पोस्ट्स

टायगर पोलीस मित्र संघ मुंबई वडाळा विभागाची पद नियुक्ती कार्यक्रम.

इमेज
प्रतिनिधी सारंग महाजन      टायगर पोलीस मित्र संघ मुंबई वडाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला दिवसेंदिवस टायगर पोलीस मित्र संघटनेचे कार्य हे महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राबाहेरही जोमाने वाढत आहे समितीवरील व महेश दादा वरील लोकांचा विश्वास  दिवसेंदिवस वाढत चालला आहे .संघटनेच्या कार्याचा आकार वाढत आहे आणि वाढतच राहणार . कार्यक्रमासाठी पुणे येथील * मा.महेश(अण्णा)फडतरे (संस्थापक अध्यक्ष) * यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित मा. अक्षय दादा मोगरे(कार्याध्यक्ष महा राज्य), मा. डॉ रश्मी ताई बापट(प्रदेशाध्यक्षा), मा. डॉ ज्योती चव्हाण (उपाध्यक्ष), मा.वैभव भाऊ शिंदे(पुणे शहर अध्यक्ष)मा.विराज भाऊ वाडकर(पुणे जिल्हा कार्याध्यक्ष), मा.प्रदीप राजपूत सिंह(उत्तर प्रदेश अध्यक्ष), मा.उमेश खंडागळे(उद्योजक) याचं बरोबर मुंबई( वडाळा) कार्यकारणी अध्यक्ष मा.प्रविण पवार, कार्याध्यक्ष  मा.शेखर कदम, उपाध्यक्ष  मा.सुलतान शेख , महासचिव मा.सुमित भोजने, सचिव मा.निलेश अनपट, सरचिटणीस  मा.प्रकाश गोरीवले, चिटणीस  मा...

खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांनी घेतले दुर्गादेवीचे आशीर्वाद.

इमेज
रायबाग : चिक्कोडीच्या खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांनी शहरातील विद्या नगर येथे नवरात्रीनिमित्त दुर्गादेवीचे आशीर्वाद घेतले.   यावेळी भारती शिरगमवे, तनुजा शिंदे, सरिता पुताणी, आदी उपस्थित होते.

पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार - स्नेहा वसंतराव देसाई.पुणे येथे इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची तयारी आणि मोर्चे बांधणी सर्वच पक्षात जोरात सुरू आहे.सर्वच पक्ष विधानसभेच्या जागांची चाचपणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. इच्छुकांनी आपआपली मते, व्यूहरचना विशद केली.दरम्यान शिरोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सौ. स्नेहा वसंतराव देसाई यांनी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते एकमेव उमेदवारी मागणी केलेली आहे.त्यासाठी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील आग्रही आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार,खा. सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या.              या पार्श्वभूमीवर सौ.स्नेहा वसंतराव देसाई म्हणाल्या की,शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून पक्षाची ध्येयधोरणे व विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.लोकसभा निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेवून प्रचाराचा शुभारंभ करून मताधिक्य मिळविण्या...

'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या लढ्याला मोठे यश : पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ.

इमेज
मुंबई - जगभरामध्ये ४३ देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी तब्बल तीन वर्ष लढा दिला होता. साखळी उपोषण, आंदोलन, मागण्यांचे निवेदन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १२ मिटिंग केल्यावर आज अखेर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या सर्व शिलेदार, पदाधिकारी, सदस्य यांनी राज्यभर आपला आनंद उत्सव साजरा केला. मंत्रालयासमोर आंदोलन, आझाद मैदानावर आंदोलन, नागपूर अधिवेशन काळात आंदोलन, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील समोर आंदोलन, विभागीय आणि राज्यात साखळी आंदोलन असे तब्बल तेरा मोठी आंदोलने केल्यावर आज अखेर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी असणाऱ्या महामंडळाला मंजुरी दिली. 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या सुपीक कल्पने...

राष्ट्रभाषा परिषद परीक्षेत दि न्यू हायस्कूलचे नेत्रदीपक यश.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) -  दि न्यू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज इचकरंजी विद्यालयाने राष्ट्रभाषा परिषद परीक्षा-2024 मध्ये नेत्रदीपक यश मिळविले. या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100% लागला असून चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक तर शिक्षकांना आदर्श प्रधानाचार्य आणि  आदर्श हिंदी अध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.             राष्ट्रभाषा परिषद, पुणे यांचेकडून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी विद्यालयातून 220 विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. नुकताच परिषदेकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये दि न्यू हायस्कूल विद्यालयाचा निकाल 100%  लागला असून कु.कोमल कांबळे इ.10 वी, कु. जोया जमादार इ.9वी, कु. श्रावणी माळकरी इ.8 वी, कु. अनन्या पाटील इ.5 वी अश्या चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात नाईट कॉलेज, इचलकरंजीचे हिंदी विभागप्रमुख डॉ. माधव मुंडकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि हिंदी व्याकरण पुस्तक देवून सम्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रभाषा विकास परिषदेकडून व...

