दिवाळीचा आनंदाचा शिधा 100टक्के वाटप.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू :- दिवाळी निमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा 100टक्के वाटप करण्यात आले असल्याचे सेलू तहसीलदार श्री दिनेश झापले यांनी सांगितले.  दिनांक 24/11/2023 रोजी स्वस्त धान्य दुकान नंबर 11च्या वाटप प्रसंगी बोलत होते. सेलू शहरात अन्न धान्य वस्तू वाटप सर्व स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात आले. शहरातील 21 दुकाना मार्फत सर्व लाभार्थीना रवा, मैदा, साखर तेल, डाळ, पोहे असलेला शिधा पॅकेट मधून शासनाने निर्गमित केलेले सर्व वस्तू वाटप करण्यात आले. शिधा वाटप करण्यासाठी श्री नितीन कोरडे, सचिन गायकवाड, अशोक राऊत आदी कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. सर्व  स्वस्त धान्य दुकानात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन तहसीलदार श्री दिनेश झापले यांनी समाधान व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.