पोस्ट्स

बोरगावचे तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर आणि कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकला छापा.

इमेज
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगावचे तलाठी विठ्ठल ढवळेश्वर  यांच्या घरावर आणि कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत.   यापूर्वी विठ्ठल ढवळेश्वर  याला चिक्कोडीहून बागलकोटला 1.10 कोटींची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते आणि ते राहत असलेल्या निपाणी शहरातील भाड्याच्या घरात बरीच रक्कम सापडली होती. या संदर्भात विठ्ठल ढवळेश्वर यांच्यावरही बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप झळकले असून, ते आता लोकायुक्तांच्या जाळ्यात आले आहेत. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम लेखापाल विठल ढवलेश्वर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये पैशांची वाहतूक करताना त्याला बेळगाव पोलिसांनी रामदुर्गाजवळ कोंडून ठेवले होते. आता लोकायुक्तांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असून महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. याशिवाय सवदत्ती तालुक्यातील उगारगोळा येथील धारवाड KIADB सहायक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा भजंत्री यांच्या नातेवाईकांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या प...

उद्या अमित शहांच्या सभेमुळे वाहतुकीमध्ये बदल.मेघना बोर्डीकर साठी जिंतूर विधान सभा मतदारसंघात महायुती चे शक्तीप्रदर्शन होणार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   जिंतूर : दि.12 रोजी   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निवडणूकी च्या प्रचारार्थ जिंतूरात बुधवारी (दि.13) दुपारी 2 वाजता परभणी रस्त्यावरील साई मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजि त करण्यात आली असून या सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन व्हावे या दृष्टीने महायुतीच्या उमेदवार तथा आमदार सौ. मेघनासाकोरे-बोर्डीकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नेतेमंडळी व पदाधिका र्‍यांनी प्रयत्नांची परा काष्टा सुरु केली आहे या विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघनासाकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह यांची ही सभा होणार असून परभणी रस्त्यावरील साई मैदान हे या सभे करिता स्थळ निश्‍चित करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने जिंतूर तालुका तसेच सेलू तालुक्यातील शहरासह खेड्या- पाड्यांमधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेत या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भक्कम असे नियोजन केले आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध प्रभागांपासून वाडी- तांड्यांपर्यंत पदाधिका री व...

राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लजकडून 4 लाख 5 हजार रुपयांचे वाहनासह मद्य जप्त. 1 लाख 5 हजार 470 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा.

इमेज
कोल्हापूर, दि. 12   विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लज कार्यालयाकडून वाहनासह 4 लाख 5 हजार 470 रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 1 लाख 5 हजार 470  रुपये असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक यांनी दिली आहे.     कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज या पथकास दिनांक 12 नोव्हेंबर रोजी बातमी मिळाली की, गाव मौजे तुडीये तालुका चंदगड येथील प्रकाश तुकाराम गुरव या इसमाने त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेल्या सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन क्रमांक MH-१२-DE-२९७१ या वाहनात दारूचा साठा ठेवला आहे, प्रकाश तुकाराम गुरव या इसमाच्या राहत्या घराजवळ जावून दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा घातला असता त्यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेल्या वाहनामध्ये वेगवेगळ्या बॅण्डचे देशी व विदेशी मद...

रायबाग : तालुक्यातील हाळे दिग्गेवाडी गावातील कृष्णा नदीकाठी श्री गंगादेवी यात्रा (बोट मेळा) 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मोठ्या थाटात साजरा होणार

इमेज
14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता डॉलीचे शब्द हा कार्यक्रम होणार आहे.  15 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता श्री गंगादेवीच्या पालकी उत्सवाची भव्य मिरवणूक व भव्य नैवेद्य, कोन्नूर, नारागुंडा तालुक्याच्या श्री रायण्णा महिला डोली मंडळातर्फे भव्य वाद्यवृंदाच्या साथीने होणार आहे.  त्याच दिवशी रात्री 11 वाजता गी गी शब्दांचा कार्यक्रम होणार आहे.   16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नदीतून पालकी उत्सव होणार असून देवी मंदिरात परतणार असून, सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचे सामने होणार आहेत.   17 नोव्हेंबर रोजी घर धुण्याचा कार्यक्रम, रात्री 10 वाजता यकसांबाच्या बसवेश्वर नाट्य संघातर्फे सती संसार ज्योती नाटक हे कौटुंबिक नाटक सादर होणार आहे.  श्री गंगादेवी यात्रा कमिटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

शिरोळ तालुक्यात पुन्हा डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार म्हणून निवडून येणार जवाहर चे माजी संचालक जे जे पाटील.

