केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल
इचलकरंजी - केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल करून टाकणार्या सरकारच्या धोरणा विरोधात आयटकच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत तब्बल एक महिना कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. या संघर्ष यात्रेत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व जनरल लेबर यूनियन सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत घेणेत आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. धनाजी गुरव होते
. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा जाणार असून ठिक ठिकाणी जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे या संघर्ष यात्रे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
. सरकारने स्वीकारलेल्या विनाशकारी व कार्पोरेट समर्थक धोरणांच्यामुळे देशातील कामगार शेतकरी व सर्वसामान्य जनता देखील चिंताजनक परिस्थितीत वावरत आहे. या विनाशकारी धोरणापासून जनतेला वाचवणे ,जनतेची उदरनिर्वाहाची साधने शाबूत ठेवणे, कामगार कपात, कायम नोकऱ्यांवर आलेली गदा, आऊटसोर्सिंग, कंत्राटीकरण, वाढती बेरोजगारी व वाढती महागाई , जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढत जाणाऱ्या किमती आदींचा संघर्ष कामगार वर्गाला सध्या करावा लागत आहे. कामगार संहिता अर्थात लेबर कोडच्या माध्यमाने मोठ्या परिश्रमाने मिळवलेले कामगार कायदे नष्ट करण्यात आले आहेत. याधोरणा विरूद्ध संघर्ष यात्रा आहे तरी २० रोजी कोल्हापूर येथुन सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात कामगारांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन ही या बैठकीत करणेत आले
. बैठकीस कामगार नेते कॉ. आनंदा गुरव यांनी मार्गदर्शन केले तर दिनकर लोहार, धनाजी गुरव, आयुब मुजावर, रघुनाथ देशींगे, दादासो गस्ते, जिशान बागायत, अशोक माळी, इक्बाल मुल्ला, छाया नाईक, राजेंद्र कांबळे, तानाजी गुरव, राहुल माळी, राजेंद्र माळी, सुधिर माने आदी उपस्थित होते.
टिप्पण्या