सकल मराठा समाजाचे गावबंदीचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले.फाडले.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
 
   
 सेलू : सेलू तालुक्यातील मौजे चिकलठाणा येथे सकल मराठा समाजाचे गावाच्या पाठीवर लावलेले नेत्यांच्या गाव बंदीचे बॅनर अज्ञात इसमाने फाडले. याचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने चिकलठाणा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व सेलू पोलीस स्टेशनला अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सेलू पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की चिकलठाणा पाटीवरील सकल मराठा समाजातर्फे नेत्यांना गावबंदीचे बॅनर अज्ञात इसमाने फाडले आहे. अंबड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा सातबारा मराठ्याच्या बापाच्या नावाचा आहे का? गाव बंदीचे बॅनर तात्काळ काढा? असे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगानेच कुणीतरी अज्ञाताने हे बॅनर फाडले आहेत. त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.