इमेज
अब्दुल लाट वार्ताहर - शिरोळ तालुक्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शाहू आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अब्दुल लाट मधून सर्वाधिक मते मिळतील असा विश्वास जवाहर चे माजी संचालक जे जे पाटील साहेब यांनी आमच्या दैनिकाशी बोलताना व्यक्त केले कारण गट तट जातपात न पाहता यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे तालुक्यात प्रचारात त्यांनी मुसंडी मारली आहे अनेक बंधू-भगिनी त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि शिरोळ तालुक्यात त्यांनी केलेला विकास कोठावधी रुपयांचा असून शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम केला आहे केलेल्या विकास कामाच्या जोरावर तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करतील असा मला ठाम विश्वास आहे मी आवाहन करतो की तालुक्यातील जनतेने विकासगंगा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करावे आणि ते निवडून येतील यात तीळ मात्र शंका नाही असे प्रकट मत जवाहर चे माजी संचालक जे जे पाटील साहेब यांनी व्यक्त केले आहे

माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर व महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्यामध्ये खरी चुरस

इमेज
278 हातकणगंले विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरशीने व इर्षेने प्रचार सुरू असून  प्रचारामध्ये आघाडीवर असणारे सध्याचे परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुजित मिणचेकर व महायुतीचे अशोकराव माने (बापू) यांच्यामध्ये खरी चुरस होण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय जाणकारांची मते असून  हातकणंगले मतदारसंघात समप्रमाणात स्वताचे अस्तित्व टिकवून ठेवलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) याची भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. मनसेचे पारडे ज्या बाजुला झुकणार व हुपरी भागातील नदीपलीकडील आठ गाव जिकडे कल देणार तो आमदार होणार. हातकणंगलेतुन मनसेच किगंमेकर ठरणार हे नक्की खरं वास्तविक पाहता भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा जनसंपर्क असून  त्यांना काही अंतर्गत गटबाजीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे.  महायुतीची कार्यक्रर्ते एकसंध राहणार का यावर अजून बरेच राजकारण अवलंबून आहे. डॉक्टर सुजित मिणचेकर हे शिवसेना (उबाठा) गटाचे असून  शिवसेनेचे कट्टर असणारे काही कार्यकर्ते हे काँग्रेसला कदापी मतदान करणार नाहीत  ती शिवसेनेची मते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मते व वैयक्तिक सुजित मिणचेकर ...

अशोकराव माने यांनी पद नसताना उभा केला कामाचा डोंगर. मा.खासदार श्रीमती डॉ.निवेदिता माने

इमेज
जनसामान्यांच्या प्रगतीसाठी अविरत झटणारे महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने (बापू ) यांना निवडून आणण्यासाठी खासदार माने गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन मा. खासदार निवेदिता माने (वाहिनीसाहेब ) यांनी केले.              महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने (बापू )  यांच्या प्रचारार्थ रुकडी येथे खासदार माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मा.खासदार निवेदिता माने (वाहिनीसाहेब ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.             मा. खासदार श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या, अशोकराव माने यांनी कोणतेही पद नसताना गेल्या पाच वर्षांमध्ये  हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या वर आली आहे. खासदार माने गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकदिने काम करून अशोकराव माने (बापू ) यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.         यावेळी प्रमुख मान...

गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी प्रहार चा राजीनामा गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी प्रहार चा राजीनामा : डॉ दगडू माने

इमेज
अकिवाट  : प्रतिनिधि सचिन मठपती           सामाजिक, सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करून सामान्य जनतेशी नाळ जोडून गणपतराव पाटील दादा हे काम करीत आहेत. गणपतराव पाटील दादा यांच्या कामाला बळ देण्यासाठी मी प्रहार जनशकती पक्षाचा राजीनामा देऊन त्यांच्या विजयासाठी काम करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होण्यापेक्षा  केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून तालुक्यात परिवर्तन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत गणपतराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मत शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ. दगडू माने यांनी व्यक्त केले.      अकिवाट ( ता शिरोळ ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील (दादा ) यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा, रॅली नंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.

शेतकरी हित जोपासणाऱ्या मविआच्या गणपतराव पाटील यांना निवडून द्या. - स्वाती सासणे.

इमेज
माजी जि. प. समाज कल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या, महागाईची झळ सर्वच माता बहिणींना पोहोचत आहे. पंधराशे रुपये देऊन या माता-भगिनींची व्यवस्था करू म्हणत, धमकी देण्याचे काम महायुतीचे खासदार करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरणात महिलांना तुरुंगात घालण्याचे काम झाले आहे. अशा लोकांच्या आपण पाठीशी राहणार आहोत की शांत, संयमी नेतृत्वाच्या मागे राहणार आहोत याचा विचार लोकांनी करावा. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरोळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्नेहलता देसाई म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेतून दिले जाणारे पैसे म्हणजे दाजीच्या खिशातून पैसे काढून लाडक्या बहिणीला देऊन भावाचे नाव करण्याचा प्रकार आहे. फसवाफसवी, फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची परिस्थिती दयनीय झाली असून शेतकरी हित जोपासणाऱ्या मविआच्या गणपतराव पाटील यांना निवडून द्या.

अकिवाट येथील गायरान जमिनीवरील इंडस्ट्रियल इस्टेटप्रश्नी मी गावकऱ्यांच्या पाठीशी : गणपतराव पाटील यांची ग्वाही

इमेज
शिरोळ :  प्रतिनिधी सचिन मठपती  अकिवाट येथील गायरान जमिनीवर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यास येथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठा त्रास आणि अडचण होणार आहे. त्यामुळे तेथे इंडस्ट्रियल इस्टेट न करता गायरानची ही जागा कायमस्वरूपी गायरानच म्हणूनच राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. गावकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर राहीन, असे आश्वासन शिरोळ विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिले. तसेच अकिवाट येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामात खंड पडला असून हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली अकिवाट येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित पदयात्रा, रॅली काढल्यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.

