शिरोली एमआयडीसी येथे बीपीसीएल पेट्रोल पंपावर ई-व्ही चार्जिंग स्टेशन सुरू.

शिरोली एमआयडीसी (पहिला फाटा) येथे असलेल्या बीपीसीएल पेट्रोल पंपावर आजपासून ई-व्ही चार्जिंग स्टेशनच्या मशीनची सुरुवात करण्यात आली आहे. ही सुविधा या भागातील पहिलीच असून, इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे.

दुचाकी आणि चारचाकी ई-वाहनांसाठी ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असून, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल, तसेच ई-वाहनधारकांना सुलभ चार्जिंगची सोय होणार आहे.

या चार्जिंग स्टेशनमुळे शिरोली एमआयडीसी परिसरातील वाहनधारकांना मोठा फायदा होईल, तसेच भविष्यात आणखी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.