रोहीना गावास ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता’ पुरस्कार प्रदान.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू :  दि.08 परभणी जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अर्तंगत  या वर्षाचा  ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2023-24’ पूरस्कार सेलू तालूक्या तील रोहीना (काजळे) या गावाने पटकावला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार 8 मार्च रोजी येथील जिल्हा परिषदे च्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांची उपस्थिती होती. मुख्याधिकारी रश्मी खांडेकर,ओम प्रकाश यादव,शिवराज केंद्रे, रेखा कळम, शिक्षणाधिकारी माध्य. आशा गरुड, आर.जी. स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांचीउपस्थिती होती. याप्रसंगी रोहिना गावच्या सरपंच अर्चना भारत इंद्रोके व ग्राम विकास अधिकारी राजीव वावळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रोहीना गावातील ग्रामस्थांनी सरपंचाना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.