कलागुण ओळखण्यासाठी प्रतिभा करंजी हे उत्तम व्यासपीठ - तहसीलदार सुरेश मुंजे.

इमेज
रायबाग : मुलांमधील कलागुण ओळखण्यासाठी प्रतिभा करंजी हे उत्तम व्यासपीठ असल्याचे मत तहसीलदार सुरेश मुंजे यांनी व्यक्त केले.  नगरच्या मध्यवर्ती शाळेत शिक्षण विभाग व क्षेत्रीय शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच तालुकास्तरीय प्रतिभा कारंजा व प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या कलोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कला असते, ती शिक्षकांनी ओळखली पाहिजे आणि प्रोत्साहित करा  पालकांनी आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.               समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक WHI .एस.  चंद्रागी, बीईओ बसवराजप्पा आर., पी.पी.चे अध्यक्ष अशोक अंगडी, अक्षरा दसोह अधिकारी एस.जी.वाल्यापुर, व्ही.एच.बी.आरगे, जिनेंद्र निलजागी, करेप्पा नाईक, एम.व्ही.एच.पठान, आर.पी. अरबल्ली, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.  शिक्षक एस.आर.कंबर यांनी स्वागत, शारीरिक निरीक्षक एम.पी.जिरागिहाल यांनी, एम.एस.पुजारी यांनी आभार मानले.

जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांचा राजीनामा, आज वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  ऐन निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाला धक्का. सेलू : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी ऐन निवडणुकीत शिवसेने च्या जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा दिला असून सोमवारी ते वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करणार आहेत.सेलू तालुक्या तील वालूर येथील सरपंच व एक बडे प्रस्थ असलेले संजय साडेगावकर यांनी ऊबाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा देऊन शिवसेनेला ऐन निवड णुकीच्या तोंडावर दणका दिला असून शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.गेल्या काही दिवसापासून संजय साडेगावकर हे शिवसेनेत उबाठा गट विचलित होते. साडेगावकर यांच्याकडे पाथरी व जिंतूर हे दोन विधानसभा मतदार संघ सोपवण्यात आलेले होते. मात्र या दोन्ही मतदार संघाबाबत त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नव्हता त्यामुळे  त्यांनी रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उबाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून सोमवारी वालूर येथे वंचित बहुजन आघाडी चे जिंतूर सेलू मतदार संघाचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या उपस्थिती त वालूर ये...

जीवाचे रान करू पण शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी गणपत दादांना निवडून आणू, माजी सरपंच संजय धनगर.

इमेज
नवे दानवाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादांच्या प्रचाराचा ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे नारळ वाढवून हालगीच्या कडाडा मधे शुभारंभ करण्यात आला त्यावेळी माजी सरपंच संजय धनगर म्हणाले कसल्याही परिस्थिती मध्ये क्षारपड मुक्तीचे जनक व महाविकास आघाडीचे धडाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादांना शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निवडून आनु असे म्हणाले. गावातून प्रमुख मार्गावरून रॅली काढून मतदाराशी सवांद साधण्यात आला,  व गावामध्ये प्रतेक वार्डात घरोघरी जाऊन  हात या चिन्हा वर शिक्का मारून निवडून आणण्यासाठी आवाहन केले यावेळी प्रचारासाठी गावातील युवक  मोठ्या प्रमाणात हाजर होते,व तसेच कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या प्रचाराला गावातून भरभरून प्रतिसाद मिळाला यावेळी माजी सरपंच बाबासाहेब पाटील, माजी सरपंच चंगेज खान कुराडे, माजी सरपंच दिपक कांबळे, कुराडे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, भगतसिंह शिलेदार सर, शिवाजी साळुंखे, सागर परिट , संजय परिट, अहमद सनदी, रामा बेरड, रामा कांबळे, शंकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, आप्पासाहेब कांब...

रांगोळी येथे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचा प्रचार शुभारंभ.

इमेज
रांगोळी - हातकणंगले विधानसभा मतदार संघातील  महायुतीचे अधिकृत उमेदवार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचा प्रचार शुभारंभ रांगोळी येथे नुकताच संपन्न झाला,रांगोळी येथील ग्रामदैवत ब्रम्हनाथ मंदिर मध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गावातील एस टी स्टँड पासून हलगीच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत गावभागातील मुख्यरस्त्याने काळमवाडी वसाहत माळ भाग येथे  उत्साहात रॅली काढण्यात आली, यावेळी स्वागत व प्रास्ताविक गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे वहिनी यांनी केले तसेच  अमितदादा गाट वैशाली डोंगरे यांनी मनोगते व्यक्त केली,  यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील,हुमायून मुल्लाणी ,किरण हवालदार ,सचिन सादळे,सुभाष नरदे, आर,डी सादळे, अनिल शिरोळकर, मोहन घोडके, अभिजित कांबळे, कुबेर कांबळे,रणजीत कमते,नाना मगदूम,नारायण भोसले,जयवंत सादळे, तानाजी सादळे,श्रीकांत कांबळे, दिलीप कांबळे,बबलू मोरे अक्षय पोर्लेकर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

