अवैध्य व्यवसाय बंद करावे यासाठी भागातील नागरिकांच्या कडून निवेदन.

कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या ऐतिहासिक बिंदू चौक ते मटण मार्केट या परिसरात चालू असणारे बेकयदेशीर लॉजिंग बांधकाम आणि बेकायदेशीर अवैध व्यवसाय मटका,गांजा विक्री करणाऱ्यावर तत्काळ कडक कारवाई व्हावी अशी मागणी बिंदू चौक,गंजी गल्ली परिसरातील नागरिकांतून होत आहे.हे अवैध धंदे जिथे सुरू आहेत त्या ठिकाणी धर्मस्थळ आहे.आणि येथे मटका,जुगार, आणि गांजा विकत घेण्यासाठी येणारे हे सतत दारू,गांजा पिऊन हुल्लडबाजी करतात त्यामुळे येथील लहान मुलांना व महिला वर्गालाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांच्या वतीने
असे निवेदनही लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आले. महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.