बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टीस्टेट) संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड.
चिक्कोडी, तालुका येथील बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टीस्टेट) संस्थेच्या 2025-30 सालाकरिता नूतन संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली.
मल्टीस्टेट नोंदणी झालेल्या संस्थेत आता 21 संचालकांची निवड झाली. साहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले चिक्कोडीचे साहाय्यक उपनिबंधक मल्लाप्पा राहुतन्नावर यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे जाहीर केली.
निवड झालेले संचालक असे ः अण्णासाहेब शंकर जोल्ले (एकसंबा), शशीकला अण्णासाहेब जोल्ले (एकसंबा), सिद्राम मिनाप्पा गडदे (केरूर), यासीन गुलाब तांबोळी (एकसंबा), आप्पासाहेब शिवराम जोल्ले (एकसंबा), विभाश्री दिलीप खांडके (निपाणी), आनंद देवगौडा पाटील (सदलगा), अण्णासाहेब शंकर चौगुला (इंगळी), रीषभ कैलासचंद जैन, (इचलकरंजी), वज्रकांत बाळाप्पा सदलगे (निपाणी), प्रकाश सिद्रायगौडा पाटील (विजापूर), निंगाप्पा बसलिंगाप्पा खोकले (बाळीगेरी), काशीनाथ सदाशिव कमते (खडकलाट), दत्तात्र आनंदा पाटील (कणेरी), बाळासो अण्णासो कदम (ममदापूर के.एल.) मल्लिकार्जून बन्नाप्पा तेली (हंदीगुंद), सदानंद भीमाप्पा हळींगळी (रायबाग), जयप्रकाश शिवाजी सावंत (संकेश्वर), चेतन बिपीनचंद्र देशपांडे (मलिकवाड), श्रीनिवास शत्रुघ्न कराळे (चिक्कोडी), श्रीपाद राजाराम नेर्लीकर (चिक्कोडी).
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, एकसंबा येथे 9 संचालकांसह छोट्याच्या जागेत सुरू केलेली बिरेश्वर संस्था आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांत 225 शाखांतून सेवा देत आहे. 35 वर्षांपासून या संस्थेवर सभासदांचा विश्वास राहिला आहे. त्यामुळे आजतागायत संस्थेत बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे. या सर्व प्रवासात सभासदांचे सहाकार्य मोठे लाभले आहे.
सहसंस्थापिका शशीकला जोल्ले म्हणाल्या, बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातू अनेक संघ-संस्था सुरू करून या भागात त्या यशस्वीपणे चालविल्या आहेत. मल्टीस्टेट झाल्याने आता संचालकांची संख्या वाढली आहे. सर्व सभासद व हितचिंतकांचे सहकार्य लाभले असून संस्थेच्या प्रगतीत सर्वांनी योगदान द्यावे.
यावेळी नूतन संचालकांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री. जोल्ले यांच्याहस्ते साहाय्यक निवडणूक अधिकारी राहुतनावर यांचा सत्कार झाला. त्यानंतर जोल्ले दाम्पत्याचा सत्कार झाला. यावेळी अनेक संचालकांनी मनोगत व्यक्त केले. प्रधान व्यवस्थापक बहाद्दूर गुरव यांनी आभार मानले.
टिप्पण्या