दुचाकीचा अपघात, दोन ठार, एक जखमी

इमेज
चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात शुक्रवारी रात्री दुचाकी चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील प्रभाकर गोसरवडे (45), मोहन कोळी (42) आणि नागेंद्र शिरहट्टी (35) हे तिघेही दुचाकीवरून इंगळी येथून शुरुगुप्पी गावाकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात प्रभाकर घोसरवडे व मोहन कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. मात्र नागेंद्र शिरहट्टी यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अंकली पोलिसांनी दिली. अंकली पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंकली पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोदींनी देशात सत्तेचा गैरवापर करत फोडाफोडीचे राजकारण केले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. विजय भांबळे यांच्या प्रचार सभेला अलोट गर्दी.   सेलू : देशात व राज्यात मोदींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून विरोधकांना इडी,सी.बी.आय. या यंत्रणेचा वापर करीत त्यांना जेरीस आणून त्यांच्या वर खोटया केसेस दाखल करून फोडाफोडीचे राजकारण करीत  आपल्या पक्षात सामील करून सरकार पाडणे असे कृत्य केल्याचे त्यांनी आज सेलू येथे सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत व्यक्त केले. शुक्रवार दि. 8 नोव्हें. रोजी दुपारी दोन वाजता सुरु होणारी सभा थोडी उशीरा सुरु झाली.व्यासपीठावर महिलाध्यक्ष फौजीया खान, जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे, खासदार संजय जाधव ,उमेदवार विजय भांबळे,हेमंत राव आढळकर,माजी जि.प.सभापती राजेंद्र लहाने,अशोक नाना काकडे, राम खराबे नाना, अजय चौधरी,सुधाकर रोकडे,संजय साडेगावकर,प्रकाश मुळे अडीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोकसभेची निवडणुकीत सर्व विरोधी पक्षाने एकजुट दाखविल्यामुले यश संप...

जातीयवाद्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या आमदाराला जागा दाखवा. राजापूर येथे दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांचे आवाहन

इमेज
शिरोळ/ प्रतिनिधी:      गेल्या निवडणुकीत दलित मुस्लिम आणि सर्व बहुजन समाजाने पाठिंबा देऊन राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आमदार केले. पण आपण ज्यांच्यामुळे आमदार झालो त्यांनाच ते विसरले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रश्नावर आंदोलकावर लाठी हल्ला झाला हे आपण कसे विसरू शकतो? जे आमदार विकास कामे केली असे सांगत आहेत, त्यामधून गावांचा विकास न होता त्यांचा वैयक्तिक विकास झाला आहे. त्यामुळे या फसव्या आमदाराला कोणताही थारा देऊ नका. जातीयवाद्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या या आमदाराला सर्वांनी जागा दाखवणे गरजेचे आहे. गरिबांच्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या गणपतराव पाटील दादांना 50 हजार मतांनी निवडून आणूया, असे आवाहन दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.    राजापूर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. प्रारंभी राजापूर गावांमधून प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली. महिला मतदारांनी मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना ज...

श्रीमंती अंकले यांचे निधन

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड मलिकवाड : येथील लिंगायत समाजातील जेष्ठ श्रीमंती मल्लाप्पा अंकले (वय ९५) यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात नातू, नातसून, पणतवंडे असा परिवार आहे. जनशक्ती को- ऑप क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष राजू अंकले यांच्या त्या आजी होत. शनिवार दि. ९ माती सावडणेचा कार्यक्रम आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या भेटीला

इमेज
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड मार्गालगत असलेल्या टारे मल्टिपर्पज हॉल येथे या मंगळवारी दुपारी २ वाजता विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिरोळ विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विविध विकासकामे राबवण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यात तब्बल २ हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली असून यात रस्ते, आरोग्य सुविधा, क्षारपडचा पायलट प्रोजेक्ट, सांस्कृतिक हॉल आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. विशेषतः महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये शिरोळ तालुका आघाडीवर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि मुलींना मोफत...

जिंतूर मतदारसंघातून 24 उमेदवारांची माघार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  जिंतूर :दि.04 जिंतूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी (दि.04) एकूण 24 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली.या मतदार संघात 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 24 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्या मुळे आता रिंगणात 17 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या मतदारसंघातून प्रेक्षा विजय भांबळे, मुंजाजी साहेबराव कदम, अंकुश सिताराम राठोड, प्रदिप उर्फ बाळासाहेब काजळे, खंडेराव किशनराव आघाव, पुष्पराज प्रकाश देशमुख, बालाजी माधव शिंदे, राजेश भगवानराव भिसे, विजय माणिकराव चव्हाण, शरद सुदाम चव्हाण, समीर गणेश राव दुधगावकर, ज्ञानेश्‍वर देविदास राठोड, ज्ञानेश्‍वर नुरा राठोड, अमृता सुरेश नागरे, पांडुरंग भास्कर राव कदम, प्रसाद ज्ञानेश्‍वर काष्टे, स्वाती बालासाहेब नखाते, कृष्णा त्रिंबकराव पवार, दिनकर धारोजी गायकवाड, सुखदेव गोकुळ सोळंके, अमोल भिमराव सरकटे, विष्णू दगडू ढोले, अनिल सयाजी आंबुरे व गणेश जगन्नाथ काजळे यांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता 17 उमेदवार निवड णूकीच्या र...

