सेलू शहरात होणाऱ्या इजतेमा स्थळी माजी आ. विजय भांबळे यांची भेट.
शिवाजी शिंदे
सेलू : शहरातील मदरसा फुरखानिया वालूर रोड या ठिकाणी दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी इजतेमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 11 नोव्हेंबर शनिवार रोजी माजी आ.विजयराव भांबळे यांनी भेट देऊन जागेची पाहणी करत विजेची सुविधा उपलब्ध करण्याचे प्रशासनाला आदेशित केले.तसेच फुरकानिया मदरसाच्या अरबी शाळेची पाहणी केली.
यावेळी मौलाना मोहम्मद सादेक साहब नदवी, अशोक नाना काकडे, सुधाकर रोकडे, प्रकाश मुळे, शिवराम कदम, विशाल देशमुख, रघुनाथ बागल, गौस लाला भाई, सय्यद मुझफ्फर , अजीम कादरी, गुड्डू भाई, तोफिक सिद्दीकी, लालू कुरेशी, गौतम साळवे सह मदरसा येथील मौलाना उपस्थित होते.
टिप्पण्या