हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने बंद ठेवणार...?
हातकणंगले - ऊस दर आंदोलनाच्या नावाखाली वाहने जाळणे, उलथून टाकणे या प्रकारामुळे जे हिंसक वळण लागत आहे त्या पार्श्वभूमीवर हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामात पहिला हप्ता ३५०० रुपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. त्या अनुषंगाने फक्त हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्याना होणारी ऊसतोड बंद पाडली जात आहे. शिवाय वाहने पेटविणे, भरलेल्या बैलगाड्या उलथून टाकणे असे प्रकार घडत आहेत. त्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचेच होत आहे. मागील हंगामातील 400 रुपये देणे शक्य नाही तसेच चालू हंगामासाठी एफआरपी नुसार एकरकमी दर देणे शक्य असल्याचे कारखानदाराकडून सांगितले जात आहे.
तरीही शेतकरी संघटनेकडून संघर्ष निर्माण केला जात आहे.लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय हेतूने फक्त या दोन तालुक्यातील साखर कारखान्यांना टार्गेट करीत असल्याने दोन्ही तालुक्यातील कारखान्यांनी साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
टिप्पण्या