श्री गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून वाहन वितरण.

इमेज
जनवाड वार्ताहर. जनवाड ता चिकोडी येथील श्री गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जनवाड या संस्थेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभासदांना सुलभ व अत्यल्प व्याज दराने नवीन वाहन खरेदीसाठी नवीन वाहन आपल्या दारात याप्रमाणे सभासदांना वाहन वितरण केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री उदय कुमार चौगुले. श्री सिदगोंडा मोकाशी. श्री संतोष मगदूम यांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात आले    संस्था डिजिटल युगामध्ये गतिमान सेवा देत आहे व येत्या काही काळामध्ये संस्था व्यवसायाच्या दृष्टीने सर्व उद्दिष्ट पूर्ण करेल त्याचबरोबर गोरगरीब गरजवंत सभासदांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा आमची संस्था करत आहे असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी मगदूम यांनी व्यक्त केला  या वितरण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री धोंडीबा खापरे. संचालक श्री दत्तात्रय मगदूम. संजय हांडे. जगदीश पाटील. आनंदा नवले. पिरगोंडा मुढाळे. दशरथ पुजारी. महादेव मुधाळे. स्वप्निल बन्ने. संगीता सुखदेव जांगडे ज्योती पा. खोत. त्याचबरोबर संस्थेचे मॅनेजर श्री सोमनाथ स्वामी व क्लार्क पुष्पक जांगडे तसेच सर्व सभासद हितचि...

माधुरी देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन.

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने.,  मलिकवाड तालुका चिकोडी  येथील गावचे सरकार श्री.किरण देशपांडे यांच्या आजी माधुरी गंगाधर देशपांडे वय वर्षे( 92) यांचे शनिवारी (ता.02) रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रम सोमवारी (ता.04) रोजी सकाळी साडेआठ वाजता आहे.

स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई

इमेज
कोल्हापूर, दि. 02 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत एकूण 907 वाहने तपासण्यात आली. सायंकाळी 6 च्या दरम्यान मे. रेडिअंट व्हॅल्युएबल लॉजिस्टीक लिमिटेड या कंपनीचे पिकअप एमएच 46 सीएल 1534 या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात 4 कोटी 3 लाख 3 हजार 071 रुपये इतक्या किंमतीचे 4949.21 ग्रॅम सोने, 11 लाख 51 हजार 861 रुपये किमतीची 6722.57 ग्रॅम चांदी, तर 1 कोटी 44 लाख  17 हजार 151 रुपये किमतीचे 884.71 ग्रॅम डायमंड असे एकूण 5 कोटी 58 लाख 72 हजार 85 रुपये किंमतीचे दागिने आढळून आले. याबाबत वाहनातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता हे दागिने चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स लिमिटेड यांचे असल्याचे सांगितले. या दागिन्याबाबत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची (Receipts) पडताळणी आयकर विभाग व वस्तु व सेवा कर विभागामार्फत सुरु आहे. पडताळणी अंती संबंधित विभागामार्फत पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे 276...

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड

इमेज
नांदेड- सरदार वल्लभभाई पटेल हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री पदावर असताना भारतातील संस्थान विलीन करुन देश एकसंघ करुन अखंडता राखली. मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानातून मुक्त होत नव्हता तेंव्हा पोलिस अ‍ॅक्शन प्लॅन आखून हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्ती लढ्यासाठीही मोठे योगदान देणारे महान राजकीय नेते होते म्हणून ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. पटेल यांनी मुक्त व्यापार, खाजगी मालकी हक्काचे समर्थन करणारे महान राजकीय नेते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 31 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता पोलादी पुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 149 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर आयर्न लेडी, भारतरत्न, देशाच्या तिसर्‍या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा प्रियदर्शनी गांधी यांचा 40 वा स्मृतीदिन...

विजय जाधव यांचे अकस्मित निधन.

इमेज
विजय उत्तम जाधव यांचे आज अकस्मात निधन 1/11/2024 रोजी झाली आहे तरी जाधव कुटुंबांच्या या दुःखद घटनेत सर्व पंढरपूर नाभिक समाज व मान्यवर उपस्थित होते दुःखाच्या प्रसंगी सर्व सहभागी झाले व विजय उत्तम जाधव यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी एक मुलगी व दोन मुले आहेत

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, पाच जणांवर कारवाई

इमेज
शिरोळ प्रतिनिधी जांभळी टाकवडे मार्गावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पाच जणांवर कारवाई २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत अवैद्य धंद्यांचा बिमोड करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरू केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री जांभळी टाकवडे मार्गावरील रस्त्यावर एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत पत्त्याच्या पानाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांच्या विरोधात कारवाई करत २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जांभळी टाकवडे मार्गावरील प्रकाश शेंडगे यांच्या मालकीच्या खोलीत पत्त्याच्या पानाचा जुगार सुरू असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पैसे लावून रमी नावाचा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्यां पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल असा २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पत्त्याच्या पानाचा जुगार खेळणारे विजय विलास पाटील, मानतेश उर्फ आप्पासाहेब कल्लाप्पा चौगुले, ऋतिक दीपक निर्मळ इस्माईल अल्लाउद्दीन शेख अभिजीत रामचंद्र को...

