परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी. आमदार मेघनाताई बोर्डीकर.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


सेलू : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची  आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून अत्यल्प पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस व इतर पिके रोगराई व पाण्याअभावी समूळ नष्ट झाली आहेत. परभणी जिल्ह्यातील परिस्थिती याहून जास्त बिकट असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देउन केली.परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यां च्या झालेल्या नुकसानी बाबत राज्य सरकार गंभीर असून आपल्या मागणीवर निश्चितपणे विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेबांनी यावेळी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.