हुपरी येथे हनुमान कॉर्नर मित्र मंडळ हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर पैठणीचा खेळ व मराठी वेशभूषा स्पर्धा आयोजित.

इमेज
हुपरी हनुमान कॉर्नर मित्र मंडळ व हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त  खास महिलांसाठी होम मिनिस्टर पैठणीचा खेळ व महाराष्ट्रीयन वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन संयोजिका उमा महाजन  ,मधुमती कोळी,तेजश्री काशीद,वर्षा कोळी,प्रिया पतंगे यानी यावेळी केले.  होम मिनिस्टर स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेत्या पूजा सुनील पाटील  द्वितीय क्रमांक प्रिया अमित पतंगे तर  महाराष्ट्रीयन वेशभूषा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेत्या वैभवी कौलकर  द्वितीय क्रमांक स्वप्नाली लेंगडे  तृतीय क्रमांक तनवी महाजन यांनी मिळवला  या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेले मडंळातील सचिन घोडके योगेश काशीद,अनिकेत उगळे  आकाश घोडके,व दगडू महाजन यांचे सहकार्य लाभले.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

इमेज
बेळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बेळगावात घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी बुधवारी केला. बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी गावातील आरती चव्हाण (३२) ही गर्भवती होती. आरतीला मंगळवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने गोंधळी गल्ली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचवीस हजार पैसे भरल्यानंतर सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.   संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर आले तेव्हा बीपी कमी होता.    रुग्ण वाचणार नाही, असा विचार करून त्यांनी केएलई रुग्णालयात धाव घेतली. केएलई रुग्णालयात नेत असताना वाटेतच आरतीचा मृत्यू झाला.    रूग्ण तीन तास रूग्णालयात त्रस्त होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरतीच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला. रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात कुटुंबियांनी खडेबाजार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

देऊळगाव गात ग्रामपंचायातवर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  भाजपा चा दणदणीत विजय.  सेलू : आज दि. 07 ऑक्टोबर 2024 रोजी देऊळगाव गात ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ.लक्ष्मीबाई दत्ताराव कदम यांची निवड करण्यात आली. त्यावेळी मा. सरपंच सौ. मीनाताई गोरे,ग्रामपंचायत सदस्य सौ.भाग्यश्री दत्ता कदम,सौ.शालन सुधाकर कदम, लक्ष्मीबाई लक्ष्मणराव तांबे,सौ.शांताबाई सोनटक्के, श्री.रवींद्र विठ्ठल गोरे,गणेश तुकाराम काळे, शिवाजी कदम इत्यादी ग्रामपंचायत  सदस्य उपस्थित होते.देऊळ गाव गात ही ग्राम पंचायत राष्ट्रवादी तुतारी गटाच्या ताब्यात होती.माजी सरपंच सौ. मीनाताई गोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती. काल दी 7:10:2024 रोजी फेरनिवडणूक होती यावेळी फेर निवडीत  भारतीय जनता पार्टीच्या सौ लक्ष्मीबाई दत्ताराव कदम निवडून आल्या.या निवडणुकी त भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष दत्तराव कदम यांनी पुढाकार घेतला. तालुक्याच्या विकास रत्न आमदार सौमेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ॲड.दत्तराव कदम यांच्या पुढाकाराने दे...

निपाणीतील कोगनोळी आरटीओ चेकपोस्टवर लोकायुक्तांचा छापा.

इमेज
चिक्कोडी : लॉरी चालकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारीनंतर लोकायुक्तांनी पहाटे निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी आरटीओ चेकपोस्टवर छापा टाकला. बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी गावातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील आरटीओ चेक पोस्टवर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. लोकायुक्त अधिकारी चेकपोस्टवर नोंदणी पडताळणी करत आहेत. सुमारे सहा अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करत आहे. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हा हल्ला झाला.

वारकरी सांप्रदायातला विठ्ठल हरपला.......!

इमेज
अत्यंत शांत, संयमी, * जिव्हाळ्याचा झरा * म्हणून ज्यांच्याकडे पाहत होतो ते * सदाशिव कुंभार काका *....!    अकिवाटच्या माळावरील * कुंभार बंगला * आज पोरका झाला. ज्यांची वाणी अमोघ होती, आणि दूरदृष्टी वाखाणण्याजोगी....! असा एक अवकाशातला * शुक्रतारा * निखळून पडला. * सदाशिव काका * म्हणजे अकिवाटची शान होती. कुंभार कुटुंबीयांची मान होती. आपल्या जीवनात आखीव रेखीव रचना होती, आपल्या मुलांना विचारांचा वारसा दिला होता. मुलंही कर्तुत्ववान आणि कामसू निघाली. वीटभट्टीच्या व्यवसायामुळे अनेकांशी ऋणानुबंध जुळले, ते रुजले.   खत पाणी घातले. आपल्या आयुष्यात जपले. त्यांना आपलेसे केले. कामावरती नितांत श्रद्धा आणि भक्ती ठेवून विठ्ठलाच्या पंढरीत कर्तुत्व सिद्ध करणारे * सदाशिव काका * म्हणून सर्वांच्या हृदयात घर करून राहिले. जो आवडे सर्वांना, तो आवडे देवाला....! या नियतीच्या न्यायाने आम्हा तुम्हा सर्वांना सोडून आज ते स्वर्गस्थ झाले. त्याला निश्चितच * मोक्षलक्ष्मी * प्राप्त झालेली असणार यात संदेह नाही. त्यांच्या देहातून मुक्त झालेल्या आत्म्याला मोक्ष लक्ष्मी निश्चितच...

