लिंगायत कुंभार राज्यस्तरीय स्नेह मेळा व समाज बांधवांचा कौतुक सोहळा अंकली येथे २६ रोजी आयोजन ना.सुरेश खाडे प्रमुख पाहुणे

यड्राव: अंकली (ता.मिरज) येथील श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था,महाराष्ट्र यांचे  वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यस्तरीय वधू वर मेळावा व समाज बांधवांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आले आहे.
       रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अंकली येथे कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे , आमदार सुधीर दादा गाडगीळ , उप जिल्हाधिकारी डी एस कुंभार ,सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र कुंभार ,डॉ उत्तम कुंभार,प्राचार्य राजेंद्र कुंभार उद्योगपती आर.टी कुंभार ,बालरोग तज्ञ् डॉ सुहास कुंभार व अध्यक्ष किरण कुंभार   याच्या उपस्थितीत  होणार आहे 
      सकाळी १० वाजल्यापासून  कुंभार मंगल कार्यालय , जैन पाइप समोर, सांगली- कोल्हापूर रोड ,अंकली येथे संपन्न होणारआहे 
       या मेळाव्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लिंगायत कुंभार बांधवानी आपल्या नातेवाईकांची तसेच मुला मुलीची नावे नोंद करून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आह
        वधु-वर परिचय मेळावा आणि त्यामध्ये समाज बांधवांची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी स्नेह मेळावा व समजल समाजातील कर्तुत्ववानांचे कौतुक समाजापुढे व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  समाज बांधवांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्याचे कौतुक मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे
     या मेळाव्याचे आयोजन, कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार , उपाध्यक्ष  लक्ष्मण कुंभार ,संस्थेचे सचिव दत्तात्रय कुंभार , खजिनदार भरत कुंभार ,सर्व संचालक सदस्य तसेच सर्व समाज बांधवांच्या  सहकार्यातून होत आहे
      तरी सर्व समाज बांधवानी या स्नेह मेळाव्यास मोठे संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन घन:शाम कुंभार व प्रभाकर धामणीकर यांनी केले  आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.