शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल, शैलेंद्रनाथ आमणगी "राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव" पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : (सुरेश केसरकर))
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा !!गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः !! या पंक्तीप्रमाणे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभवाने व मार्गदर्शनाखाली अनेक यशस्वी विद्यार्थी घडविणारे पूज्य गुरुवर्य शैलेंद्र आमणगी सर यांना त्यांच्या एकूणच शैक्षणिक तसेच समाजाभिमुख कार्याच्या जोरावर नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी यांचेवतीने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, अभिनंदन पत्र व चंदन हार देवून "राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार" बेळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सहकुटूंब प्रदान करण्यात आला. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 1989 पासून सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक या पदापर्यंत मजल मारून, त्यांनी विविध ठिकाणी ज्ञानदानाचे तसेच समाजासाठी भरीव कार्य केलेले असून त्यांचे एकूणच शैक्षणिक कार्य व त्या माध्यमातून त्यांनी घडवलेल्या अनेक विद्यार्थ्यांची कारकिर्द दैदीप्यमान व उल्लेखनीय अशीच आहे. 
त्यांनी उत्तूर विद्यालय उत्तूर या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्मवीर विद्यालय, चिमणे येथे लोकवर्गणीतून व संस्थेच्या सहकार्याने शाळेच्या 5 खोल्यांचे बांधकाम 4 महिन्यात पूर्ण केले. करवीर प्रशाला, कोल्हापूर येथे संस्थेच्या व शासनाच्या सहकार्याने इयत्ता 8 वी व 9 वी साठी टेक्नीकल ची सुरुवात केली आहे. उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उत्तूर येथे सन 2022 पासून फाली या संस्थेमार्फत व संस्थेच्या सहकार्यातून शेती विषयक अभ्यासक्रम सुरू केला. शालेय अभ्यासाखेरीज विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन व्हावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जावे अशा उद्दात्त हेतूने, उत्तूर मध्ये सन 1992 साली महात्मा फुले वाचनालयाची स्थापना केली आहे. तेथे उपाध्यक्ष म्हणून सक्रियपणे कामगिरी पार पाडत आहेत. त्रिवेणी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, उत्तूर  या संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत असून गेले 20 वर्षे लोकशिक्षण व्याख्यानमाला राबवित आहेत. त्यांनी योग विद्याधाम नाशिक येथून योग शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून या माध्यमातून अनेक विद्यार्थी व युवकांना योगाचे धडे दिले आहेत. एकूणच अध्यापनाचे काम करत असताना मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या एकूणच ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात व समाजातील सर्वच घटकांप्रती भरीव कार्य करण्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे तसेच संघटन कौशल्यामुळे त्यांना यापुर्वी कै. केदारी रेडेकर संस्था समुह, गडहिंग्लज यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार 2013, माननीय गुरुवर्य बी. जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2017, राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन कागल यांचा स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सरांनी - अनंत आमुची ध्येयासक्ती, अन् अनंत आशा, किनारा तुला पामराला ! अशा जिद्दीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य व प्रेरणा निर्माण करून, ज्ञानामृत पाजलेले शाळेचे माजी विद्यार्थी सध्या जिल्हा, राज्य व देश पातळीवरती वेगवेगळ्या पदांवरती भरीव कार्य करीत आहेत. सणासुदीच्या निमित्ताने ज्यावेळी ते विद्यार्थी आवर्जुन भेटायला येतात त्यावेळी भेटल्यानंतर, संबंधित विद्यार्थ्यांनी आमच्याबद्दल जे कृतज्ञतेचे व कौतुकाचे चार शब्द काढलेले असतात, ते आम्हांला वेगळा आनंद देऊन जातात. आपला विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा, त्याने देशसेवेसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत नावलौकीक मिळवावा, यासाठी आपण बाल्यावस्थेत केलेल्या संस्काराची पोहोच पावती मिळते तसेच सदर पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली असल्याचे त्याचबरोबर आजपर्यंत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल आनंद झाला असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.