बांधकाम कामगारांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्या -- महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना

 इचलकरंजी ( 4 ) नोंदित  बांधकाम कामगारांना दिवाळी करीता पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्या या मागणीचे निवेदन कामगार मंत्री मा. सुरेशभाऊ खाडे  यांना आज महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज शिष्टमंडळ देण्यात आले
.       कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने अनेक नागरिकांनी  बांधकामे काढणेचे थांबवले आहे. खास  करून ग्रामीण भागातील बांधकाम रखडलेली दिसून येत आहेत  यामुळे बांधकाम कामगारांना काम मिळत नाही. कामगारांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.  यामुळे यावर्षी दिवाळी करिता बांधकाम कामगारांना १५ हजार सानुग्रह अनुदान देऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानी कामगारांची दिवाळी करणेस मदत करावी अशी  मागणी शिष्ठ मंडळाच्या वतिने  करणेत आली 
.        सागुग्रह अनुदान संदर्भात चर्चा सुरू आहे. एक दोन दिवसात सर्व बाबी तपासून निर्णय घेऊ असे आश्वासन मा. मंत्री महोदयांनी दिले 
‌           .यावेळी कामगार नेते कॉ. आनंदा गुरव,  रघुनाथ देशिंगे, धनाजी गुरव,  दिनकर लोहार,आयुब मुजावर, जिशान बागायत, दादासो गस्ते, अशोक माळी  आदि शिष्टमंडळा उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.