ऑल इंडिया आर्टिस्ट राईट्स & फिल्म असोसिएशन ची स्थापना

इमेज
बुलढाणा प्रतिनिधी -सारंग महाजन आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ वार रविवार रोजी - पिंपरी चिंचवड येथे शिवाजी पार्क संभाजी नगर मध्ये हर्षधन विला मध्ये कलाकारांची बैठक पार पडली. कलाकारांचे अनेक प्रश्न पण कलाकारांसाठी आवाज उचलणार हक्काचं कुणी नाही म्हणून सर्व कलाकारांनी एकत्रीत येऊन या संघटनेची स्थापन केली. * All India Artists Rights & Film Association (ऑल इंडिया आर्टिस्ट्स राईट्स अँड फ़िल्म असोसिएशन) *  .... ही नूतन संघटना इथून पुढे कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल. सन्माननीय संतोषभाऊ खाडे यांच्या हस्ते नूतन संघटनेच्या छापील पत्रकाचे उदघाटन करण्यात आले. * या मेळाव्यामध्ये कलाकारांच्या हिताचे मुद्दे, महिला कलाकारांच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर चर्चा झाली * *कलाकारांच्या जीवनातील प्रश्न आणि त्यांच्या जिवनयापन प्रश्न या सारख्या गहन मुद्यावर चर्चा झाली*महिला कलाकारांनी बरेच प्रश्न मांडले या संघटनेद्वारे कलाकारांचे प्रश्न व त्यावर योग्य मार्गदर्शन तसेच प्रत्येक कलाकाराला काम देण्याचा व कामाचा योग्य मोबदला मिळावा, कलाकारांना सेटवर मानसन्मान मिळा...

मंठा येथील श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रेचा आज पासून शुभारंभ.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. नवरात्री निमित्त  विनोद बोराडे व मित्र मंडळाचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून मोफत वाहन सुविधा सुरु. उपक्रम सुरु.   सेलू :नवरात्रमहोत्सवा निमित्त  गेल्या  अनेक वर्षा पासून सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे,या उद्धेशाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने आज  पासून (दि.07 ऑक्टो.) श्री जगदंबा माता दर्शन यात्रा सुरु करण्यात आली आहे. याचा अधिकाधिक महिला भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पाचव्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत ( 07 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबर 2024) प्रर्यन्त महिला भाविकांची जाण्या- येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री.साईबाबा मंदिर परिसरात ही वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री साईबाबा मंदिर महेश नगर ते मंठा व परत श्री साईबाबा मंदिर, असा दर्शन प्रवास राहील.सकाळी 9 ते सायंकाळी 4 असा दर्शन यात्रेसाठी वेळ दिला आहे. फक्त महिलांसाठीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत दर्शन यात्रा प्रवासा साठी संपर्क क्रमांक 9...

न्यू हायस्कूल मध्ये समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.7 न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सखी सावित्री व विशाखा समितीकडून कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ. अभिलाषा जोगदंड, सरकारी वकील ॲड रूपाली आम्ले, पोलीस शिपाई राहूल गोरे, मुख्याध्यापक बी. ए. नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, प्रनयना तेलगोटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.  जोगदंड यांनी गुडटच - बॅडटच, वैद्यकीय समस्या यावर तर ॲड. आम्ले यांनी अल्पवयीन गुन्हेगारां साठीचे कायदे, शिक्षा याविषयी माहिती दिली. तर पो कॉ गोरे यांनी गुन्हे व शिक्षा तसेच विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे फोन नंबर यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ता विक धनंजय भागवत यांनी केले. सुत्रसंचलन डी.एस. मोरे यांनी तर आभार रामेश्वर गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव नागरे, मंजुषा रेंगे, विष्णू गजमल, नारायण काष्टे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे वितरण

इमेज
कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांचे शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सतेज पाटील व राज्यातील तसेच जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.  यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदींच्या समाजसेवेतील अतुलनीय कार्याबद्दल जाहीर नागरी सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, आरोग्य, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, कला रत्न, श्रम रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक / शिक्षिका, कामगार भूषण, आदर्श संस्था, सहकार भूषण, कला भूषण...

