चंदूर - सैनिक टाकळी पूलाचे काम लवकर पुर्ण करण्याच्या प्रकाश हुक्केरींनी दिल्या अधिकार्‍यांना सुचना.

चिक्कोडी तालुक्यातील चंदूर - सैनिक टाकळी  गावांच्या दरम्यान कृष्णा नदीवर 27 कोटी रूपये खर्चून बांधल्या जात असलेल्या पुलाच्या कामाची विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी श्री प्रकाश अण्णा हुक्केरी यांनी पाहणी केली.

हा महत्त्वाचा पूल कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील संपर्क सुलभ करणार असून, शेती, व्यापार आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा निर्माण करेल. कामाच्या प्रगतीचा आढावा घेत श्री प्रकाश अण्णांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी स्थानिक नेते, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.