लाल बावटा बांधकाम कामगार संघटना जनवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर
जनवाड ता चिकोडी येथे बेळगाव जिल्हा लालबावटा बांधकाम कामगार संघटना जनवाड यांच्या वतीने व लोटस मेडिकल फाउंडेशन तसेच सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनवाड मधील श्री महादेव स्वामी मठामध्ये शुक्रवारी तारीख 3, 11, 2023 रोजी सकाळी 9 वाजता मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी नेत्र तपासणी व जनरल चेकअपचे शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सर्व कामगारांसह नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे कामगार संघटना जनवाड यांनी कळवले यामध्ये रक्तामधील सर्व तपासणी केली जाणार आहे तसेच नेत्र तपासणी मध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये चष्मा देणार आहेत त्यामुळे याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती
टिप्पण्या