ऐन दिवाळीत 15 कोटींच्या भ्रष्टाचाराचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा बॉम्ब फुटणार ? - अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना आक्रमक राष्ट्रीय टीम लवकरच कोल्हापुरात दाखल.उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत.

इमेज
कोल्हापूर दिनांक 1 - विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा जवळपास 15 कोटींचा भ्रष्टाचाराचा बॉम्ब ऐन दिवाळीत फुटणार का? याची चर्चा नागरिकांत रंगलेली दिसून येत आहे.देवस्थान समिती अंतर्गत हजारो मंदिरे आणि शेकडो एकर जमीन तसेच इतर मालमत्ता यांचा समावेश आहे.तसेच अंबाबाई मंदिर व्यवस्थापन सुध्दा याच समितीकडे येते.त्यामुळे इकडे "मलईदार" पद मिळवण्यासाठी  सर्वच इच्छुक असतात.त्याअनुषंगाने या विभागांतर्गत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप यापूर्वी झाले आहेत.परंतु त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.त्यातीलच एक भाग म्हणून शासनाने ठरविलेला नोकरभरती बाबतचा आकृतीबंध धाब्यावर बसवून 2010 पूर्वी च्या समितीने बेकायदेशीरपणे जवळपास 20 लोकांची भरती केली असून त्यांच्यावर अंदाजे 15 कोटी रुपयांची पगारापोटी लूट केल्याचे सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिल्या गेलेल्या अहवालात सदरची भरती बेकायदेशीर असल्याचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.मग त्याबाबत कारवाई न करता त्या अहवालाला  कचऱ्...

पार्वती नाईक यांचे निधन .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथील इंदिनगर गावठाण मधील प्रतिष्ठित जेष्ठ माता पार्वती रामचंद्र नाईक वय 72 वर्षे यांचे दुःखद निधन झाले . त्या शांत ,   प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या . तसेच  यड्राव ग्रामपंचायत सद्स्य हरिश नाईक यांच्या त्या मातोश्री होत .                                  त्यांच्या पश्च्यात मुलगा , दोन मुली , सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षाविसर्जन शनिवार दि . 2 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 9 वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .

बाजीराव मगदुम्म हायस्कूल, आदर्श शैक्षणिक संस्था, बावन सौंदत्ती गावात कर्नाटक राज्योत्सव साजरा.

इमेज
रायबाग : तालुक्यातील बाजीराव मगदुम्म हायस्कूल, आदर्श शैक्षणिक संस्था, बावन सौंदत्ती गावात कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला.  संस्थेचे मंडळ सदस्य अजित कामगौडा, अरिहंत कामगौडा, कुमार कामगौडा, मुख्याध्यापक अरुण सलगरे व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

एकसंब्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांची माहिती.

इमेज
एकसंबा प्रतिनिधी अमर माने एकसंबा, तालुका चिकोडी येथील नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी २.५० कोटी तर शहराच्या मूलभूत विकासासाठी २.५० कोटी असा एकूण ५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती विधानपरिषद सदस्य व राज्य सरकार दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. ते एकसंबा येथे नगरपंचायत कार्यालयासमोर निधी मंजूर केलेल्या मंजुरी पत्राचे नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे व नगरसेवकांना वितरण करून बोलत होते. हुक्केरी म्हणाले, एकसंबा ग्रामपंचायतीवर आपले वडील बाबण्णा हुक्केरी यांनी प्रथम अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांनंतर १९७८ मध्ये आपण स्वतः अध्यक्ष म्हणून काम केले आहे. एकसंबा ग्रामपंचायत अध्यक्ष ते जिल्हा पंचायत सदस्य, विधान परिषद सदस्य, आमदार, मंत्री, खासदार व कर्नाटक सरकार दिल्लीचें विशेष प्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना विकासासाठी सतत प्रयत्न केले. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, प्रांताधिकारी सुभाष संपगावी, नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे, उपनगराध्यक्ष सुजाता चितळे, रत्नाप्पा बाकळे, अंकुश खोत, रवींद्र खोत, रवींद्र माने, पुंडलिक कबाडे, कृष्णा माळी, मारुती माने, सुभाष कल्याणी, ...

दिव्यांग वृद्ध माता पिता यांना फटाके आणि मिठाई वाटप करत केली आपली दीपावली साजरी - समाजसेविका अनंतलक्ष्मी कैलासन

इमेज
कोंढवे धावडे - श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुलामुलींची शाळा,श्री स्वामी अंगण वृध्दाश्रम व विसावा सोशल फाउंडेशन येथे एन्जॉय ग्रूप पुणे यांच्या वतीने दिवाळी साठी फटाके व मिठाई वाटप करत थोर समाजसेविका सौ. अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या शुभहस्ते देत आपली दिवाळी एका अनोख्या उपक्रमाने साजरी करत जिथं गरज तिथेच मदत अनोखा संदेश देत दिवाळी साजरी न करता मदतीची दिवाळी साजरी केली... या वेळी जवळ पास शंभर मिठाईचे बॉक्स व  दीव्यांग मुलांना दोन पोती फटाक्याची मदत करणारा पाहिलाच एन्जॉय ग्रूप पाहिला निस्वार्थ मदत करणारी पहिलीच समाजसेविका ही सौ.अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या रूपात दिसली तसेच सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी होणे गरजेचे आहे, आपणं दीपावली साजरी करत असताना आपल्या मुळे वृद्ध माता पित्यांची, दिव्यांगांची, गरीब जनतेची दिवाळी कशी साजरी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं आहे, आपणं देणं लागतो या समाजाच्या बांधिलकीच पुण्य कसेही मिळू शकते पण कर्मृरूपी आशिर्वाद आपणास फक्त आपण करत असलेल्या प्रामाणिक कार्यामुळेच प्राप्त होते त्यासाठी जाणीव असणे फार गरजेचे असते ही जाणीव समाजातील प्रत्य...

