मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम जलद गतीने करण्याची सकल मराठा समाजाची मागणी.
शिवाजी शिंदे
सेलू :सेलू तालुक्यातील 95 गावापैकी फक्त 13 गावात केवळ 361 मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.या नोंदी तालुक्याच्या मानाने अतिशय नगण्य आहे. यंत्रेणेने नोंदी शोधणेचे काम अतिशय जलदगतीने करणे गरजेचे आहे अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
सेलू तहसीलदार यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सेलू तालुका या पूर्वी पाथरी व जिंतूर तालुक्याला संलग्न होता.या दोन्ही तालुक्यात नोंदी प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून तालुक्यातील प्रत्येक गावातील नोंदी शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा कुणबी नोंद असलेले कागदपत्रे शोधायचे आदेश दिलेले आहेत पण सेलू तालुक्यात ही संख्या अतिशय कमी आहे ते काम लवकरात लवकर करावे नसता सकल मराठा समाज सेलूच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम,हरिप्रसाद काष्टे ,रामेश्वर गटकळ, अजित मोगल, रामेश्वर गाडेकर, विजय मैफळ, शिवहरी शेवाळे, रामेश्वर लिपणे, शक्ती बोराडे, निशिकांत रोडगे, अजित पवार,गणेश निवळकर, अशोक ताठे, मुंजाजी लिपणे, बालाजी लिपने, शिवम गटकळ, महादेव गटकळ, कैलास पवार, पांडुरंग डासाळकर, गोविंद, शेळके, दिगंबर सोळंके, सतीश गटकळ, विकास शेवाळे, शिवाजी काष्टे, विठ्ठल काष्टे, शिवम शेवाळे, राजेश शेवाळे, दिपक गटकळ, सखाराम नाटकर, संदीप नागटिळे, कैलास लहाने रमेश शेळके, किशन गोरे, दीपक उकलकर, कैलास मोगल, रामेश्वर जाधव, अनिल शेलार, माणिक लिपणे, विलास रोडगे, कल्याण ताठे, माऊली ताठे, राहुल सपाटे, आकाश रोडगे, ज्ञानेश्वर आवटे व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या