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी धर्मस्थळ संघाने अनेक योजना आणल्या : आम.डी.एम.ऐहोळे

इमेज
रायबाग : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी धर्मस्थळ संघाने अनेक योजना आणल्या आहेत, असे मत आमदार डी.एम.ऐहोळे यांनी व्यक्त केले.  शहरातील महावीर भवन येथे रविवारी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्प, अखिल कर्नाटक जिल्हा जनजागृती मंच, प्रगती बंधू स्वयंसहाय्यता आणि ज्ञान विकास संघ यांच्या वतीने गुन्हेगारीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी भव्य जनजागृती रॅली व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने समाज घडवणारे धर्मस्थळाचे डीकॉन डी. वीरेंद्र हेगडे म्हणाले की, आपण सर्वांनी हातमिळवणी केली पाहिजे.  परमानंदवाडी येथील अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांनी आज समाजाचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.  ते म्हणाले की, कौटुंबिक जीवन चांगले ठेवायचे असेल तर वैयक्तिक आरोग्य चांगले असायला हवे.  यावेळी चिक्कोडी जिल्हा जनजागृती मंचाचे संस्थापक अध्यक्ष एस.टी.मुन्नोळी, धर्मस्थळ योजना धारवाड विभागाच्या प्रादेशिक संचालक दयाशील, प.प.अध्यक्ष अशोक अंगडी, प्रा.पी.जी.कोन्नूर, धर्मस्थळ योजना चिक्कोडी जिल्हा संचालिका विठ्ठल सलियान, तालुका...

चिक्कोडी जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या तायक्वांदो स्पर्धेचे आम.डी.एम.ऐहोळे यांच्या हस्ते उद्घाटन.

इमेज
रायबाग : शारिरीक खेळात सहभागी होऊन मुले शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकतात, असे प्रतिपादन आमदार डी.एम.ऐहोळे यांनी केले.   शिक्षण विभाग आणि कर्नाटक तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरातील डॉ. बाबू जगज्जीवनराम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सन 2024-25 या वर्षासाठी 14/17 वर्षाखालील मुला-मुलींच्या चिक्कोडी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. , येथे सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवून चिक्कोडी जिल्ह्याचे नाव लौकिक मिळवावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.     चिक्कोडी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या अध्यक्ष विजय भजंत्री, जयदीप देसाई, महेश फराडेकर, वाय.बी ते खेळाडू होते.

भिमनगर-विद्यानगर परिसरात झालेल्या निघृण खूनाचा निपाणी पोलीसांनी केला उलगडा.

इमेज
निपाणी - दि. २ ऑक्टोबर रोजी भिमनगर-विद्यानगर परिसरात झालेल्या निघृण खूनाचा पोलीसांनी उलगडा केला असून सदर घटनेत मयत अशरफ अली शेअरली नगारजी (वय २०,रा, दावलमलीक दर्गानजीक, निपाणी) याचा खून पूर्व वैमनस्य आणि २०२२ साली मानवी गल्ली येथील अभिजीत दत्तवाडे या युवकाचा बदला म्हणून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी ७ जणांना गजाआड केले असून यामध्ये सहभागी आणखीन ५ आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही जेरबंद करणार असल्याची माहिती सीपीआय बी.एस. तळवार यांनी दिली.याप्रकरणी पोलीसांनी रवि ईरण्णा शिरगांवे (वय, २७, रा.हणबर गल्ली), रोहित प्रशांत पठाडे (वय २४, रा. हौसाबाई सावंतकॉलनी), ओम दिलीप कंदले (वय२३, रा. कुंभार गल्ली), पारस संजय श्रीखंडे (वय २२, रा. जत्राट वेस) हृतिक सदाशिव पावले (वय २५,रा. महादेव गल्ली), अरबाज राजमहंमद सय्यद (वय २४, रा. हौसाबाई सावंत कॉलनी), अनिकेत कृष्णा घोडगेरी (वय २२, रा. सासणे गल्ली, निपाणी ता. निपाणी) या ७ जणांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.या प्रकरणातील मयत अशरफअली नगारजी...

सेलूत जरांगे पाटील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

इमेज
डॉ.शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : येथील सेलू तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परभणी रोडवरील श्री राम कॉप्लेक्स मध्ये शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी करण्यात आले.  उद्घाटन समारंभासाठी मराठा समाज प्रबोधनकार ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, ह.भ.प.जयराम महाराज तांगडे, दादासाहेब गाडेकर, दत्तात्रय अप्पुसेठ सोळंके, जयसिंग शेळके, गोविंद काष्टे, सिद्धेश्वर खोसे, सिद्धेश्वर सोळंके,विष्णू सोळंके, पंजाब देशमुख,मनोहर पावडे, बाळकृष्ण पौळ, रामेश्वर गटकळ,गोविंद टकले,अनंत थोंबाळ, अनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या सामाजिक लढ्यात शासनाकडून न्याय मिळेपर्यंत आरक्षणा च्या या चळवळीत संपुर्ण तालूक्यातील समाज बांधव सक्रिय सहभागी होतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच संपर्क कार्यालयाच्या माध्यमा तून या लढ्यातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी पुर्ण पणे सहकार्य केले जाणार आहे.