शिरोळ तालुक्यातील विद्यार्थी आमदार यड्रावकर यांच्यासोबत असतील: प्रतीक कुन्नूरे

इमेज
प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे.दानवाड. आमदार यड्रावकर साहेबांचा कार्यकाळ हा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे ज्या अपेक्षेने लोकांनी आमदार साहेबांना निवडून दिले त्याच अपेक्षाची साहेबांनी व्याजासकट परतफेड केलेली आहे प्रत्येक खेडूपाड्यात कोट्यावधीचा निधी देणे हे पहिल्यांदाच घडले आहे महापूर कोरोना राजकीय अस्वस्थ असतानाही लोकांची समस्या सोडवण्यात व विकास कामात कधीच कमी पडले नाही तर जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे साहेबांचे काम चालू होतं असा आमदार मिळाला हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. कोविड नंतर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत होत नव्हत्या त्या परीक्षा विद्यापीठ अंतर्गत सुरळीत घेण्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी पासून वाचवण्यासाठी आमदार साहेबांनी खूप आम्हाला मदत केली आहे. वेळोवेळी शिक्षण मंत्र्यांनाही याचा पाठपुरावा त्यांनी केली आहे. म्हणून आज आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्याचे आपली जबाबदारी आहे.  राष्ट्रवादी पार्टी विधानसभा अध्यक्ष अमर भैया माने, प्रकाश पाटील टाकवडेकर ,यांच्या माध्यमातून आम्ही शिरोळ तालुक्यातून त्यांना नक्कीच लीड देऊ असा विश्वास आम...

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत सतर्कता जागरूकता सप्ताह.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   ‌   सेलू: येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कार्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह सोमवार २८ रोजी बापूसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले सतर्कता जागरू कता सप्ताह २८ ऑक्टो ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे या निमित्ताने शाखा कार्यालयात शपथ घेण्यात आली नागेश पुराणिक यांनी द्रोपदी मुर्मु (राष्ट्रपति) यांचा संदेश वाचन केले व योगेश जयभाये यांनी प्रवीण के श्रीवास्तव (सेंट्रल विजिलेंस कमीशन)यांचा संदेश वाचन केले या वेळी संस्थेसाठी अखंडते ची प्रतिज्ञा घेतली १) आम्ही नैतिक व्यवसाय पध्दतींना प्रोत्साहन देऊ आणि प्रमाणिक पणा आणि सचोटी ची संस्कृती वाढवू २) आम्ही लाच देणार किंवा स्वीकार णार नाही ३) पारदर्श कता, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता या वर आधारित चांगल्या कॉर्पोरेट प्रशासना साठी आम्ही वचन बध्द आहोत ४) आम्ही व्यवसाय चालवताना संबंधित कायदे नियम आणि अनुपालन यंत्रणा चे पालन करू ५) आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यां साठी आचार संहिता स्वीका रू ६) आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडण्या...

मनोज जरांगे पाटील समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने आज परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांपैकी पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिंतूर विधानसभा मतदार  संघातील दोन इच्छूक  उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पाथरी तील पाच जणांपैकी ज्याला मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील, तोच अधिकृत उमेदवार असेल तर जिंतूर मधील दोन  उमेदवारा पैकी एकाला उमेदवारी देतील अन्य इच्छुक आपली उमेदवारी मागे घेतील, असेही त्यांनी सांगितले.परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे चांगलेच प्रस्थ आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तरुणांवर चांगला प्रभाव आहे, त्यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट मराठवाड्या सह महाराष्ट्रात जाणवला. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अस्पष्ट भूमिका घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीमध्ये सरकारला हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच म...

परभणी जिल्हातील चारही विधानसभे मध्ये मराठा समाजच किंगमेकर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. मराठा मतदारांचे  प्रभूत्व जास्त आहे त्यामुळे जरांगे पाटील फॅक्टर ठरविणार कोण आमदार होणार. परभणी : परभणी जिल्ह्यात सर्वच मतदार संघात कुणबी मराठा समाज बहुसंख्येने आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आकडेवारी लक्षात घेता असे दिसून येत आहे की,जर कोणाला असे वाटत असेल की, मी मराठा समाजाला डावलून आमदार होऊ शकतो तर त्याचा गोड गैरसमज आहे. आज सर्वच मतदारसंघात मराठा समाज जास्त प्रमाणात संख्येने मोठा वर्ग आहे.  मतदाता म्हणून परभणी विधानसभा पाथरी विधानसभा जिंतूर विधानसभा गंगाखेड विधानसभा या चारी विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा कुणबी समाज भरपूर आहे आणि जास्त आहे प्रत्येक मतदारसंघांमध्ये कुणबी मराठा समाजाचा 40% हिस्सा आहे. या समाजाने ठरवलंय की आमदार कोणाला करायचं तोच आमदार होतो कोण्या आमदारा ला पाडायचं का विजयी करायचं हा समाज ठरवतो. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कुंनबी मराठा समाजाचे प्राबल्य आहे. पाथरी विधान सभा मतदारसंघात 75000 महिला व पुरुष मतदार आहेत परभणी मतदार 80 हजार महिला पुरुष आहेत. जिंतूर विधान सभा मतदारसंघात 90,000 आ...

