भूमिका काकडे, या सर्वांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलत असताना श्रीमती ललिता गिल्डा म्हणाल्या की,आजच्या मुली या भावी माता असून त्यांनी चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून आपले कुटुंब आपले गाव आपला देश या सर्वांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
तसेच सौ लता गिल्डा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले तर मोबाईलकडे दुर्लक्ष करून आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शर्मिला मालानी यांनी केले.
पोलीस दल विद्यार्थि नींच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून मुलींनी मन लाऊन अभ्यास करावा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख सौ. अस्मिता मोरे  यांनी केले. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेली आणि मुलींसाठी मुलींकडून चालविल्या जाणाऱ्या या एकमेव अभ्यासिके त विद्यार्थिनी बरोबरच तिच्या मातापालकास  एक महिना मोफत अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. संतोष मलसटवाड आणि कु. संध्या भले यांनी केले तर सर्जेराव सोळंके यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.