दख्खनचा राजा श्री जोतिबा देवास जाणाऱ्या भाविकांसाठी सुरेश कोकणे यांचेकडून घोसरवाड येथे थंडगार मठ्ठा वाटप - त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

घोसरवाड ( वार्ताहर) घोसरवाड ता शिरोळ येथील सुरेश कोकणे यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी घोसरवाड येथे शनिवारी दि १२ एप्रिल रोजी थंडगार मठ्ठा वाटप केले
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त येथील सुरेश कोकणे यांनी चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगराला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रतिवर्षी घोसरवाड येथे थंडगार वाटप करतात यावेळी देखील त्यांनी चैत्र यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी शनिवार दि १२ एप्रिल रोजी घोसरवाड येथे थंडगार मठ्ठा मोठ्या प्रमाणात वाटप केले त्यांच्या या धार्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे 
यावेळी सुरेश कोकणे व त्यांचे कुटुंबीय तसेच बाळकृष्ण कोकणे संजय कोकणे राजेंद्र कोकणे यांचेसह बाबुराव भोई . संजय कांबळे.  बाळकृष्ण नंदिकुरळे. सर्जेराव संकपाळ. यांचेसह इतर मान्यवर सामाजिक कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची  बाळकृष्ण कोकणे व कोकणे बंधू घोसरवाड यांची मानाची सासणकाठी क्र. १०६ आहे . चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर  जाणाऱ्या भाविकांसाठी घोसरवाड येथे सुरेश कोकणे व कुटुंबीय यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेल्या या धार्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.