मेघना बोर्डीकर यांचे जिंतूर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.      जिंतूर :दि.28 ऑक्टो. रोजी जिंतूर विधान सभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी मोठी रॅली काढली. या रॅलीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते वाहनावर विराजमान होते. मुख्य बाजारपेठेसह चौक व ठिकठिकाणीया रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघाच्या विका साकरीता आपण कटि बध्द आहोत, अशी ग्वाही दिली. समाजा तील विविध वर्गांना न्याय मिळवून देण्याचं काम बोर्डीकर कुटूंबि यांनी सातत्याने केले आहे. या मतदारसंघात पायाभूत सोयी-सुवि धा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न क...

गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

इमेज
शिरोळ/ प्रतिनिधी:  शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार पूर्ण ताकतीने करणार आहे. तसेच उद्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी केले.      शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोळ येथे पार पडली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.        रावसाहेब भिलवडे पुढे म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महायुतीच्या कारभारावर जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर असून महागाई, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या सुखदुःखाशी महायुतीचे काही देणे घेणे नाही. केवळ घोषणा करायच्या आणि श्रेयवाद लाटायचे हीच भूमिका घेऊन काम केले जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ...

कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा गणपतराव पाटील यांना पाठिंबा

इमेज
कुरुंदवाड/प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांना कुरुंदवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व त्यांचे सुपुत्र नगरसेवक अभिजीत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच विजयासाठी शुभेच्छा दिल्या.     आदरणीय साने गुरुजींच्या विचारांना मानून त्यांच्या विचारधारेवर आतापर्यंत वाटचाल केली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून माणसाला केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासकार्यात रावसाहेब पाटील यांची साथ बहुमूल्य ठरणार आहे, अशा भावना यावेळी गणपतराव पाटील यांनी व्यक्त केल्या आणि पाठिंब्यावर आभार मानले.  यावेळी देवराज मगदूम, सुनील कांबळे, आशिष मगदूम, साताप्पा बागडी, हसन देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

अरिहंत शुगर 4 लाख टन ऊसाचे गाळप करणार उत्तम पाटील यांची माहिती जैनापूर येथे सातव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ

इमेज
चिकोडी प्रतिनिधी अमर माने  जैनापूर (ता. चिकोडी) येथील अरिहंत शुगर कारखान्याचे 2024-25 सालात चार लाख टन ऊस गाळपाचे ध्येय असून शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी ओलीताखाली आणण्यासाठी लवकरच योजना राबविण्याचा विचार सुरु आहे. गेली सहा वर्षे केवळ शेतकऱ्यानी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत या भागातील इतर कारखान्याच्या बरोबरी शेतकऱ्यांना योग्य दर दिला आहे. यंदाही सरकारच्या घोषणेप्रमाणे ऊसाला दर दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.  ते जैनापूर येथे अरिहंत साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करून बोलत होते. यावेळी  कारखान्याचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व मान्यवर प्रमुख उपस्थित होते. श्री. पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी घालुन दिलेल्या नीती नियम व मार्गदर्शनाखाली मी व माझे बंधू अभिनंदन पाटील विविध कार्यात सहभागी आहोत. त्यामुळे अरिहंत परिवाराचा हळूहळू मोठा विस्तार होत चालला आहे.  यासाठी सर्व सदस्य, शेतकरी, ऊस उत्पादक,...

सैनिक मलिकवाड येथे बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्ला स्पर्धा आयोजन.

इमेज
सैनिक मलिकवाड तालुका चिकोडी येथील प्रतिवर्षानुसार बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्यावतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्लास्पर्धा आयोजन करण्यात आले असून. प्रथम क्रमांकासाठी 5001 द्वितीय क्रमांकासाठी 3001तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. नियम व अटी ज्या स्पर्धकांना किल्ल्याचे नाव नोंदणी करायचे असेल तर दिनांक 3/11/2024 या तारखेपर्यंत नाव नोंद करावे.  किल्ल्याची माहिती स्पर्धकाला देता आली पाहिजे किल्ल्यास भोवतालचे वातावरण शिवमय असावे तसेच नैसर्गिक साधने उदाहरण मशाल पणती इत्यादी वापर करावा. पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील किल्ल्याचे परीक्षण चार तारखेला राहील किल्ला बांधणी 40 प्रश्नउत्तरे 20 किल्ला माहिती 20 शिवमय वातावरण 10 सामाजिक कार्य 10 एकूण गुण 100. नाव नोंदणी अभय पाटील यांच्याकडे करण्यात येणार आहेत. 9481368318 विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.