कोठेकर कुटुंबीयांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी-श्री जयप्रकाशजी बिहाणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. नूतन कन्या प्रशालेत स्वर्गीय सौ. कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर )स्मरणार्थ शुद्ध जल प्रकल्प सेवार्थ समारोह. सेलू :शाळेच्या शिकवणीला स्वतःच्या वागणुकीतून सत्यात उतरवून दाखवणाऱ्या स्व. सौ.कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर) स्मरणार्थ कोठेकर कुटुंबीयांचा विद्यार्थिनींसाठी शुद्ध जल प्रकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे जयप्रकाशजी बिहाणी यांनी प्रतिपादन केले. दि.5 ऑक्टो. 2024 नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही.के कोठेकर आणि परिवार यांच्या आर्थिक योगदानातून स्व. सौ. कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर) यांच्या स्मरणार्थ नूतन कन्या प्रशालेत शुद्ध जल प्रकल्प सेवार्थ समारोहाचे आयोजन श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागात करण्यात आले होते .याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी बोलत होते. व्यास पीठावर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायणजी लोया, उद्घाटक नितीन दीक्षित ( अभियंता नाशिक), नूतन विद्यालय शिक्...

८७व्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचा भाग म्हणून राज्यभर फिरणाऱ्या कन्नड ज्योती रथाचे जल्लोषी स्वागत.

इमेज
रायबाग: मंड्या येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचा भाग म्हणून राज्यभर फिरणाऱ्या कन्नड ज्योती रथाचे शनिवारी शहरातील आंबेडकर सर्कलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, सीपीआय बी.एस.मंतूर, पी.पी.अध्यक्ष अशोक अंगडी, एम.पी.जीराग्य, डॉ.आर.एच.रंगन्नवर, डॉ.एम.बी.पाटील, एम.के.शेटसनाडी, रा. पाटील, सुखदेव कांबळे, राकेश आवळे, गजानन माळी व कन्नड संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 

चिक्कोडी येथील फळविक्रेत्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.

इमेज
चिक्कोडी : राजीवनगर येथील रहिवासी व फळविक्रेत्या रेणुका सुभाष भजंत्री (वय 35) या महिलेने शुक्रवारी गळफास घेऊन आत्मसमर्पण केले. मयत महिला ही फळांची व्यापारी होती. या पार्श्वभूमीवर मृत महिला चांगलीच नाराज होती. अपघातामुळे पतीला आर्थिक समस्या असल्याने घर चालवणे कठीण झाले होते.    त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.

सोलापूर तुळजा भवानी मंदिरापासून शहरातील अंबाबाई भवानी मंदिरापर्यंत ज्योतीचे जंगी स्वागत

इमेज
रायबाग: महाराष्ट्रातील सोलापूर तुळजा भवानी मंदिरापासून शहरातील अंबा भवानी मंदिरापर्यंत ज्योतीचे संगीताच्या साथीने स्वागत करताना भाविक.  संभा हवालदार, भीमू कोळी, रमेश पाटील, संजू मेत्री, शंकर कोळी, अजिता कोळी, राजू हवालदार, सदाशिव कोळी यांच्यासह अनेक भाविक होते.

जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी आणि नूतन महा विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा दि. 01 ऑक्टोबर रोजी नूतन महा विद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये यशस्वी संपन्न झाली. एकूण नऊ तालुक्यातील वयोगट 14, 17, 19 मुले / मुली या सर्वांच्या ट्रॅडिशनल,आर्टिस्टिक, रीदमिक या योगा प्रकाराच्या स्पर्धा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या तांत्रिक मार्ग दर्शनाने घेण्यात आल्या. एकूण 200 मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धे च्या उद्घाटन समारंभा चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम राठोड उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक अनंत घावडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती  अतुल दातार, प्रवीण सोनवणे, कृष्णा कवडी, तालुका क्रीडा संयोजक  प्रशांत नाईक, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, देविदास सोन्नेकर प्रा. नागेश कान्हेकर उपस्थित होते.भारताने संपूर्ण जगाला दिलेली आयुर्वेदाप्रमाणेच योग ही देणगी तरुणांच्या शारीरिक ...

श्रीदत्ताबाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हॉकी स्पर्धेमध्ये घवघवीत यश

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर १४ वर्षाखालील मुलांच्या शालेय हॉकी स्पर्धेत श्रीदत्ताबाळ हायस्कूल संघाने प्रथम क्रमांक मिळवला व विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली. विजेत्या हॉकी संघात कर्णधार शार्दुल जाधव, संकेत बंडागळे, रूद्र पाटील,साईप्रसाद खोत, तन्मय फलके, गणेश लोखंडे, श्लोक संकपाळ, स्वयंम भुयेकर, सर्वेश साळोखे, शौर्य कांबळे, शकुंत देसाई, अविष्कार दिंडे, कौस्तुभ मदनेि, आराध्य जाधव,आयुष राऊळ, अनिष मोरे, अर्णव लांबोरे, पार्थ पाटील यांचा समावेश होता. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक श्री. समीर भोसले व सौ. अनुराधा सडोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.   तर संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी व माजी नगरसेवक श्री. निलेश देसाई, विश्वस्त श्री. वेद देसाई, संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदिप डोंगरे, मुख्याध्यापक श्री. सचिन डवंग, मुख्याध्यापिका कु. रोहिणी शेवाळे यांचे प्रोत्साहन लाभले.

