हुपरीत सार्वजनिक गटारीच्या वादात दोन गटात तुफान हाणामारीएक जण गंभीर जखमी
हुपरी प्रतिनिधी - हुपरी येथील प्रभाग क्रमांक 8 मधील सार्वजनिक गटार करण्याच्या वादात नगरसेविकेचे पती सुर्यकांत रावण यांना काही प्रभागातील तरूणानी मारहाण केली यात नगरसेविकेचे पती हे गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ कोल्हापूर मधील डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात दाखल केले.यात एका पक्षाचे शहरप्रमुख व शिक्षण संस्थेचे चालक यांचेसमोर हा सर्व प्रकार घडला आहे.यात दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी त्या प्रभागातील 200 महिला व 100 ते 200 पुरूष पोलीस ठाणे येथे जमा होऊन कारवाईची मागणी करत होते.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
टिप्पण्या