बांधकाम कामगारांना ओळखपत्राद्वारे विविध योजनांचा लाभ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.बांधकाम कामगार मेळावा.,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे व बचतगटांना फुड कार्टचे वितरण

इमेज
नागपूर, दि. ३ * : सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे, त्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. बांधकाम कामगारांना ओळखपत्र वितरणाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आरोग्य, शिक्षण, घरकुल आदी लाभ देण्यात येत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या हस्ते कामगारांना ओळखपत्र, संसार व सुरक्षा किटचे तसेच बचतगटांना फुड कार्टचे (गाड्या) वाटप करण्यात आले.        येथील जयताळा परिसरातील एसआरपी मैदानावर आयोजित ‘बांधकाम कामगार मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्यासह मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.      उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून जयताळा परिसरातील ४ हजार कामगारांची नोंदणी झाल्याची माहिती मिळाली असून ही आनंदाची बाब आहे. नोंदीत कामगारांना ओळख...

अति प्राचीन काळातील शेरे गल्लीत असलेली सेलूची जगदंबा माता मंदिर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनीधी परभणी.  यंदा ही नवरात्र महोत्सव उत्साहात  सुरू. दि ४  ऑक्टोबर पासून देविभागवत कथेस प्रारंभ.  सेलू : सेलू येथे अति प्राचीन काळातील शेरे गल्ली येथे असलेले  आई जगदंबा माता मंदिर हे अति प्राचीन असून जवळपास पाचशे वर्ष पूर्वीचे असल्याचे बोलले जाते.येथील शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. अंदाजे ५०० वर्षांपूर्वी सेलूत  सुभेदार जे शहराचे ग्रामदैवत  केशवराज बाबासाहेब नांवाने ओळखले जातात यांची गढी होती.त्या गढीच्या मातीत जगदंबा देवीची मूर्ती सापडली.त्यावेळी शेरे परिवाराने या मूर्तीची स्थापना केली. तेव्हां पासून मातृभक्त असलेला शेरे परिवार हा उत्सव साजरा करतो. शेरे परिवाराचे हे कुलदैवत व श्रद्धास्थान असून सर्वजण या उत्साहात तन, मन व धनाने सहभागी होतात .हा उत्सव म्हणजे शेरे  परिवाराची एक प्रकारे दिवाळीच असते . कारण लग्न झालेल्या लेकीबाळी देखील यावेळी  आवर्जून येऊन उत्साहात सहभागी होतात . पूर्वी पासून चालत आलेला हा पारंपरिक नवरात्र महोत्सवात आता नवीन पिढीने सहभाग घेऊन आमूलाग्र असा बदल केला आहे .त्यामुळे हा...

"मोठी दुर्घटना" दारूच्या नशेत युवकाची रेल्वेखाली उडी पाय गेला तुटून, हातकणंगले रेल्वे स्टेशनवरील घटना..

इमेज
हातकणंगले - दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ वय वर्ष 23 राहणार कवठेसार या युवकाने आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजाण्याच्या सुमारास हातकणंगले तारदाळ दरम्यान असणाऱ्या रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारत असताना रेल्वेच्या साईडला धडकून तो बाजूला फेकला गेला व त्याचा उजवा पाय रेल्वेच्या रुळामध्ये अडकून तो कट झाला. याबाबत कोल्हापूर रेल्वे पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी विशाल अडसूळ हा युवक हा सकाळपासूनच हातकणंगले येथील एका बार वर दारू पीत असल्याचे काही नागरिकांना पाहिले होते. दारूच्या नशेतच सदर युवकांनी रेल्वे रुळावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हे बऱ्याच वेळाने लक्षात येताच त्यांनी समर्पण रुग्णवाहिकेचे स्वप्निल नरोटे यांना पाचारण करून सदर युवकास तारदाळ येथे रुग्णालयात दाखल केली परंतु त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे.आत्महत्येची कारण समजू शकले नाही.

खेळातून करीअरच्या अनेक संधी उपलब्ध- सतीश नावाडे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  मैदानी क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद. सेलू : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासा ठी शिक्षणा बरोबरच खेळ देखील अतिशय महत्त्वाचा असून आजच्या आधुनिक काळात खेळातून ही करिअर च्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. असे आवाहन राज्य पुर स्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक सतीश नावाडे यांनी केले.  क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक ३ आक्टोबर रोजी आयोजित तालुका मैदानी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून डी. डी. सोन्नेकर,प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक दिलीपराव सुरवसे, प्रा नागेश कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  या मैदानी स्पर्धेसाठी तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक खेळाडू धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी,रीलेनिंग, हातोडा फेक,इत्यादी मैदानी खेळात मोठ्या संख्येने खेळाडू सहभा गी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्तावि क तालुका क्रीडा...

“संभाग स्तरीय विलुप्त लोक एवं जनजातीय कला उत्थान महोत्सव” का हुआ रंगारंग शुभारंभ  केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी ने किया महोत्सव एवं पेंटिग प्रदर्शनी का उद्घाटन  गोंधळ, लावणी इत्यादि लोक नृत्यों की हुई रंगारंग प्रस्तुति

इमेज
संस्कृति मंत्रालय, भारत सरकार के दिशानिर्देशों के अनुसार दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर द्वारा दिनांक 2 अक्टूबर से 4 अक्टूबर 2024 के दरम्यान शाम 6.30 बजे “संभाग स्तरीय विलुप्त लोक एवं जनजातीय कला उत्थान महोत्सव” का आयोजन किया जा रहा है| इस महोत्सव का उद्घाटन दिनांक 2 अक्टूबर 2024 को मुख्य अतिथि मा. केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के शुभहस्ते दीपप्रज्वलन कर हुआ| इस अवसर पर विशेष अतिथि के रूप मे मा. वरिष्ठ शास्त्रीय नृत्य गुरु श्री मदन पांडे व वरिष्ठ पेंटिंग कलाकार श्री प्रमोद बाबु रामटेके की उपस्थिती थी| केंद्र की ओर से अथितियों का स्वागत केंद्र के सहायक निदेशक (कार्यक्रम) श्री दीपक कुलकर्णी द्वारा शॉल, स्मृति चिन्ह एवं पुष्प गुच्छ देकर किया गया| मा. केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी ने सभी कलाकारो को सम्मानित किया| इसके पश्चात मा. केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी ने पेंटिग प्रदर्शनी का भी शुभारंभ किया|      कार्यक्रम के अवसर पर अपने विचार ...

महाराष्ट्रातील सर्वच सांप्रदायाची त्याचप्रमाणे सर्व संप्रदाय मिळून तयार झालेल्या वारकरी संप्रदायाची परंपरा

इमेज
महाराष्ट्रातील सर्वच सांप्रदायाची त्याचप्रमाणे सर्व संप्रदाय मिळून तयार झालेल्या वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्रामध्ये ज्या घराण्यांनी किंवा कीर्तनकार प्रवचनकारांनी जोपासती त्या सर्वांमध्ये आज आपल्या आनंद संप्रदायाचे थोर सत्पुरुष संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांचे एकनिष्ठ साधक गुरुवर्य गोविंद मनाजी गाडगे साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अध्यक्ष संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा यांची समर्पित जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आनंद संप्रदायातील सर्व अधिकार संपन्न व्यक्तिमत्व कीर्तनकार प्रवचनकार वारकरी टाळकरी साधक यांच्या वतीने बाबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन उद्या संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण संत ज्ञानेश्वर तुकाराम सभागृह जगातील सर्वात मोठा घुमट लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे आनंद संप्रदायातील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती. आपला श्री हशालिग्राम महाराज खंदारे सेवक एमआयटी विश्वशांती विद्यापीठ कोथरूड पुणे सचिव संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर.

युवा अभिनेता राहुल जारकीहोळी याचा २५ वा वाढदिवस साजरा.

इमेज
रायबाग;  युवा अभिनेता राहुल जारकीहोळी याचा २५ वा वाढदिवस गोकाका येथील हिल गार्डन येथे पहिला केक कापून साजरा करण्यात आला.             यावेळी अधिवक्ता राजू शिरगमवे, संभाजी शिंदे, सागर जंदडेण्णावर, बासू कांबळे, उमेश टांगेवागोल, महांतेश सवदी, रवी बेडेर आदी उपस्थित होते.

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.यानंतर पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी आपल्या मनोगतातून लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवना विषयी माहिती सांगितली.महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यायालयातील नावेद जावेद मुजावर इयत्ता: 8वी या विद्यार्थ्यांने महात्मा गांधीची वेशभुषा सादर केली.व त्यांचा उपदेश सांगितला तसेच या निमित्त विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मगदुम.एस.बी...

शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेगः सीमेवर ५ चेकपोस्टवर ४५ कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

इमेज
शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शी पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तालुक्याच्या सीमेवर पाच चेकपोस्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी १५ टीमच्या अंतर्गत ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस विभाग आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. नोडल अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पथकांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक मतदान प्रक्रियेदरम्यान देखरेख आणि सुरक्षा यंत्रणांचे नियोजन करतील. याशिवाय, मतदानाच्या प्रत्येक टप्प्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी सहा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, ज्यात तांत्रिक तज्ञ आणि पोलिस कर्मचारी सहभागी असतील. शिरोळ तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. तहसील कार्यालयात मतमोजणीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण आण...

अर्लिअन कवियों का अध्यात्म बहुउद्देशीय उपक्रम अंतर्गत मुलांच्या व महिलांसाठी स्पर्धा, कार्यक्रम संपन्न.

इमेज
अर्लिअन कवियों का अध्यात्म तर्फे संपूर्ण भारतभर अनेक बहुउद्देशीय उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .या अंतर्गत कोल्हापूर शिरोली येथे कुमार विद्या मंदीर शाळेत  30 सप्टेंबर रोजी एक छोटासा मुलांसाठी व महिलांसाठी स्पर्धा व खेळ असा उपक्रम घेतला .मुलांनी झांज पथक घेऊन वाजत गाजत आयोजकांना शाळेत आणले प्रवेशद्वारावर त्यांचे औक्षण झाले. कार्यक्रमाचे रंगतदार व खुमासदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप कोरवी सरांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अर्लिअन कवियों का अध्यात्मच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख सौ.रोहिणी अमोल पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पवार सर यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी बजावली. मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षण वीणा पाटील व संजना पाटील या दोघींनी केले त्यात अनुक्रमे तीन विजेत्यांचे नंबर काढण्यात आले. त्यांची नावे फॅशन शो स्पर्धा १. प्रणिता संजय कांबळे २ .अर्पिता संदीप कोरवी. ३.प्रज्वल दिलीप घोरे महिलांची उखाणा स्पर्धा घेतली .त्याचे परिक्षण श्री दत्तात्रय गुरव सरांनी व रेश्मा घोरे यांनी केले .त्यात अनुक्रमे  तीन  विजेते ...

श्री भावेश्वरी कानूर बुद्रुक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

इमेज
कानूर :- श्री भावेश्वरी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अशोक शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली गतवर्षीपेक्षा संस्थेला चालू आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली असल्याचे संस्थेचे संस्थापक अशोक आगाशे यांनी सांगितले संस्थेत चालू आर्थिक वर्षात ठेवी ६ कोटी झाल्या कर्ज वाटप ४ कोटी ७५ हजार झाल्याचे नमूद केले अहवाल सालात संस्थेचा चालू आर्थिक वर्षात ७ लाख ७० हजार इतका नफा झाला असून संस्थेला चालू वर्षात * ऑडिट "अ" * वर्ग मिळाल्याचे सांगितले पतसंस्था सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून चालवण्यात येत आहे. संस्थेवर ठेवीदार व इतरांचा विश्वास संपादन तसेच हित जोपासते सभासदांना लाभांश १० टक्के जाहीर केला संस्थेचे मॅनेजर संजय आगाशे यांनी सविस्तर इतिवृत्ताचे वाचन करून सभेपुढील विषयाचे व अहवाल वाचन केले संस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव मोरे संचालक भीमान्ना मोरे, तुकाराम गुरव, गोविंद फाटक,गणपती गुरव,तुकाराम मोहिते,सागर मटकर,सरस्वती गणाचारी,लक्ष्मण केरकर,चंद्रकांत नाईक संस्थेचे सर्व कर्मचारी संजय आगाशे, विक...

खंडाळा तालुका शाखा उद्घाटन व वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील भोसले साहेब यांचा सत्कार.

इमेज
प्रतिनिधी - सारंग महाजन       टायगर पोलीसमित्र संघटना (महा-राज्य)मा.महेश(अण्णा)फडतरे(संस्थापक अध्यक्ष) मा.अक्षयदादा मोगरे (कार्याध्यक्ष) मा.सौ.डॉ रश्मीताई बापट (प्रदेशाध्यक्षा) मा.विराज वाडकर(भोर तालुका अध्यक्ष) , मा.सौरभ ताकवले(पुरंदर तालुका अध्यक्ष)यांच्या समवेत खंडाळा तालुका शाखा उद्घाटन तसेच लोणंद पोलीस स्टेशन ला वरिष्ठ अधिकारी श्री.सुशील भोसले साहेब यांचा सत्कार समारंभ पार पडला.  संघटनेचे ध्येय,उद्दिष्ट आणि काम या विषय चर्चा करण्यात आली तसेच खंडाळा तालुका पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली ... उपस्थित खंडाळा तालुका पदाधिकारी:श्रेयस खुडे (अध्यक्ष खंडाळा तालुका ),शुभम क्षीरसागर(उपाध्यक्ष खंडाळा तालुका),कुणाल क्षीरसागर (कार्याध्यक्ष खंडाळा तालुका )आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मुलींच्या कबड्डी संघासाठी जिल्हा प्रभारी मंत्र्यांची आर्थिक मदत

इमेज
रायबाग : तालुक्यातील हिडीकल गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळा सुरणावर थोटा येथील १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाला बेळगावी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रोत्साहन दिले.   रविवारी गोकाकाच्या हिल गार्डन स्वग्रहात शाळेचे मुख्याध्यापक बी.  एम मेनसी यांच्या नेतृत्वाखाली 10 मुलींच्या संघाची भेट घेत असताना मंत्री महोदयांनी त्यांचे अभिनंदन केले आणि विजयपुरा येथे होणाऱ्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक मदतीसाठी शुभेच्छा दिल्या.         चेन्नडसच्या भटक्या समाजातील मुलींच्या या संघाने रायबाग तालुकास्तरीय कबड्डी मेळाव्यात प्रथम क्रमांक व चिक्कोडी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले.  4 ऑक्टोबरपासून विजयपुरा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.  चिक्कोडी लोकसभा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.   या प्रसंगी याच शाळेचे जुने विद्यार्थी बंड्या साहित्याचे डॉ.  यल्लाप्पा हिमाडी, युवा नेते बसवराज सायन्नावर, समाजसेविका मं...